Monday, December 4, 2023
Homeअध्यात्मधनाच्या बरकती साठी शुक्रवारी करा देवी लक्ष्मीला या वस्तू अर्पण.., मिळेल इच्छित...

धनाच्या बरकती साठी शुक्रवारी करा देवी लक्ष्मीला या वस्तू अर्पण.., मिळेल इच्छित सफलता.

शुक्रवार हा वार धनाची देवता देवी लक्ष्मीशी संबंधित असून या दिवशी तिची पूजा केल्यास धन संपत्ती लाभते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी शुक्रवारी या काही उपाययोजना कराव्यात. या उपायांच्या मदतीने देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या वर प्रसन्न तथा आनंदी होईल आणि तिची कृपा सहज तुमच्यावर होईल. चला तर मग जाणून घेऊया देवी लक्ष्मीला संतुष्ट करण्याचे मार्ग..

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे मार्ग –

लक्ष्मीला लाल कपडा अर्पण करा.

शुक्रवारी सकाळी उठून आंघोळ करावी. त्यानंतर पुजेची थाळी तयार करा. त्यात लाल बिंदी, सिंदूर, लाल चुनरी आणि लाल बांगड्या ठेवा. तसेच त्यात लाल कपडा ठेवा. आता मंदिरात जा आणि मां लक्ष्मीची पूजा करा आणि पुजा थाळीमध्ये ठेवलेल्या वस्तू आणि देवी लक्ष्मीला लाल कपडा अर्पण करा. देवी लक्ष्मी तुमच्या वर प्रसन्न होईल.

कमळाची फुलं अर्पण करा –

शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करताना तिला कमळपुष्प किंवा कमळांचा हार अर्पण करा. देवी लक्ष्मीला पांढरा आणि गुलाबी रंग खूप आवडतो, म्हणून आपण या दोन रंगांची कमळांची फुलं देवी लक्ष्मी ला अर्पण करावी. पुष्प अर्पण केल्यानंतर लक्ष्मीजींना प्रार्थना करायची आहे. प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर, फुले आपल्या घरी आणा आणि त्यांना पैसा ठेवतो त्या ठिकाणी ठेवा. हे उपाय केल्यास देवी लक्ष्मी चा वास नेहमीच आपल्या घरात असेल.

लक्ष्मी नारायणाचा पाठ वाचा –

श्री लक्ष्मी नारायण पाठ पठन करुन देवी लक्ष्मी आनंदी होते. तसेच शुक्रवारी संध्याकाळी हे पठन करावयाचे आहे. व लाल आसनावर बसूनच हा पाठ करा आणि आपल्या जवळ दिवा लावा. तसेच भगवान लक्ष्मी नारायणांची मूर्ती आपल्याकडे ठेवा आणि त्यांना प्रसाद म्हणून खीर अर्पण करा.

तिजोरीत तांदूळ ठेवा –

लाल रंगाचे कापड घ्या आणि त्यामध्ये दीड किलो तांदूळ घ्या. लक्षात ठेवा की हे तांदूळ अगदी स्वच्छ व अखंड असावेत आणि तुटलेले नसावेत. आता हा कपडा बांधा व हातात घ्या आणि ओम श्रीं श्रीये नम: हा मंत्र जप करा. मग ती तांदूळाची बांधलेली पोटली तिजोरीत ठेवा. हे उपाय केल्यास, तेथे पैशाची कमी दूर होईल आणि तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असेल.

पिंपळाच्या झाडाची पूजा –

पिंपळाच्या झाडाची पूजा करून सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणून शुक्रवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. वास्तविक देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर राहते. म्हणून, पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास देवी लक्ष्मी सुद्धा सुखी आणि प्रसन्न होते.

या मंत्रांचा जप करावा –

या मंत्रांचा जाप केल्याने देवी लक्ष्मीची कृपा दृष्टी तसेच आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील, म्हणून शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करताना या मंत्रांचा जप करावा.

हे मंत्र खालीलप्रमाणे आहेतः

  • ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:।
  • ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:!
  • पद्मानने पद्म पद्माक्ष्मी पद्म संभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम्।
  • ॐ ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नम:!
  • ओम लक्ष्मी नम:
RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स