Thursday, June 8, 2023
Homeजरा हटकेधन धान्यांच्या समृद्धीसाठी शुक्रवारच्या दिवशी करा हे एक गुप्त दान : माता...

धन धान्यांच्या समृद्धीसाठी शुक्रवारच्या दिवशी करा हे एक गुप्त दान : माता लक्ष्मी इतकं देणार झोळी पडेल अपूरी..!!

नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू शास्त्रानुसार शुक्रवार हा दिवस महालक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वात खास दिवस मानला जातो. या दिवशी प्रत्येक कार्य माता लक्ष्मीशी संबंधित उपाय करून पार पाडले तर निश्चितच ते सफल होते.

येथे सर्वांनाच धनसंपत्ति प्राप्त करण्याची इच्छा असते. जेणेकरून आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची प्रत्येक गरज भागवू शकू. पण जेव्हा श्री लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हाच संपत्ती प्राप्त होते.

शुक्रवार हा महालक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वात खास दिवस मानला जातो. या दिवशी प्रत्येक कार्य माता लक्ष्मीशी संबंधित उपाय करून पार पाडले तर निश्चितच सफल होते. चला तर आपण असे काही उपाय जाणून घेऊयात, ज्यामुळे नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील.

शुक्रवारी हे खास उपाय करा –

जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद कायम ठेवायचा असेल तर आज बाजारातून कमळाच्या फुलावर विराजमान देवी लक्ष्मीचा फोटो घेऊन आपल्या देवघरात स्थापित करावा. यानंतर सर्वप्रथम माता लक्ष्मीला पुष्प अर्पण करावे. नंतर धूप-दीप इत्यादींनी देवीची पूजा करावी.

आपलं भाग्य उजळवायचं असेल तर आज एक रुपयाचे नाणे घेऊन ते आपल्या मंदिरात देवी लक्ष्मीसमोर ठेवावे. सर्वप्रथम माता लक्ष्मीची विधियुक्त पूजा करावी.

मग त्या नाण्याची त्याच पद्धतीने पूजा करावी आणि दिवसभर ते नाणे मंदिरात ठेवावे. दुसर्‍या दिवशी ते नाणे उचलून एका लाल कपड्यात बांधून आपल्याजवळ ठेवावे.

जर तुम्हाला चांगले आरोग्य टिकवायचे असेल तर आज तुम्ही लक्ष्मी देवीच्या मंदिरात शंख अर्पण करावा. याचबरोबर, देवीला तूप आणि दही अर्पण करावे आणि देेवी पुढे मनोभावे हात जोडून आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी.

जर तुम्हाला तुमची धनसंपत्ती वाढवायची असेल तर आज मातीचे कलश घेऊन ते तांदळाने भरावे. तांदळावर एक रुपयाचे नाणे आणि एक हळकुंड ठेवावे. आता त्यावर झाकण ठेवून, माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यावा आणि मंदिरातील पुजाऱ्यास दान करावे.

जर आपण आज कुठल्याही महत्त्वाच्या व्यवहारासाठी बाहेर जात असाल आणि त्यामध्ये आपलं यश निश्चित करायचं असेल तर त्यासाठी आज तुम्ही घराबाहेर जाताना प्रथम माता लक्ष्मीला वंदन करावे, तिचा आशीर्वाद घ्यावा त्यानंतर, थोडेसे दही-साखर खाऊन, पाणी पिऊन मग घराबाहेर पडावे.

जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ मिळवायचा असेल, तर तुम्हाला व्यवसायात खूप प्रगती करायची असेल तर तुम्ही आज स्नानानंतर स्वच्छ कपडे घालून माता लक्ष्मीच्या या मंत्रांचा जप करावा.

मंत्र खालीलप्रमाणे आहे –

” ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः “
ह्या मंत्राचा जप तुम्ही या दिवशी करावा.

जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद प्राप्त करायचा असेल तर, स्नान करून नंतर स्वच्छ कपडे घालून सर्वप्रथम तुम्ही मनोभावे हात जोडून देवीला नमन करावे.

मग उजव्या हातात फुलं घेऊन ती देवीच्या समोर अर्पण करावीत आणि त्याच फुलांवर मातीच्या दिपकात फुलवात ठेउन त्यात तुप टाकवे व दीप प्रज्वलित करावा. तसेच, माता लक्ष्मीला लाल ओढणी अर्पण करावी.

जर आपल्यास आपल्या जोडीदाराची प्रगती चांगली व्हायला हवी असे वाटत असेल, त्यांना पगारात बढती मिळावी असे वाटत असेल, तर या दिवशी स्नानानंतर देवी लक्ष्मीच्या या मंत्राचा जप करावा.

मंत्र खालीलप्रमाणे आहे-
“श्री ह्रीं श्रीं”
या दिवशी तुम्ही या मंत्राचा जप करावा, किमान एक जप, म्हणजेच 108 वेळा.

जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरातील तिजोरी नेहमीच संपत्तीने भरलेली असावी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव रहावा तर आज तुम्ही स्ना-न वगैरे आटोपून नंतर एका भांड्यात थोडी हळद घ्यावी.

ती हळद पाण्याच्या मदतीने भिजवुन घ्यावी. आता या हळदीने आपल्या घराच्या बाहेरील मुख्य दाराच्या दोन्ही बाजूस प्रथम जमिनीवर लहान स्वस्तिक बनवावे. मग दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर स्वस्तिक बनवावे आणि लक्ष्मीचे मातेचे ध्यान करावे.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स