चेहऱ्यावर डाग अर्थात स्कार्स दिसायला खराब वाटतात. तुम्हालाही ही समस्या आहे तर बाजारातील क्रीम्स न वापरता घरगुती उपचार करा.
जखमा अथवा डाग दिसायला खूपच खराब वाटतात. या डागांमुळे चेहऱ्याची सुंदरता बिघडते. तसेच आत्मविश्वासही कमी होतो. जखमांच्या खुणा मिटवणे कठीण नाही मात्र त्यासाठी तुम्हाला काही उपाय नियमितपणे करावे लागतील.
काही नैसर्गिक पदार्थांमध्ये ब्लीचिंग एजंट असते जे डाग कमी करण्यास मदत करतात. याच्या प्रयोगाने काही दिवसांतच चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्सचे डाग, डार्क सर्कल, जखमांच्या खुणा आणि चिकनपॉक्सचे निशाण कमी होण्यास मदत होईल.
आंबट पदार्थाने घालवा डाग..
लिंबू, टोमॅटो, व्हिनेगार या नैसर्गिक पदार्थांच्या सहाय्याने डाग कमी करता येतात. हे पदार्थ स्किनवर लावताना विशेष काळजी घ्या.
फक्त डागांवरच लावा. चेहऱ्याच्या इतर ठिकाणी लावू नका. हे पदार्थ दररोज डागांवर लावा आणि सुकल्यावर धुवून टाका.
बटाटा आणि कांदा
कांद्यामध्ये सल्फर अशते ज्यामुळे डाग कमी करण्यास मदत होते. व्हिनेगारमध्येही हे गुण असतात. तसेच बटाट्यामुळे डोळ्यांच्या खालचे काळे डाग जाण्यास मदत होते.
मध
जखमांच्या खुणा कमी करण्यात मध फायदेशीर आहे. काही थेंब मध जखमेच्या ठिकाणी लावा. मध आणि लिंबू मिसळूनही तुम्ही लावू शकता. मुलतानी माती लावल्यानेही चेहऱ्यावर ग्लो येतो. डाग कमी होतात.
चंदन
शद्ध चंदनामध्ये डाग कमी करण्याचे गुण असतात. चंदन पाण्यात मिक्स करून लावल्याने फायदा होतो मात्र चंदन गुलाबपाण्यात अथवा दुधामध्ये मिक्स करून लावल्याने जास्त फायदा होतो.