देवदर्शनाला गेल्यानंतर मंदीराच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी घंटानाद का केला जातो..???

मित्रांनो, जेव्हा पण आपण मंदिरात दर्शनासाठी गेले असणार, तेव्हा गाभाऱ्यात प्रवेश करण्याच्या आधी, आपण सर्वांनीच गाभाऱ्यात बांधलेली घंटा वाजविली असणारच…

परंतु मित्रांनो, या कृतीच्या मागे, घंटा वाजविण्याच्या मागचे काय कारण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का..?? नाही ना.. मग आज आपली ‘रॉयल कारभार’ टिम तुमच्या साठी घेऊन आली आहे एक नविन आणि अनोखा विषय.. आज आम्ही तुम्हाला मंदीरात टांगण्यात येणाऱ्या घंटेबद्दल माहिती सांगणार आहोत..

आपणा सर्वांना माहितच आहे की मंदिरात जाण्यापूर्वी घंटी वाजविली जाते. आपण भक्तगण मंदिरात जाण्यापूर्वी अतिशय श्र-द्धा पूर्वक घंटा वाजवत असतो.

हिं-दू ध-र्माशी संबंधित असलेल्या धा-र्मिक स्थळांच्या बाहेर मोठी घंटा लटकलेली आपण पाहिली असेलच. पण तुम्ही कधीच विचार केला नसेल की मंदिरात जाण्यापूर्वी घंटा कशासाठी वाजविली जाते..!! आम्ही आपल्याला आज आपल्याला यामागील अचूक कारण सांगणार आहोत..

मित्रांनो खरं तर, प्राचीन काळापासूनच मंदिर आणि देवालयांच्या बाहेर घंटा बसवण्यासाठी सुरुवात झाली होती. असं म्हणतात की आहे की ज्या ठिकाणी धा-र्मिक स्थळांवरुन सतत या टांगलेल्या घंटेचा घंटानाद येत असतो त्याठिकाणाचे वातावरण नेहमीच सुखद आणि पवित्र राहते. तेथे वा-ईट शक्तींचा लवलेशही नसतो तथापि त्या वा-ईट शक्ती पूर्णतः दूर राहतात.

तर मित्रांनो, याच कारणासाठी, सकाळी व संध्याकाळी मंदिरामध्ये आरती करतांना हा घंटानाद केला जातो आणि खास सूरही वाजविले जातात. त्याचमुळे मंदीराच्या परिसरातील वातावारण शांत आणि प्रसन्न राहते, व तेथे उपस्थित भक्तांना शांतता तसेच दैवी आशिर्वाद सुद्धा प्राप्त होतो.

यात काही लोकांचा असाही विश्वास आहे की या घंटानादामुळे मंदिरात असलेल्या स्थापित देवी तथा देवतांच्या मूर्तींमध्ये चैतन्य जागृत होत असते, ज्यामुळे आपण केलेली देवाची उपासना आणि साधना अधिक प्रभावी होते आणि फलास लाभते.

पुराणात देखील असेही म्हटले आहे की मंदिरात घंटा वाजविल्यास मानवी जन्मातील अनेक पा-पांचा नाश होतो. सृष्टीच्या सुरूवातीपासूनच, मंदिराची घंटी वाजवल्यानंतर आजही पुन्हा तोच आवाज ऐकू येतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे लक्षात घेण्यासारखे आहे की ॐकाराच्या दिर्घ उच्चारातूनही हाच ध्वनी ऐकू येतो.

प्रत्येक देवालयाच्या बाहेरील घंटा देखील काळाचे प्रतिक मानली जाते. आणि बर्‍याच ठिकाणी असेही लिहिले गेले आहे की जेव्हा या जगाचा शेवट होईल त्यावेळी देखील तोच ध्वनी म्हणजेच एक मोठा घंटानाद होईल.

टिप – वरील लेख केवळ धा-र्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अं-धश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

Leave a Comment