चुकूनही कधी झाडूजवळ ठेवू नका.. ही एक वस्तु.‌. वास्तुशास्त्र..


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो झाडू, खराटा या तशा दुर्लक्षित वस्तू… पण घर, ऑफिस, अंगण वगैरे साफ करण्यासाठी आपल्याला झाडू व खराट्याचा वापर करावाच लागतो. पण झाडू हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे हे लक्षात ठेवावे. लक्ष्मी घरात कायम नांदावी यासाठी झाडूचा, खराट्याचा वापर नीट करायचा असतो. लक्ष्मी प्रसन्न झाली तर ती घरात कायमचा वास करते हे वेगळे सांगायला नको. वास्तुशास्त्रानुसार झाडून काढण्याची वा झाडू ठेवण्याची पद्धत योग्य नसेल तर घरात नेहमीच आर्थिक कटकटी सुरू राहातात असे बोलले जाते.

घर किंवा आपल्या ऑफिसमधला झाडू बरेच दिवस वापरला की छोटा होतो. तो नवीन खरेदी करण्याचे आपण ठरवतो. पण झाडू खरेदी करायचा तर शनिवारच सर्वोत्तम वार असतो हे लक्षात ठेवले पाहिजे. नव्या झाडूचा वापर करायला शनिवारीच सुरूवात करा. कारण शनिवार नव्या झाडूचा वापर करण्यासाठी उत्तम मानले जाते. घरात झाडू ठेवताना वा त्याचा वापर करताना वास्तुशास्त्राच्या दृष्टीने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण त्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घरातल्या सदस्यांवर कायम राहातो म्हणतात.

तुमच्या घरात जर झाडू तुटला, विखुरला गेला तर तर त्याचा वापर करू नका. तो पुन्हा बांधून काहीजण तो झाडू पुन्हा वापरू लागतात. पण वास्तुशास्त्रानुसार तुटलेला झाडू पुन्हा वापरणे चुकीचे आहे. झाडू, खराटा एकदा तुटला की तो पुन्हा जोडून वापरणे अशुभ मानले गेले आहे.

येथे झाडू ठेवू नये
झाडू ठेवण्यासाठीही खास एक विशिष्ट जागा ठरवून ठेवा. तो त्याच ठिकाणी रोज ठेवा. मात्र घरातील किमती सामान, दागदागिने, पैसाअडका ज्या ठिकाणी ठेवता तेथे चुकूनही झाडू ठेवू नका. चुकूनही या ठिकाणी झाडू ठेवाल तर व्यवसाय, संपत्तीवर दुष्परिणाम होईल हे विसरू नका.

आणि त्याचबरोबर मित्रांनो खुर्ची गोष्ट झाडू संबंधित अगदी महत्त्वाचे आहे ती म्हणजे झाडू उभा ठेवणे टाळाझाडून झाले की, विशिष्ट जागी ठेवतानाही झाडू उभा ठेवू नका. तो जमिनीवर पाडलेल्या अवस्थेतच ठेवा. कारण उभ्या स्थितीत ठेवलेल्या झाडूमुळे अपशकून होतात असे वास्तुशास्त्राने म्हटले आहे. तुमच्या घरात बँक बॅलेन्स नेहमी कमी राहात असेल तर काहीवेळा घरात उभा झाडू हेही त्याचे एक कारण असू शकते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या घरामध्ये कधीही संध्याकाळी झाडू मारू नका. संध्याकाळच्या वेळी झाडून काढू नका असे आजी-आजोबा कानीकपाळी ओरडून सांगायचे, पण आपण लक्ष देत नाही. पण ते खरेच आहे. कारण असे केल्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते. यामुळे संध्याकाळी घर वा ऑफीसमध्ये कधीच झाडू नका. अगदीच नाईलाजाने झाडावे लागलेच तर साठलेला कचरा घराबाहेर टाकू नका. तेवढे तरी कराच.

मित्रांनो त्यानंतर ची पुढची गोष्ट अशी आहे की झाडूला पाय लावू नका. झाडूला लक्ष्मीचा दर्जा दिला गेला आहे. त्यामुळे झाडूला पाय लावायचा नाही, पायाने झाडू दूर लोटायचा नाही हे पक्के लक्षात ठेवा. कारण को झाडूचा नाही, तर लक्ष्मीचा अपमान होतो. ज्या ठिकाणी अशा रीतीने झाडूचा अपमान होतो तेथे आर्थिक समस्या हमखास असतातच.

आणि झाडू हा नजर दोषासाठी पण चांगला असतो अगदी लहान बाळ जेव्हा रडत असते तेव्हा या झाडूचा एक भाग काढून घ्यायचा आणि त्याचे सात आठ तुकडे करून आपल्या उजव्या मुठीत घ्यायचे आणि बाळाच्या अंगावरून सात वेळेस उतरवायचे आहे बाळाचे रडणे लगेच थांबेल आणि ते तुकडे लांब फेकून द्यायचे आहे अशा या झाडू चे भरपूर उपयोग आहे हे तुम्ही अमलात आणा आणि त्यातून काय फरक पडतो ते पहा.

आणि झाडू हा नजर दोषासाठी पण चांगला असतो अगदी लहान बाळ जेव्हा रडत असते तेव्हा या झाडूचा एक भाग काढून घ्यायचा आणि त्याचे सात आठ तुकडे करून आपल्या उजव्या मुठीत घ्यायचे आणि बाळाच्या अंगावरून सात वेळेस उतरवायचे आहे बाळाचे रडणे लगेच थांबेल आणि ते तुकडे लांब फेकून द्यायचे आहे अशा या झाडू चे भरपूर उपयोग आहे हे तुम्ही अमलात आणा आणि त्यातून काय फरक पडतो ते पहा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!