Thursday, February 29, 2024
Homeअध्यात्मचुकूनही करु नका आज 'ही' कामे.. पितरांचा होईल अनादर..

चुकूनही करु नका आज ‘ही’ कामे.. पितरांचा होईल अनादर..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. हिंदू पंचांगनुसार आज अमावस्या आहे. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे हिला सोमवती अमावस्या असंही म्हणतात. याला माघ अमावस्या असंही म्हणतात. या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की आजच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होत असतं.

आजची अमावस्या ही खास आहे. आज पितरांची पूजा केली जाते. असं मानलं जातं की. या दिवशी पूर्वज प्रसन्न होतात आणि वंशजांना आशीर्वाद प्राप्त होतो. तेव्हा आजच्या दिवशी आवर्जून काही चुका टाळा.

ज्योतिषशास्त्रानुसार, पूर्वजांच्या आशीर्वादाने व्यक्तीसाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. कुटुंबात सुख-शांती नांदते. पूर्वजांना राग आला तर वंशजांना कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं असं म्हणतात. घरात कलह निर्माण होऊन व्यक्तीच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात.

त्यामुळे आजच्या दिवशी चुकूनही काही कामं करु नयेत असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. माघ अमावस्येला या गोष्टी चुकूनही करु नका- सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना जल अर्पण अवश्य करा. या दिवशी चुकूनही पितरांचा अनादर करू नका.

गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना अन्न खायला द्या. हे अन्न पितरांना मिळतं असं म्हणतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी चुकूनही या जीवांना त्रास देऊ नका. तुम्ही घरी जे काही अन्न शिजवाल, त्यातील काही भाग या प्राण्यांनाही द्या.

अमावस्येच्या दिवशी पूर्वज आपल्या वंशजांच्या मार्फत तर्पण, पिंडदान, श्राद्ध इत्यादींची प्रतीक्षा करतात. ते मिळाले नाही तर ते त्यांच्या वंशजांवर रागावतात. दुःखी होऊन वंशजांना शाप देतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी मांस, मद्य आणि इतर उपद्रवी पदार्थांचं सेवन करू नये. असे केल्याने नकारात्मकता वाढते. एवढंच नाही तर ते तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करतात. यासोबतच अमावस्या तिथीला ब्रह्मचर्य नियमांचं उल्लंघन करू नये. यासोबतच अमावस्येच्या पूजेच्या वेळी पितृसूक्त किंवा पितृ स्तोत्राचे पठण केल्यास शुभ फळ मिळतं.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स