Thursday, February 29, 2024
Homeलाइफस्टाइलचाणक्य म्हणतात.. ज्या व्यक्तीच्या अंगी हे 3 गुण असतात अशी व्यक्ती सगळ्यांची...

चाणक्य म्हणतात.. ज्या व्यक्तीच्या अंगी हे 3 गुण असतात अशी व्यक्ती सगळ्यांची आवडती बनते.!!

चाणक्य म्हणतात.. ज्या व्यक्तीच्या अंगी हे 3 गुण असतात अशी व्यक्ती सगळ्यांची आवडती बनते.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आचार्य चाणक्य यांनी यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अनेक नीती सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य ही एक महान व्यक्ती होती. अनेक जण त्यांच्या नीतीचे अनुकरण करतात. आचार्य चाणक्य यांनी बुद्धिमान व्यक्तीचे काही गुण सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या.

“प्रस्तावसदृशं वाक्यं प्रभावसदृशं प्रियम् । आत्मशक्तिसमं कोपं यो जानाति स पण्डितः॥” या श्लोकामधून चाणक्य सांगतात की, केव्हा काय बोलावे, कोणावर प्रेम करावे व किती राग करावा, या तीन गोष्टी ज्या व्यक्तींना माहिती असतात, त्या अत्यंत ज्ञानी व बुद्धिमान असतात.

केव्हा कुणाशी काय बोलावे.?
आचार्य चाणक्य सांगतात की, समाजात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. काही व्यक्ती कोणताही विचार न करता काहीही बोलतात. अशा लोकांवर टीका केली जाते. याउलट जी माणसे विचारपूर्वक बोलतात त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असल्याचे दिसून येते. त्यामुळे चाणक्य नीतीनुसार केव्हा काय बोलावे, हे माहीत असणे गरजेचे आहे.

प्रेम कुणावर करावे?
प्रत्येक व्यक्तीने योग्य व्यक्तीवर प्रेम करावे, असा सल्ला आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीद्वारे देतात. चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल्यामुळे भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोणावर प्रेम करावे, याची जाण प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.

किती राग राग करावे?
राग हा नेहमी घातक असतो. कारण- रागाच्या भरात अनेक लोक स्वत:चे नुकसान करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात. त्यामुळे किती राग करावा, हे ज्या व्यक्तींना कळते, त्या व्यक्ती अत्यंत ज्ञानी व समजूतदार असतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स