चुकूनही दुसऱ्यांच्या वापरलेल्या या 5 वस्तु नका वापरु, नाहीतर होईल मोठे नुकसान..!!

मित्रांनो आपल्या सनातन हिं’दू ध’र्मात अनेक असे नियम घालून दिलेले आहेत जे आपण पाळले नाहीत तर आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. असेच काही नियम आहेत जे वास्तुशास्त्रात नमूद केले आहेत. वास्तु शास्त्रानूसार दुसऱ्यांच्या या काही वस्तु आपण चुकूनही वापरू नये.

कारण त्या वस्तुंच्या मधील ग्रहदोषांमुळे त्या वस्तुच्या माध्यमातून तुमचं आर्थिक तथा सामाजिक नुकसान होऊ शकतं. म्हणूनच दुसऱ्यांनी एकदा वापरलेल्या या वस्तु तुम्ही चुकूनही वापरायला नको. तर मित्रांनो शास्त्र वचनांनुसार त्या कोण- कोणत्या वस्तु आहेत ज्या नुकसानकारक आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

चप्पल – मित्रांनो, असे समजा तुम्ही मंदीरात गेलात आणि तिथे तुमच्या चपलांची चोरी झाली तर आपण काय करतो रागा रागात तेथे असलेल्या दुसऱ्या कुणाचीही चपला घालून घरी निघून येतो तर मित्रांनो, अशा प्रकारे कुणाच्याही चपला घालून घरी नेवू नका.

कारण तुम्ही त्या चपलांबरोबर एक निगेटिव्ह एनर्जी सुद्धा स्वतःवर ओढून घेतात आणि ती एनर्जी तुमच्यासाठी अतिशय नुकसानकारक ठरू शकते. आपल्या शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की चपल चोरीला जाणं म्हणजे आपलं दारिद्रय कमी होणं. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांचे दारिद्रय आपल्या घरी घेऊन येवू नका.

हातरुमाल– मित्रांनो, दुसऱ्याचा वापरेला हातरुमाल जर आपण वापरला तर आपल्या घरात क्ले’ष, क’लह निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोणातून पाहिलं तर इतरांच्या हात रुमालामधील घाण अथवा बॅक्टेरियामुळे तुम्हाला त्या व्यक्तिला असलेलं इनफेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुसऱ्यांनी वापरलेला रुमाल वापरणं आपल्यासाठी धोक्याचं ठरु शकतं.

गादी किंवा बेड – तस पाहिलं तर प्रत्येकाने आपली गादी अथवा बिछान्यामध्ये झोपणं हेच योग्य असू शकतं. कारण इतरांच्या अंथरुणावर झोपल्यामुळे आपल्याघरात वास्तूदोष होऊ शकतात. तसेच इतरांच्या अंथरुणावर झोपल्यामुळे तुमचे आरोग्य देखील बिघडू शकते.

कपडे – बहुतांश लोकांना दुसऱ्यांनी वापरलेले कपडे वापरण्याची सवय असते. आपली भावंडे अथवा मित्र-मैत्रीणींचे वापरात असलेले कपडे वापरण्यात काहीच चुकीचे नाही असे अनेक लोकांना वाटते. पण बहुतेक जण वापरलेले कपडे इतरांना दान करतात. मात्र अशा पद्धतीने दुसऱ्यांचे वापरलेले कपडे घालणं धोक्याचं ठरू शकते. कारण असं केल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये येत असते.

पेन – बऱ्याच लोक पेन वापरतात. ज्यांना नेहमीच काहीतरी लिखाण करावं लागतं ते नेहमी आपला एक किंवा अधिक पेन ते सोबतच ठेवतात. पण कधी कधी दुसऱ्या कुणाचा पेन वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. मात्र काम झाल्यानंतर ते पेन आपल्या खिशात टाकून आपण निघून येत असतो. पहिली गोष्ट असं वागणं हेच मुळात चुकीचे आहे, आणि याचे परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतात. कारण असे केल्यामुळे तुम्हाला याचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी कुणाचेही पेन जर तुम्ही जरा वेळ साठी घेत असाल तर ते पेन पुन्हा परत करा. आणि यापुढे तुमचे पेन कोणालाही वापरण्यासाठी देऊ नका.

घड्याळ – हातामध्ये वापरण्याचे घड्याळ सुद्धा कधीच कुणी वापरलेले घेऊ नये कारण त्यामध्येही वापरण्याऱ्या व्यक्तीची निगेटिव्ह एनर्जी साठून राहिलेली असते. ज्यामुळे तुमचे कौटुंबिक व आर्थिक स्थितीचे अतोनात नुकसान होऊ शकते. असे वापरलेले घड्याळ पुन्हा वापरल्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान तसेच अपयशाचा सामना करावा लागू शकतो.

तुमचा लकी चार्म – प्रत्येकाच्या आयुष्ययात एक तरी लकी चार्म असतोच, एखादी अशी स्पेशल गोष्ट जी तुमच्यासाठी फारच लकी असते. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळतो अशी गोष्ट कधीच इतरांना देऊ नका. कारण यामुळे देणाऱ्याचे आणि घेणाऱ्याचे दोघांचेही अतिऐ नुकसान होऊ शकते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Comment