Monday, December 4, 2023
Homeअध्यात्मदेवघर : संपूर्ण माहिती : दिशा स्थान काय ठेवावे काय ठेऊ नये.....

देवघर : संपूर्ण माहिती : दिशा स्थान काय ठेवावे काय ठेऊ नये.. श्री स्वामी समर्थ..!!

देवघर (संपूर्ण माहिती) दिशा, स्थान
काय ठेवावे, काय ठेवू नये : श्री स्वामी समर्थ!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, घरातील पूर्व व उत्तर दिशा या दोन्ही दिशेमधील जागा म्हणजे ईशान्य दिशा. याच जागेमध्ये घरातील वास्तु पुरुषाचे डोके असते. ही जागा आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा असते.

या ठिकाणी ईश्वरतत्व काम करत असते. पूजा पाठ करण्यासाठी. मंत्र साधनेसाठी ही अगदी योग्य दिशा आहे. काही कारणाने किंवा चुकून आपल्याला माहीत नसल्याने काही जड वस्तू, केरकचरा, भंगार सामान याठिकाणी ठेवतात.

त्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीचे डोके सारखे दुखते. किंवा जड जड वाटते तर काहींना डोक्यावरती नेहमी टेन्शन असते. काहीना काही दबाव मध्ये व्यक्ती जीवन जगत असते.

जर आपल्या घरात ईशान्य दिशेने मध्ये देवघर बनवणे शक्य नसेल तर देवघर आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला बनवू शकतो. पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशा चालू शकते पण दक्षिणेला तोंड करून देवाचे फोटो ठेवू नये हे शास्त्र सहमत नाही.

घरातील मंदिराला कळस असू नये नाहीतर ते मंदिर होते. देवघर हे देवघरच असावे. ते मंदिर असू नये. एकाच देवाचे फोटो किंवा मूर्ती देवघरात असावे. दोन किंवा अधिक ठेवू नये. त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात. जर असतील तर त्यांची क्षमा मागून त्या फोटोचे विसर्जन करावे.

देवाचे व देवीच्या फोटोची प्रेम चांगली असावी. सडलेली कुजलेली नसावी. फाटलेली नसावी. किंवा तडकलेली नसावी. असे असेल तर लगेच बदलावी. तसेच काही फोटो पाठवलेली असतात त्यांना विसर्जन करावी. आणि नवीन आणावे.

हातपाय तुटलेली मूर्ती कधीच पुजू नये. ती माफी मागून विसर्जन करावी. तसेच डोळे चेहरा अस्पष्ट असेल तर ती ही मूर्ती बदलून घ्यावी. आपल्या पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवू नये.

आपले पूर्वज आपल्यासाठी कितीही महत्त्वाची असली तरीदेखील देवाची जागा घेऊ शकत नाहीत. तसेच धार्मिक गुरूंची फोटो देवघरात लावू नये. नैऋत्य दिशा ही पितर व गुरूंचे आहे याठिकाणी लावल्यात आपल्याला कार्यात यश प्राप्त होते.

साल, चंदन शिसे या लाकडापासून देवघर बनवणे अति योग्य आहे. मंदिरावर म्हणजेच देवाचे डोके येतात जर आपण मंदिराच्या वरती अगरबत्ती, तेलाची बाटली, कापूस, घंटी, कुंकू, विभूती, आरतीचे पुस्तके, धूप इत्यादी ठेवलेली असेल तर हे चुकीच आहे.

हे देवांच्या डोक्यावर भार असते. म्हणून असे साहित्य मंदिरावर कधीच ठेवू नये. सकाळ संध्याकाळ पूजा करावी. देवाला धूप, अगरबत्ती, आरती करावी. घंटी आणि शंख वाजवावा.

आपल्या श्रद्धेप्रमाणे पूजा करावी. धूप, घंटी व शंख यामुळे आपल्या घरात पॉझिटिव ऊर्जा निर्माण होते. आणि आपण अगदी आनंदी राहतो. जशी आपली श्रद्धा असेल तसे आपल्याला परमेश्वर फळ देतात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स