नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या धर्मशास्त्रात देवघर आणि सायंकाळच्या वेळेत तेथे लावण्यात येणाऱ्या सांजवातेला फार महत्त्व आहे.
आपल्या देवघरातील समईची किंवा नंदादीपची वात जर कधी या चुकीच्या दिशेने असेल तर आपल्या घरात कधीच पैसा हा टिकणार नाही. तसेच तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश देखील मिळणार नाही.
त्याचबरोबर अश्या काही गोष्टी घडतील की ज्यामुळे आपले भविष्यात तोटा आणि नुकसानच होत राहणार. त्यामुळे हे असे होऊ नये यासाठी ही देवघरातील समईची वात कोणत्या दिशेला असायला हवी याची योग्य ती सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो, याच विषयाला अनुसरून आपल्या देवघराचे, तसेच देवघरातील देवांचं मुख कोणत्या दिशेला असावे? घरातील देवांच्या मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी? देवपूजा झाल्यानंतर गंध आपल्या हाताच्या कोणत्या बोटाने व कुठे कसा लावावा?
मित्रांनो, याचबरोबर देवघरातील दिवा किंवा समईची वात कोणत्या दिशेला ठेवावी? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. आपल्या दिवा जवळील वात कुठल्या दिशेला असावी. ज्याचा आपल्याला बराच फायदा होईल. महत्वाच्या कामामध्ये लवकर यश प्राप्त होईल. कधीही कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. हातांमध्ये पैसा टिकून राहील. चला तर मग या श्रद्धेबाबतची सखोल माहिती घेऊयात.
मित्रांनो, या माहिती साठी सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की घरातील देवांच्या मूर्तीचे मुख हे दक्षिण दिशेला कधीही असू नये. यामुळे घरातील कुणाचेही मृ त्यू चे योग संभवतात. कारण की या दिशेला यमराजाची दिशा समजली जाते. तसे शास्त्रात देखील नमूद करण्यात आलेलं आहे.
मित्रांनो, तसेच आपल्या घरात देवपूजा करताना काही ना काही अडचणी येत असतात. परंतु कितीही अडचणी आल्या तरी आपली देवपूजा ही आपण मन एकाग्र करूनच केली पाहिजे. काही वेळेस असे होते की आपल्या घरातील लहान मुलेच आपल्याला पूजेच्या वेळी त्रास देत असतात. आणि हा विषय जरी आला तरी देवांना तो मान्यच असतो. कारण लहान मुले म्हणजे देवाचंच रूप असतात.
मित्रांनो, देवपूजेतील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या घरात काही देवाच्या खराब मूर्ती किंवा प्रतिमा असतील तर त्या ताबडतोब बदलून टाकाव्यात. त्या ठिकाणी नवीन मूर्ती किंवा प्रतिमा आणून ठेवायला हव्यात.
आणि या जुन्या खराब झालेल्या मूर्ती व प्रतिमा यांनी नवे वाहत्या पाण्यातच सोडाव्यात. वाहते पाणी जवळ उपलब्ध नसल्यास पिंपळाच्या झाडाखाली या खराब मूर्ती व प्रतिमा नेऊन ठेवाव्यात.
देव पूजा झाल्यानंतर जो गंध लावतो आपण तो गंध नेहमी आपणा स्वतःला लावताना मधल्या मोठ्या बोटाने लावून घ्यावा. आणि देवाला लावताना करंगळी च्या बाजूचे बोट आहे त्या बोटाने लावा.
मित्रांनो, याबाबत स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोषातही तसेच वेगवेगळ्या शास्त्रानुसार आपण आपल्या घरातील देवाजवळ जे दिवे लावतो, समई लावतो, किंवा पणती लावतो ते नेहमी १ किंवा ३ किंवा ५ अशा विषम संख्येतच लावावेत. याच बरोबर हा दिवा किंवा पणती ठेवण्याची घरातील दिशा ही दक्षिण दिशा कधीच असू नये.
दक्षिण दिशेला दिवा ठेवल्याने किंवा लावल्याने घरात वारंवार वेगवेगळ्या समस्या निर्माण होत राहतात. काही प्रसंगांमध्ये मृत्यू देखील ओढवला जाऊ शकतो.
आपल्या घरातील दा रि द्रय पणा किंवा आजारपण हे लवकर हटत नाही. येणाऱ्या पैशांना नेहमीच काहीना काही वेगळ्या कारणाने ख र्च जोडला जाऊ शकतो. आणि आपल्या घरातील लक्ष्मी टिकत नाही. घरामध्ये सदैव नकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहते.
तर मित्रांनो, आपल्या लक्षात घ्या की आपणाला घरातील दिवा किंवा पणती ही नेहमी दक्षिण दिशेला कधिही लावू नये. घरातील देवपूजा ही मन एकाग्र करून करावी.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!