डेटिंग अ‍ॅपवर 15 ते 20 वर्षांनी लहान तरुण जेव्हा एका तरुणीच्या मागे लागतो… एका महिलेचा अनुभव..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, डेटिंग अ‍ॅपवर ती महिला अनेक दिवसांपासून आहे, ती देखील इतरांप्रमाणे जोडीदार-मित्र शोधत असते. एकानंतर एक स्वाईप करत फोटो आणि आवडीनिवडी आणि वय पाहत असते. पाहून अंदाज लावत असते हा जोडीदार किंवा मित्र कसा असेल, अनेक वेळा स्वाईप करुन काहीही ठरवणं सोडून देते, कारण डेटिंग अ‍ॅपवर तिला जे अनुभव येतात ते चक्रावून टाकणारे आहेत. मुंबई, पुणे या सारख्या शहरात सर्वांची मनाची अवस्था अगदी वेगळीच झाली आहे, आणि ती डेंटिंग अ‍ॅपवर दिसून येत आहे.

डेटिंग करणाऱ्या एका महिलेने सांगितलं वास्तव – डेटिंग अ‍ॅप फक्त पैसे कमवण्यावर भर देत आहेत, पण इगो असणाऱ्या लोकांचा हा मेळा आहे, याचाच फायदा डेटिंग अ‍ॅप घेतंय, असं देखील वाटतं, यात अनेक लोक आपल्या इगोमुळे कुणालाही आपलंस करु शकले नाहीत म्हणून एकटे आहेत आणि डेटिंग अ‍ॅपवरही त्यांची अवस्था तशीच होते.

येथे तुमचं वय किती, तुमचं आणि तिचं राहण्याचं अंतर किती किलोमीटर, आवडीनिवडी काय, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, हे निवडण्यात पाहण्यातच अनेक रात्री आणि दुपार वाया जातात.

मी देखील आहे डेटिंग साईटवर – मी देखील डेंटिंग साईटवर आहे, माझ्या मागे इथे अनेक जणं मागे लागतात, इतर महिलांप्रमाणे, पण माझ्यावयापेक्षा लहान मुलं माझ्यामागे का लागतात. हा प्रश्न पडतो. ते माझ्यापेक्षा तसे लहान असतात, 15 ते 20 वर्षांनी, या तरुणांना माझ्यासारख्या महिलेशी मैत्री का करायची आहे, हेच मला सुरुवातीला समजत नव्हतं, पण काही अनुभव फार भयानक आणि तेवढेच महत्त्वाचे आणि पुढील नुकसान टाळणारे असतात.

प्रेम वैगरे काही नसतं, बस्स एखादी गोष्ट अचानक डोक्यात समोरासमोर चांगले सहकारी असताना मनमोकळं करण्यासाठी मित्र न जोडता डेटिंग अॅपवर शोधणाऱ्यांची संख्याही तशी कमी नाहीय. ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपवर ही हिंमत होते पण प्रत्यक्षात का नाही, यात प्रेम वैगरे काही नसतं, बस्स एखादी गोष्ट अचानक डोक्यात क्लिक होते, आणि तिच्या मागे आपण धावत असतो. अनेक मुली यात माती खातात असं ती महिला सांगते.

मैत्रिणीचा अनुभव – एक माझी मैत्रीण मेडिकलची स्टुंडंट होती, आता डॉक्टर आहे, तिने दुकानावर काम करणाऱ्या मुलाशी प्रेम केलं. दुकानावर काम करणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडू नये, असं कुणी म्हटलेलं नाही, पण दूरवरचा संसाराचा प्रवास पाहून नक्कीच सर्व बाबतीत विचार करावा, तिचं लग्न काही महिन्यानंतर मोडलं आता दुसरं केलंय, नीट चाललंय, पण तो जो फटका बसला त्याने ती हादरलीय, त्या मुलाचंही नक्कीच नुकसान झालं.

लग्न झालेले माझ्या नात्यातले ते इथे – एकमेकांना लवकर न स्वीकारणारे डेटिंग अ‍ॅपवर आहेत, सर्वच नाहीत, पण ही संख्या मोठी आहे, ही फक्त काल्पनिक दुनिया आहे एकमेकांना पाहणारी आणि सुखावणारी, लग्न झालेल्या बायका-पुरुष देखील डेटिंग अॅपवर आहेत, ते का आहेत मला माहित नाही, लग्न झालेल्या माझ्या नात्यातल्या अनेकांना मी खूप यावर पाहिलं आणि त्यांची खूप गंमत केली आहे, तू इथे काय करतोयस, पण पर्याय नसतो, मन काय विचार करेल याचा.

कमवणाऱ्या मुलींनो सावधान – ज्या मुली जॉब करतात, पुढील संसारासाठी पैसे जमा करतात, त्यांनाच मॅट्रोमनी आणि डेटिंग साईटवर सर्वात जास्त फसवलं जातं, असे सराईत फसवणारे आहेत, ते फसवतायत हे मुलींना फार उशीरा कळतं पुणे बंगळुरूसारख्या शहरात तर मुली आयटीसारख्या क्षेत्रात बड्या पगारावर काम करतात आणि त्यांचे बॉयफ्रेन्ड हे काय करतात, असं विचारलं तर त्या सांगतात काहीच नाही.

टपोरी मुलं आणि बॉयफ्रेन्ड – बॉयफ्रेन्ड काहीच करत नाही असं नाही, तो त्या चौकातला, त्या भागातला टपोरी असतो, पुढची माहिती घेतली तर ते, या मुलींकडून पैसे घेतात आणि बाईकने फिरणे, खाणे पिणे भागवतात, शुक्रवारी दारुच्या दुकानावर लाईन लावून दारु आणायचं काम केलं.

तरी किती भलं मोठं काम केलं, सुपरमॅनने एक उडी मारुन बाटली दुकानातून काढून आणली असं मुलींना भासवतात, मी मुलींना सांगेन, मुलींनो अशा आभासी जगातून नक्कीच बाहेर या.आपल्या कुटूंबियांशी नेहमी संवादात राहा, त्यांच्या प्रेमात राहा. कारण ते परवडणार आहे.

कमी वयाची मुलं माझ्यामागे का लागतात.?
डेटिंग अ‍ॅपवर कमी वयाची मुलं माझ्यामागे का लागतात, हा प्रश्न माझा वरील अनुभवावरुन सुटला, त्यांना माझ्याकडे एखादं वाहन दिसतं, फिरणं, हॉटेलिंग आणि एकटी महिला आणि, ती चांगला पगार कमावते, हे त्यांना दिसतं.

या महिलेचं मन जिंकलं तर पॉकेटमनीच्या पुढचा पैसा देखील आपल्या हातात येईल हे मनसुबे असतात, हेच त्यांच्या प्रथम संवादात मला जाणवलं आहे. म्हणून डेटिंग अ‍ॅपवर अशा मुलांकडून प्रेम वैगरे काही नसतं, ते उघड्या डोळ्यांनी पाहा, तुम्हाला त्यामागे खूप काही दिसेल, पैसे लुटण्याचा हा सोपा मार्ग ते शोधतात एवढाच अनुभव तुमच्यासाठी खूप काही आहे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment