Saturday, June 10, 2023
Homeजरा हटकेदेवघरात असा ठेवा एक कुलदेवतेचा कळस, घरावर कधीच कोणती अडचण, बाधा येणार...

देवघरात असा ठेवा एक कुलदेवतेचा कळस, घरावर कधीच कोणती अडचण, बाधा येणार नाही.!!

मित्रांनो आपण आपल्या देवघरात एक कळस नक्की ठेवावा. यामुळे घरावर आणि कुटुंबावर कधीच कोणती अडचण येत नाही, संकट येत नाही, समस्या येत नाहीत.

मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की आपल्या परिवाराची किंवा कुटुंबाची एक कुलदेवी किंवा कुलदेवता असतात. आणि आपल्याला माहीत पाहिजे की आपली कुलदेवी व कुलदेवता कोण आहेत ते.

काहींना माहीत नसतात त्यांची काही हरकत नाही. पण आपल्या देवघरामध्ये कायमस्वरूपीचा एक कळस आपण अवश्य ठेवायला पाहिजे. आता हा कळस आपण कशा रीतीने व कशा पद्धतीने ठेवावा ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सर्वात प्रथम तुम्ही एक दिवस ठरवून घ्या. जसे की मंगळवार, शुक्रवार हे देवीचे वार असतात. काहींचे सोमवार असतील, काहींचे गुरुवार असतील. शक्यतो जास्त करून कुलदेवीचा वार मंगळवार असतो.

तर मंगळवारच्या दिवशी तुम्ही कळस ची स्थापना करा. कळससाठी काय लागेल तर एक नारळ लागले. एक तांब्याचा तांब्या लागेल. त्यामध्ये शुद्ध पाणी, त्यामध्ये टाकण्यासाठी एक रुपयाचे नाणे. आणि एक सुपारी पाहिजे.

तुम्ही मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून, आंघोळ वगैरे करून तुम्ही देवघरासमोर जाऊन बसा. तिथे तांब्याचा तांब्या मध्ये शुद्ध पाणी घ्या. त्यामध्ये एक सुपारी व एक रुपये नाण्याचा सिक्का टाका.

त्यानंतर हळदी, कुंकू आणि अक्षदा टाका. आणि त्यावर विड्याचे पाच पाने लावा. नाहीतर आंब्याची पाणी लावली तरी चालेल. आणि त्यानंतर त्यावर नारळ ठेवावा. नारळ हा सोललेला नसायला पाहिजे.

तो नारळ आपण त्यावर ठेवायचा. आणि तो कळस आपण आपल्या देवघरात पूर्व बाजूला ठेवून द्यावा. म्हणजे तुम्ही आपल्या उजव्या हाताला तो कळस ठेवून द्या. अशारीतीने कळसाची स्थापना आपण आपल्या देवघरात करावी.

तो नारळ बदलायचा नाही कायमस्वरुपी तो नारळ तसाच ठेवायचा. समजा जर नारळ कधीतरी खराब झाला किंवा फुटला आणि ते आपल्याला दिसला. तेव्हा आपण तो नारळ पाण्यात प्रवाहित करावा. आणि त्या जागी आपण दुसरा नारळ ठेवावा.

तर कळसावर लावलेली पाणी आपण दर मंगळवारी बदलावी. म्हणजे ज्या दिवशी आपण कळसाची स्थापना केली असेल त्यानंतर आठ दिवसाने बदलावी. आणि त्यानंतर त्यावर दर आठवड्याला नवीन पाने आणून लावावी.

आणि ज्यावेळी नारळ खराब होईल त्यावेळी तो बदलून तिथे नवीन नारळ ठेवावा. तर अशा रीतीने तुम्ही देवघरात कळसाची स्थापना करू शकता. आणि रोज त्या कळसाचे पूजा आपल्या देवघरात व्हायला हवी याची काळजी घ्यायची.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स