छत्रपतींचे राज्य जाऊन पेशवाई कशी आली.?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो पेशवे पद शिवरायांच्या बालपणापासूनच होते भलेही ते अनौपचारिक का असेना आणि छत्रपती शाहू महाराज १७०७ मध्ये मुघलांच्या कैदेतून सुटून परत या भूमीवर आले तेव्हा त्यांना राजकारण व शासन यांचा अनुभव नव्हता. त्यांनी त्यांना येऊन मिळालेल्या निष्ठावंत लोकांपैकी बहिरोजी मोरेश्वर पिंगळे या स्वराज्य सेवकास आपले पहिले पेशवे नेमले होते. बहिरोजीपंत कान्होजी आंग्र्याच्या तावडीत सापडून कैद झाले तेव्हा बल्लाळ उर्फ बाळाजी विश्वनाथ भट जे पूर्वी शाहूंचे १७०७-१७१३ च्या दरम्यान मुतालिक व सेनापती राहिले होते त्यांना शाहू महाराजांनी १७१३ मध्ये पेशवे केले.

बाळाजीपंत १७२० म्हणजे मृत्यूपर्यंत पेशवे राहिले. पुढे दरबारातील इतर मंत्र्यांचा विरोध असूनही बाळाजीपंतांचे २० वर्षीय ज्येष्ठ सुकुमार विश्वास उर्फ बाजीराव यांना शाहू महाराजांनी पेशवे केले. बाजीरावांचा पराक्रम तर सर्वश्रुत आहेच ज्या बद्दल लिहिल्यास उत्तर मारूतीचे शेपूट होईल. १७४० मध्ये बाजीराव पेशव्यांच्या अकाली निधनानंतर काही काळ (काही दिवस) त्यांची बहीण भिऊबाई यांचे यजमान बाबूजी नाईक बारामतीकर जोशी यांना पेशवेपद लाभले पण अल्पावधीतच ते त्यांच्याकडून काढून घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी ते पद बाजीरावांचे ज्येष्ठ चिरंजीव बल्लाळ उर्फ बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब यांना दिले.

पुढे नानासाहेब आपल्या मुत्सद्देगिरीमुळे अधिक प्रबळ होत आहेत बघून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे पेशवेपद काढून घेतले पण त्यावेळी इतर कोणीही हे पद साम्राज्याचा वाढलेला कारभार बघून स्वीकारायला सिद्ध नव्हते तेव्हा छत्रपतींनी पुन्हा नानासाहेब हेच आपले पाचवे पेशवे नेमले. शाहू महाराजांच्या नंतर छत्रपती रामराजे महाराज यांनी २५ सप्टेंबर १७५० रोजी नानासाहेब पेशवे यांच्यासोबत सांगोला करार केला व त्यामुळे पेशव्यांचे अधिकार वाढून छत्रपती नामधारी शासक उरले ज्यातून खरी पेशवाई जन्माला आली.

आणि त्याचबरोबर मित्रांनो छत्रपती शाहूंना मुलगा नव्हती म्हणून त्यांनी ताराबाई यांचा नातू रामराजा यांना दत्तक घेण्याचे ठरविले आणि मृत्यूपूर्वी राज्यकारभार-विषयक सर्व अधिकार आज्ञापत्राद्वारे पेशवे बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे याना यांना दिले. शाहूंच्या निधनानंतर रामराजे सातारच्या गादीवर आले पेशवे व रामराजे यांत १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावांनी त्यांना वर्षाला ६५ लाख रुपये नेमणूक करून दिली.

रामराजे पेशव्यांच्या नादाला लागले आहेत, हे पाहून ताराबाईंनी संधी साधून स्वतःच्या मुलाला रामराजांना १७५५ मध्ये कैद केली , तेव्हा बाळाजी बाजीरावांनी ताराबाईंशी तह केला, त्यामुळे ताराबाई राज्यकारभार पाहू लागल्या आणि रामराजांना अधिकार उरले नाहीत. नंतर १७६१ ताराबाई चा मृत्यू झाला . ताराबाईंच्या मृत्यूनंतर जवळपासचा थोडा प्रदेश, इंदापूरची देशमुखी एवढाच अधिकार छत्रपतींना राहिला होता. त्या आधीच मराठ्यांच्या सत्तेचे केंद्र पुणे होऊन पेशवे मराठी राज्याचे सर्वेसर्वा झाले.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Comment