देवळातून आपली चप्पल किंवा बूट चोरीला जाण्याचे संकेत म्हणजे शुभ आहेत की अशुभ..?

देवळातून आपले बूट किंवा जोडे चोरीला जाणे म्हणजे शुभ की अशुभ?

मित्रांनो देवळातून आपली बूट किंवा जोडे किंवा चप्पल चोरीला जाणे म्हणजे शुभ की अशुभ याबाबत विविध तर्कवितर्क लावले जातात. मात्र याबाबत खरे काय आहे हे जाणून घेऊया खालील प्रमाणे…

आपणाला माहीतच आहे पूर्वीपासून वडील आपल्याला सांगत आले आहेत की चप्पल चोरीला जाणे म्हणजे आपल्या मागील काही आहे ती इडा पिडा निघून जाणे.

मित्रांनो शनिवारी चप्पल चोरीला जाणे म्हणजे आपल्या पाठीमागे असलेली वाईट पीडा किंवा दुर्भाग्य जाऊन आपल्याला आपल्या चांगल्या नशिबाची गाठ पडणे होय.

गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या संस्कृतीमध्ये चप्पल चोरीला जाणे किंवा बूट चोरीला जाणे अशुभ किंवा शुभ मानणे तसेच या गोष्टीवरून आपणाला लागलेली शनि अथवा वाईट वेळ निघून गेली किंवा निघून जाईल असे वेगवेगळे तर्क-वितर्क मानले जातात चर्चिले जातात.

मित्रांनो आपल्या तर माहीतच आहे गर्दीच्या ठिकाणी तसेच बऱ्याच ठिकाणी चप्पल चोरीला जातात असे आपल्या समोर आले आहे. अशा ठिकाणाहून चप्पल चोरीला जाणे ही गोष्ट आता सामान्य झाली आहे.

बऱ्याच ठिकाणी चप्पल चोरीला जाऊ नये म्हणून मंदिरात वगैरे चप्पल स्टैंड ची व कॅमेराची सुविधा उपलब्ध केलेली आहे.

चप्पल चोरीला जाणे किंवा चोरणे
प्राचीन काळापासून चप्पल किंवा बूट चोरणे हे अशुभ आहे. परंतु आपले शनिवारी चप्पल किंवा बूट चोरीला जाणे म्हणजे आपल्या पाठीमागील शनी दोष नाहीसा होणे होय.

चोरी होणे म्हणजे आपल्या धनाची हानी होणे असे मानले जाते. परंतु शनिवारी चप्पल किंवा बूट चोरीला जाणे म्हणजे शुभ मानले आहे.

शनिवारी जर पायातील जोडे चोरीला गेले तर वाईट न वाटून घेता आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे. याची कल्पना घेऊन चोरीला गेलेल्या चामड्याच्या चपला बद्दल व्यक्त करू नये.

लोकांना शनिवारी चप्पल गेल्या मुळे होणारे फायदे माहीत आहेत ते लोक शनिवारी मंदिराच्या बाहेर चप्पल स्वतःहून ठेवून येतात.

शनिवारी चप्पल चोरीला गेल्यामुळे अनेक लाभ होतात. चामड्याचे जोडे जर चोरीला गेले तर त्याबरोबर आपल्याला होणारा त्रास ही निघून जातो असे मानले जाते.

वास्तविक पाहता ही गोष्ट सांगणे म्हणजे काही नवीन नाही ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासामुळे ही गोष्ट सर्वसामान्यांपर्यंत माहितीची आहे. शास्त्रामध्ये शनीला खूप क्रूर व कठोर ग्रह मानले आहे.

शनि एखाद्याला जर चांगले फळ देतो तर त्याच्याबद्दल त्याच्याकडून खूप मेहनत करून घेतो व त्याच्या बदल्यात त्याला थोडे फळ देतो. म्हणून शनीला कठोर मानले जाते.

शनीची साडेसाती
ज्या लोकांच्या पत्रिकेत शनीची साडेसाती असेल अशा लोकांना खूप त्रास देतो. या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तसेच त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर ही दिसून येतात.

वाईट ग्रहामुळे शरीरावर हे वाईट परिणाम होतात. जसे की आपल्या त्वचा( चमडी) यामध्ये शनीचा वास असतो. म्हणूनच पायाने त्वचेच्या संबंधित असलेल्या वस्तू जर आपण शनीच्या निमित्त्याने दान केल्यास त्याचे फळ आपल्याला चांगले मिळते.

त्याचबरोबर जर आपल्याला पाय आणि त्वचे संबंधित काही आजार असतील तर त्यातून आपली सुटका होऊ शकते. आपली त्वचा व पाय यांचा कारक ग्रह शनी असल्यामुळे जर आपले बूट किंवा जोडी शनिवारी शनी ग्रहाच्या कोपापासून आपली सुटका झाली असे समजावे व आपल्याला होणारा त्रास कमी होणार आहे असे समजून जावे.

जर आपल्याला हा त्रास कमी करून घ्यायचा असेल तर आपण स्वतःहून देखील शनिवारी आपले जोडे मंदिराबाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी सोडून येणे खूप फायद्याचे आहे. असे केल्यामुळे शनीच्या कष्टातून आपली सुटका होईल.

मित्रांनो या लेखांमध्ये जी माहिती सांगितली आहे ती आत्तापर्यंत ऐकिवात असलेल्या तर्क-वितर्क तसेच अनुभवी व धार्मिक लोकांच्या चर्चेवर अवलंबून घेतलेली आहे.

या अशा प्रकारच्या क्रिया करणे त्याचबरोबर त्याचा लाभ मिळवून घेणे या सर्व गोष्टी करत असताना आपली आपल्या कामाबद्दलचे प्रेम तसेच आत्मविश्वास असला तर नक्कीच याचाही उपयोग आपणाला चांगला होतो असे जाणकारांचे मत आहे.

मित्रांनो आपणाला आमचा हा लेख आवडला असल्यास आत्ताच आमचे पेज लाईक करा तसेच शेअर करायलाही विसरू नका.

Leave a Comment