चिंते विना आनंदी आयुष्य कसं जगावं हे शिकविणारी गोष्ट.. नक्की बघा..

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आयुष्य हा असा एक प्रवास आहे आणि या प्रवासात तुम्हाला कोण कोणती गावे लागतील हे कुणालाच माहिती नसते. तुम्हाला लागणारे प्रत्येक स्थानक हे काहीतरी नवे काहीतरी वेगळे तुमच्या आयुष्यात घेऊन आलेले असते. असाच एक प्रवास आणि एक अनुभव आज मला तुम्हाला सांगावासा वाटतो. अनुभव आवडला असेल तर नक्की शे’यर करा.

माझा एक मित्र होता अबिनाश, फार जुना मित्र.! तो ओडिशाचा. त्याच्या मुलीचे लग्न विशाखापट्टणम जवळच्या राजामुंद्री या गावी होते. विशाखापट्टण आता लवकरच नवीन आंध्र प्रदेशची राजधानी बननार आहे. मी आणि माझी बायको दोघेही विशाखापट्टनम् रेल्वे स्टेशन ला पोहचलो. रेल्वे प्रवाशांनी तुडुंब भरलेली आत पाय ठेवायला देखील जागा नवती.

आम्ही दोघे कसेबसे रेल्वेमध्ये चढलो, आणि या माणसांच्या गर्दीसह ट्रेन सुरू झाली तेव्हा जीव भांड्यात पडला. एका भल्या माणसामुळे आम्हा दोघांना जागा देखील मिळाली. राजामुंद्रीच्या अलीकडे तुली नावाचे एक स्टेशन लागते. तिथे गाडी काही मिनिटे थांबते बहुतेक, जेव्हा गाडी तिथे थांबली तेव्हा मी खिडकीतून एका चहावल्याला दोन चहाची ऑर्डर दिली.

चहाची ऑर्डर दिली आणि इथेच सगळे बिघडले, चहा घ्यायच्या आधी मी पाहायला हवे होते की आपल्याकडे सुट्टे आहेत की नाही किंवा त्या चहावल्याला सुट्टे विचारायला हवे होते पण झाला वाद. तिकडे इंजिन आक ओकत होते आणि इकडे आमच्या सौभाग्यवती. मी वैतागून दोनशेची नोट त्याला दिली, पण बायको ती बायको ! त्यामुळे ती अधिकच चिडली.

बायकोच बोलणे चालूच होते तेव्हा मी रागावून म्हटलं, ‘गरीब माणूस होता, नसतील त्याच्याकडे सुट्टे. दोनशे रुपयांनी आपल्याला काय कमी पडणार आहे ? जरा चांगुलपना वर विश्वास असू द्यावा’. माझा चांगुलपानाचा सल्ला दिला जास्तच झोंबला आणि ती म्हणाली ‘मग खिशातले सगळे द्यायचे होते की.? हे लोक नुसते लुटायला बसलेले असतात. बरोबर हेरतात ते पेसेंजर’

अशा गरमा गरमी मध्ये पुढचे पिठापुरम् स्टेशन आले. एक तेरा वर्षाचा चुनचुणीत मुलगा आमच्या खिडकीपाशी आला आणि त्यानी दक्षिण भारतीय हिंदीत विचारले, ‘साहेब, मागच्या स्टेशन वर तुम्हीच दोन कप चहा पिलात का? आणि दोनशे रुपये दिलेत?’ मी हो म्हटले.

तेव्हा त्याने 180/- रुपये काढून देऊ केले. मी त्याला म्हणालो, ‘मुला, पण ते तू का देतोएस.? तुझ्याकडून थोडेच घेणार आम्ही’. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही ज्यांच्याकडून चहा पिले ते माझे वडील. त्यांनी मला फोन करून कळवले की या नंबरच्या बोगीमधल्या खिडकीतल्या निळा शर्ट घातलेल्या साहेबांना इतके इतके पैसे द्यायचे आहेत म्हणून.

इतका वेळ चाट पडलेली बायको शरमली होती. तिने त्याला विचारले,’घरी कोण कोन असते?’ तो म्हणाला मी, एक मोठा भाऊ आणि वडील… आई नाहीये मला. मी आठवीला आहे आणि मोठा भाऊ दहावीला. तो सकाळी बाबांना मदत करतो तर मी दुपारी.

ती म्हणाली बेटा, तुझ्या बाबांना सांग की तुम्ही खूप ग्रेट आहात. या काळात तुम्ही तुमच्या आचारणाने मुलांवर जे संस्कार करत आहात ते कधीही वाया जाणार नाहीत. आणि बेटा तू आणि तुझा मोठा भाऊ आभाळाइतके मोठे व्हा !! आणि तुमच्या बापचे नाव आभाळाइतके जरूर मोठे कराल.

तेव्हा तो मुलगा म्हणाला, बाबा रोज पहाटे भागवतगीता वाचतात आणि आम्हालाही सांगतात. हा ग्रंथ त्यांचा आदर्श आहे आणि आमचाही. यात सांगीतलेले चार उपदेश स्वच्छ, दयाळूपणा, सत्य आणि प्रामाणिकपणा त्यांनी आपल्या आचरणात उतरवले आहेत. आज आम्ही गरीब असलो तरी खूप जास्त आनंदी आणि सुखी आहोत. त्या मुलाचे ते बोलणे ऐकून मी, माझी बायको आणि इतका वेळ आमचे भांडण एंजॉय करणारी अख्खी बोगी अक्षरशः शांत झाली होती.

सांगायचं झाल तर हा खूप छोटा अनुभव आहे, अगदी कधीही कुणालाही असा अनुभव येऊ शकतो. एखादा प्रामाणिक माणूस दिसला तर त्यात मला स्वामी दिसतात आणि ते मला हेच खरे जीवन आहे असा संदेश देतात. सत्य, प्रामाणिकपणा, दयाळूपणाने वागावे हा धडा मला नेहमी आठवून देतात.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment