बुधवारच्या दिवशी करा हे उपाय, बाप्पा होतील प्रसन्न करतील सर्व इच्छा पूर्ण..!!

मित्रांनो, देवांचे देव भगवान श्रीगणेश सर्वांच्या दुःखांचे निराकरण करतात. आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन भगवान श्रीगणेश भक्तांच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण करतात. तसेच कोणत्याही शुभ कार्यात मान असलेल्या आपल्या बाप्पांची कोणत्याही शुभ कार्यापूर्वी आराधना, पूजा केली जाते.

तंत्रशास्त्रानुसार भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी विविध उपाय केले जातात. असाच एक उपाय आज आपण बघणार आहोत.

मित्रांनो, जर आठवड्यात येणाऱ्या बुधवारच्या दिवशी किंवा चतुर्थीच्या तिथीवर हे उपाय आपण केलेत तर त्याचे परिणाम आपल्याला लवकरच मिळतात. तुमच्याही काही इच्छा असतील तर त्या या उपायांच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण करु शकतात.

जर तुमच्या आयुष्यात बऱ्याच समस्या असतील आणि त्या कमी व्हायचं नावंच घेत नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बुधवारच्या दिवशी शक्य असल्यास एखाद्या हत्तीला हिरवा चारा खायला घालावा.

आणि जवळच्या गणपती मंदिरात जाऊन आणि भगवान श्री गणेशांजवळ तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना करा. याचबरोबर, तुमच्या आयुष्यातील समस्या काही दिवसांत दूर होतील.

बुधवारी सकाळी आन्हिक आवरुन आंघोळ झाल्यावर एक कांस्याची प्लेट घेऊन त्यावर चंदनाने ओम “गंणपतये नमः” लिहा. यानंतर या प्लेटमध्ये पाच बुंदीचे लाडू ठेऊन घ्या, त्यांना जवळच्या गणपती मंदिरात अर्पण करुन या. या उपायाने अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता वाढेल.

बुधवारी सकाळी स्नान झाल्यानंतर नजीकच्या गणपती मंदिरात जाऊन आणि श्रीगणेशांना त्यास २१ गूळाच्या लहान भेली आणि दूर्वा अर्पण करा. हा उपाय केल्याने भगवान श्रीगणेश भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. हा सुद्धा एक अतिशय चमत्कारीक उपाय आहे.

जर तुम्हाला श्रीमंत होण्याची इच्छा असेल तर बुधवारी किंवा चतुर्थीच्या तिथीच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यावर श्री गणेशांना गाईच्या शुद्ध तूप आणि गूळ अर्पण करा.

भगवान श्रीगणेश यांना अभिषेक करण्याची विधी शास्त्रातही सांगितली आहे. आपण बुधवारी श्रीगणेशाची पूजा केल्याने विशेष लाभ होतात.

तसेच बुधवारच्या दिवशी कोणत्याही गणपती मंदिरात जाऊन आणि दर्शन झाल्यानंतर यथाशक्ती जे संभव आहे ते दान करा. दान दिल्याने पुण्य प्राप्त होत असते.

आणि भगवान श्रीगणेश देखील त्यांच्या भक्तांनवर प्रचंड प्रसन्न होतात. तसेच तुम्हाला शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्षाचं पठण करा. साधना पूर्ण झाल्यानंतर माव्याच्या लाडूंचा नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून सर्वांमध्ये वाटून घ्या.

थोड्या वेळाने गायीला तूप आणि गूळ खायला घाला. हा उपाय केल्यास पैशांशी संबंधित अनेक स’मस्या दूर होतात.

टिप – वरील माहिती वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही नम्र विनंती.

Leave a Comment