चराचरात मी वसतो.. शून्य सेकंदात चरणस्पर्श करुन स्वामींचा आशीर्वाद घ्या.. श्री स्वामी समर्थ.!!

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांना विनम्र अभिवादन, स्वामींनी बंदर किनाऱ्यावर किल्ला उभारला. हा हुकूम दिल्यानंतर स्वामिसुत स्वामी सेवेला लागले. हृदयातील स्वामी अनुभवावर ते नेहमी राहत. या अनुभवावर राहून त्यांच्या मुखातून अभंगाची आभिव्यति होईल.

या अभांगाने येणारे स्वामी भक्त भक्तीत रमून जात. त्यांच्या अभंगांत स्वामी भक्ती होती. स्वामींची ओळख होती. समस्त मानवासाठी कल्याण कारी उपदेश होते. कामाठी पुरात स्वामींचा पहिला मठ होता. त्यानंतर चीमाबई बेलवाली नावाची सेवेकरणीन कांदे वाडीत आपल्या चाळीत स्वामी सुताना आणले.

तेथेही शेकडो लोक दर्शनासाठी येऊ लागले. असेच पण एके दिवशीकाही मंडळी स्वामींच्या दर्शनासाठी गेली असता स्वामी महाराजांनी त्यांच्याकडे बघितले. आणि त्यांना बोलले की अरे दर्या किनाऱ्यावर जा. असा उपदेश होताच त्या मंडळींना समजले की स्वामी महाराज आपल्याला मुंबईला स्वामी सुताकडे जाण्याची आज्ञा देत आहेत. आणि त्या प्रमाणे ते मुंबईला स्वामी सुताकडे आले.

येथे आल्यानंतर अक्कलकोट मध्ये जे काही घडले त्या बद्दल च्या सांकेतिक खुणा स्वामी सुतानी त्यांना दिल्या. हे बघून सर्व मंडळींना आश्चर्य वाटले. अशा असंख्य लीला स्वामी समर्थ महाराज आणि स्वामी सुत करत होते. त्यामुळे स्वामीसुतांकडे येणाऱ्या मंडळींची श्रद्धा दिवसेंदिवस दृढ होत होती. स्वामी भक्त हो स्वामी सुत स्वामी भक्तीत वेडे झाले होते.

आणि त्यामुळे तेथील लोकांना स्वामिसुतांचे बोलणे वागणे नाटकी वाटतं होते. पण तेव्हा सुद्धा स्वामी सुत त्यांना हास्य अभंगाने स्वामी भक्तीचाच उपदेश देत होते. आणि त्यांना स्वामी महाराजांची गोडी लावत होते. अनेक लोकांना दीक्षा देऊन त्यांना स्वामी मय केले होते. त्यात बाबा शेरवाई, गोविंद पंथ केतकर, बाबा सिकाका हरिश्चंद्र व इतर मंडळी होते.

त्यावेळेला नर्सोजी पारशी या डोळे गेले होते. स्वामी सूतानी त्यांचे डोळे बरे केले होते. योगायोगाने अनेक पारशी लोक स्वामी सुतंकडे येऊ लागले. आणि त्या सर्व लोकांना स्वामी सुतानि स्वामी भक्तीस लावले. अनेक नास्तिक लोकांना स्वामी भक्तिस लावले. स्वामी सुताणा हे स्वामी भक्तीचे वेड लागले तेव्हा त्यांचे वय 25 होते.

त्यावेळी त्यांची आई कोकणात होत्या. जेव्हा स्वामी सुतांचे हे सर्व त्यांना समजले तेव्हा त्या रडत रडतच मुंबईला आले. काकू बाईंनी स्वतः स्वामी सुता ना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व व्यर्थ गेले. आता त्यांनी आपल्या नातेवाईकांना एकत्रित केले. त्यांच्याकडून स्वामी सुता ना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व व्यर्थ गेले.

कारण स्वामीसुतांची ही अवस्था ब्रह्मानंद लागली टाळी कोण देहाते सांभाळी अशी झाली होती. हे बघून त्यांना कोणीतरी भूत बाधा केली आहे. असे त्यांना वाटू लागले. तेव्हा काकू बाई सटनेच्या देव मावलेदर यांच्याकडे गेले त्यांना काकू बाईंनी आपला मुलगा शुद्धीवर आणा अशी विनंती केली. तेव्हा देव मावलेदार हसून बोलले की, हरी भावूना जबरदस्त भूत लागलेले आहे.

ते कोणा देवाच्याने वा मंत्राने निघणार नाही. हे उत्तर ऐकून काकू बाईं निराश झाल्या आणि त्या परत मुंबईला आल्या. स्वामी भक्तीचे वेड एक तर लागत नाही. लागले तर उतरत नाही . थोडक्यात काकू बाईंचे सर्व प्रयत्न विफल झाले. पुढे एके दिवशी स्वामी सुत अक्ककोट येथे आले होते. त्यावेळेला स्वामी महाराज राजवाड्यात होते.

स्वामी महाराज जेव्हा राजवाड्यात असतं तेव्हा कोणालाही स्वामी महाराज यांचे दर्शन होत नसे. स्वामी सुतांना स्वामी महाराज यांची तीव्र ओढ लागली होती. ती ओढ एवढी होती की स्वामींचे दर्शन होणार नाही हे समजताच स्वामी सुत राजवड्यासमोर समोर निराहार थान मांडून बसले. तीन दिवस अन्न पानी त्यागून स्वामी सुत तेथे बसले. आणि मुखातून अभंग वदु लागले.

माझी माता तुमचे घरी म्हणुनी हो आलो द्वारी आम्हा नको तुमचे काही स्वामी चरण दावा बाई. स्वामी चरणाचे रज देऊन तृप्त करा मज. माझी माय आहे आत. मज दाखवा त्वरित माय सोडूनिया बाळ कैसा घालविल काळ. आम्ही जावूनिया आत. तुमचे काही नाहीत. प्रेम पान्हा देऊनी सोडा. गात येऊ हो पोवाडा.

स्वामी सुत म्हणे आई. मला भेटवावे बाई. ही प्रार्थना ऐक स्वामी आईचे हृदय पाझरले. चौथे दिवशी जशी गाय आपल्या वासरकडे धावून जाते. तसेच स्वामी महाराज कळवळून बाहेर आले. आणि त्यांनी स्वामी सूताना राजवाड्यात नेले. तेव्हा पासून स्वामी सुताना राजवाड्यात जाण्याची संधी मिळाली. शुद्ध भक्ती असेल तर ईश्वराला धावत यावेच लागते.

याची अक्कलकोट निवासियाना प्रचिती आली. आजच्या लिलेचे मनन चिंतन केले असता आपल्याला एक लक्षात येते की स्वामी सुत हे भक्ती अवतार होते. अनन्य भक्तीचा आदर्श होते. स्वामी सूतांच्या जीवनाचा अभ्यास केला असता आपल्याला त्याची खूप छान समज मिळत आहे. त्यांची भक्ती भावनिक नव्हती तर कृतीत होती. आणि म्हणून जेव्हा कोणी अक्कलकोट येथे येईल.

त्यांना स्वामी महाराज दर्या किनाऱ्यावर जा अशी आज्ञा देत. स्वामी सूतांचे शरीर हे स्वामी कार्य साठी पात्र झाले होते. त्यांना कोणी ढोंगी म्हणत. त्यांच्यावर टीका करत. त्यांना काही फरक पडत नव्हता. अनन्य भावनेने स्वामींचे नाव घेतल्यास स्वामीना यावेच लागते. म्हणून या प्रसंगातून बोध घेता आपल्याला जर खरंच स्वामी कृपा हवी असेल तर आपल्यात खरोखर स्वामी कृपेची तहान आहे का? ती दृढ इच्छा शक्ती असेल तर मनन चिंतन करायचे आहे.

मग स्वामी तुम्हाला हृदयातून संकेत देतील. मार्ग दाखवतील. हे श्री गुरू समर्था तुम्ही आई आहात. आम्ही तुमचे बाळ तुम्हाला अनन्य भावनेने प्रार्थना करताच तुम्ही क्षणाचाही विलंब न करता धावत येतात. तुम्हाला मात्र अनन्य प्रेम हवे आहे. तुम्ही भक्ती भावनेचे भुकेले आहेत. हे परब्रह्म आजच्या स्वामी सुताच्या लीलेतुन आम्हाला ही अनन्य भक्तीची प्रेरणा दिली समज दिली. तुम्हाला अनन्य कोटी धन्यवाद स्वामी.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment