देवपूजेचे आहेत काही खास नियम, चुकूनही या देवतांची पूजा घरातील देवघरामध्ये करु नये..!!

नमस्कार मित्रांनो..,
आपल्या दिवसाची सुरुवात जर भगवंतांच्या पूजेने आणि देवी देवतांच्या उपासनेने झाली तर संपूर्ण दिवस कसा मंगलमय आणि आनंदात पार पडत असतो… मनाला एक असीम शांती लाभते.

परंतु देवपुजेचे देखील काही खास नियम आहेत त्यांचे आचरण करणे अतिशय आवश्यक मानले जाते. हे नियम पाळलेत तरच आपल्याला देवपुजेचे शुभ फळ प्राप्त होत असते. अन्यथा देवी देवतांची अवकृपा होते. चला तर मग बघूयात देवपुजेचे महत्वाचे असे नियम…..

हिंदु पुराणानुसार देवी-देवतांच्या पूजेच्या विविध पद्धती सांगण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, काही देवता केवळ पाण्याद्वारे प्रसन्न होतात, काही केवळ पाने व काही केवळ दुर्वाने प्रसन्न होतात. एखाद्या विशिष्ट दिवशी किंवा सकाळ संध्याकाळच्या पूजेमध्ये काय केले पाहिजे आणि काय करू नये हे देखील माहिती असायला हवे. कोणत्याही देवतेची उपासना करताना आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी हे ही जाणून घ्यायला हवे.

देवपुजेचे महत्त्वपूर्ण नियम –
योग्य पद्धतीने केलेली पूजा ही नक्कीच फलदायी ठरते. यामुळे ईश्वरी कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते.

1) हिंदू पुराणानुसार आपण किमान पाच देवता म्हणजेच भगवान श्री गणेश, भगवान शिव, देवी दुर्गामाता, भगवान सूर्यनारायण आणि भगवान श्री हरी श्री विष्णू यांची नियमित पूजा करायला हवी. सूर्यदेवाला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि श्री विष्णूंना चार, गणपतीला तीन, दुर्गादेवीला एक आणि भगवान शिव यांना अर्धी प्रदक्षिणा घालायला हवी. अशी पुराणात मान्यता आहे.

2) तसेच आपल्या घरातील देवघरात कधीही दोन शिवलिंग नसावेत. श्री गणेश यांच्या तीन मूर्ती किंवा गणपतीची तीन फोटो ठेऊ नये, दोन शंखही ठेऊ नये तसेच सूर्य देवाच्या दोन मूर्ती आणि दोन शालिग्राम कधीही ठेवू नये.

3) नटराज, कालभैरव, राहू-केतु आणि शनिदेव ह्या पाच देवांच्या मूर्तींची कधीही घरातील देव्हाऱ्यात स्थापना करू नये. या पाच देवांची नेहमी मंदिरात जाऊनच पूजा करायला हवी.

4) प्रत्येक देवाला त्यांच्या आवडीची वस्तू किंवा फूल अर्पण करूनच त्यांना संतुष्ट केल्याने आपल्याला पुण्य लाभते. जसे भगवान शिवजींना बेलपत्र अर्पण करावे, श्री विष्णूस तुळशीपत्र वाहावे आणि श्री गणपतीला दुर्वा व लाल जास्वंदीच्या फुलाने प्रसन्न करावे. सूर्य देवाला लाल कन्हेर चे फूल वाहावे. आदिशक्तीची साधना करताना दुर्गा देवीला लाल रंगाची फुले व लवंगा वाहायला हव्यात.

5 ) रोज सकाळी पूजेच्या वेळी शंख आणि घंटी वाजविल्याने नकारात्मकता नष्ट होउन घरात सकारात्मक वातावरण तयार होते. परंतु रात्रीच्या वेळी पूजा करताना शंख किंवा घंटी कदापि वाजवू नये, कारण देवांची निद्रा घेण्याची ती वेळ असते. त्यामुळे त्यांची झोपमोड केल्याचे पा-प आपल्याला लागते.

6) सर्व देवांच्या मूर्तींना गंगाजलाने स्ना-न केल्याशिवाय चंदन अथवा गंध लावू नये. हे देखील लक्षात घ्यावे की करंगळी शेजारील बोटणेच देवांना नेहमीच गंध किंवा तिलक लावावा.

7) देवपूजा करताना देवघराच्या उजव्या बाजूला निरांजणी म्हणजेच शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा. तसेच एका मान्यते नुसार एका दिव्याने दुसरा दिवा कधीच प्रज्वलित करू नये. देवपूजा करताना जर एखादी वस्तू नसेल तर त्याऐवजी अक्षता किंवा फुले अर्पण करावीत.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment