नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय हरी… !! ??आज आपण सर्वप्रथम आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीच्या व्रताबद्दल जाणून घेणार आहोत. हे एकादशीचे व्रत सर्वश्रेष्ठ मानलं गेलंय आणि सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीला एक वेगळंच आणि विशेष महत्त्व आहे.
या पवित्र दिवसापासूनच श्री हरी श्री विष्णू हे चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जात असतात आणि चार महिन्यानंतर म्हणजेच कार्तिकी एकादशीला श्री हरी योग निद्रेतून जागे होत असतात या चार महिन्यांच्या काळाला शास्त्रात चातुर्मास असे म्हटले जाते.
आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीचे फार मोठे महत्त्व आहे. जो कुणी हे एकादशीचे व्रत निर्मळ मनाने आणि मनोभावे करतो त्या त्याला त्याच्या मृ-त्यूच्या पश्चात मोक्ष प्राप्ती होत असते. तसेच हे व्रत करणार्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना श्री हरी श्री विष्णू पूर्ण करत असतात.
या पवित्र दिवसाला श्री विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने श्री वैष्णवांसोबतच माता लक्ष्मींचा देखील आशीर्वाद आपल्याला लाभतो आपल्या हिंदू धर्मात अनेक लोक हे व्रत करतात आणि श्री हरी श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करतात.
परंतु मित्रांनो, हा पूजाविधी करताना आपण काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करणे गरजेचे आहे नाहीतर या व्रताचं योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होत नसते. हा पूजाविधी किंवा हे व्रत करताना नकळत आपल्याकडून काही चुका झाल्यास पूजा विधी मध्ये एखादी गोष्ट राहून गेल्याने सुद्धा या व्रताचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही.
या एकादशीला आपण हे व्रत करताना कुठल्या नियमांचे पालन करायला हवे, एखादी गोष्ट अशी कोणती टाळायला हवी, ते आता आपण बघणार आहोत. आषाढी एकादशीचे व्रत करताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते सुद्धा सविस्तर पणे येथे तुम्हाला कळेल.
एकादशीचे हे व्रत ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपल्याला सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी लवकर उठायचं आहे शक्य झाल्यास ब्रह्मी मुहूर्तावर उठून आन्हिंक स्ना-न आदी आवरुन घ्यायचं आहे स्ना न करताना स्ना नाच्या पाण्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात गंगाजल टाकायचे आहेत आणि स्ना-न करतांना सप्त नद्यांची नावे घेतच आपल्याला स्ना न करायचे आहे.
असे केल्याने प्रत्यक्ष चंद्रभागेत स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असतं. स्ना न झाल्यानंतर श्री हरी श्री विष्णूंच्या तसेच माता लक्ष्मींच्या प्रतिमेची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे. मित्रांनो जर आपण श्री हरी श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करत नाहीत तोपर्यंत आपली पूजा ही अपूर्ण राहते. त्या पूजेचा भगवंत स्विकार करत नाहीत. आपण श्री हरी श्री विष्णूंना जो नैवेद्य अर्पण करणार आहोत. त्या नैवेद्यावर सुद्धा आपण तुळशीपत्र ठेवायचे आहे तरच श्री विष्णू आपला नैवेद्य ग्रहण करतात. मित्रांनो या दिवशी आपल्याला एक नियम असा पाळायचा आहे की आपण चुकूनही या दिवशी तुळशीपत्र तोडायचे नाही आहेत. या पूजेमध्ये आपण जे तुळशीपत्र वापरणार आहोत. ते आपल्याला एक दिवस आधीच तोडून ठेवायचे आहेत. असा नियमच आहे कोणत्याही एकादशीला आपण तुळशीपत्र तोडू नये. ज्या व्यक्तीला हे व्रत करावयाचे आहे, जो कुणी हा उपवास करणार आहे. त्या व्यक्तीने निदान त्या दिवशी तरी कुणालाही अपशब्द बोलायला नको, तसेच कुणाची निंदा देखील करू नये. आणि जर या दिवशी तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही या दिवसापुरते कमीत कमी तांदूळाचं सेवन करायचे नाहीये.
तुळस तोडण्यापूर्वी आणखी एक गोष्ट लक्षात असू द्या. म्हणजे एकादशीच्या दिवशी अनेक जण तुळशी मातेची पूजा करतात तुळशी मातेला स्पर्श करतात तुळशी मातेला नैवेद्य आदी अर्पण करतात.
तर मित्रांनो या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करू नये कारण या दिवशी तुळशी मातेचे एकादशीचे व्रत असते आणि या दिवशी आपण जर तुळशी मातेला जल अर्पण केलं तर तुळशी मातेचे व्रत भंग होत असते.
त्याच बरोबर या दिवशी तुळशीला स्पर्श देखील करू नये फक्त दूरुन पूजा करावी आणि पूजेसाठी लागणारे तुळशी पत्र एक दिवस आधीच तोडून त्यांचा आजच्या श्री हरी श्री विष्णूंच्या पूजेसाठी वापर करावा.
मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला व्रत चंपारण अवश्य करावं मित्रांनो हे फार महत्त्वाचा आहे द्वादशीच्या दिवशी अमृताचं पारायण सूर्योदयानंतर अवश्य करावं.
मित्रांनो द्वादशी स्थितीमध्ये पारायणं करणं हे पाप करण्यासारखं मानले जाते त्यामुळे जर तुम्ही एकादशी व्रत केले असेल तर द्वादशीला सूर्योदयानंतर याचं पारायण अवश्य करावे.
तर मित्रांनो हे आहेत काही नियम जे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी पाळवे लागणार आहेत आणि काही गोष्टी आपल्याला या दिवशी जाणिवपूर्वक टाळायच्या आहेत ज्यामुळे या आषाढी व्रताचं पूर्ण फळ.
टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!