नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो देवाजवळ काय मागावे आणि मागितल्याशिवाय मिळत नाही. हा व्यवहारात नियम आहे. पण आई, देव किंवा गुरु न मागताच आपल्याला भरपूर काही देतात.
म्हणून त्यांच्याजवळ मागण्याची गरज राहत नाही.आपल्या स्वामींकडे सुद्धा काही मागण्याची गरज राहत नाही. करण स्वामीं एक परमशक्ती आहे. दैवीक शक्ती आहे.
त्यांना भक्तांच्या मनातले व भक्ताला काय हवे आहे ते सगळे कळते. देवाला सर्व काही कळतेच. आपल्याला योग्य तेही तो देतच असतो. पण त्याच्याजवळ मागायची इच्छा का व्हावी.
पण तरी हि तुम्हाला मागायची असेल तर असे मागा मला तु ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत मला आनंद दे. म्हणजे मला समाधान राहील. दुसरे काही मागण्याची इच्छा होऊ देऊ नकोस.
किंवा भगवंता सांगा हे भगवंता तू दाता आहेस. तू सर्व उच्चीत करणारा आहेस. योग्य तेच करणारा आहेस. तेव्हा मी तुझ्याजवळ काही मागण्यापेक्षा परमात्मा तुला जे योग्य वाटेल ते तू मला दे.
ज्यात माझं कल्याण आहे तेच तू करशील यात मला शंका नाही. मग मी काही मागून माझ्या पायावर धोंडा पडण्यापेक्षा परमात्मा तु जे देशील त्यात मी समाधान राहील.
देवा माझे खरे हित आहे तेच मला दिसो. तेच मे ऐको. त्याचेच मला स्मरण होवो. आणि त्याचीच मला गोडी लागो. म्हणून मित्रांनो देवाजवळ काय मागावे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल.
तर कोणतीही इच्छा, कोणताही लोभ मनात नसावा. फक्त पूर्ण मनोभावाने पूर्ण श्रद्धेने देवाची सेवा करावी. आणि काही मागायचे असेल तर आनंद मागावा, शांती मागावी.
आणि देवाला सांगावे हे माझ्यासाठी योग्य आहे तेच तू मला दे. बाकी मला काही ही नको. आणि माझ्यासोबत माझ्या संकटाच्या वेळी माझ्या समस्या असतील तेव्हा तू माझ्यासोबत राहा.
वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!