Saturday, June 10, 2023
Homeअध्यात्मधनप्राप्ती साठी आतापर्यंतचा सर्वात प्रभावी उपाय., घरातील देवघरात ठेवा फक्त ही एक...

धनप्राप्ती साठी आतापर्यंतचा सर्वात प्रभावी उपाय., घरातील देवघरात ठेवा फक्त ही एक वस्तू..!!

फ्रेंड्स आपल्याला आज येथे अचानक धनप्राप्ती‌ कशी होऊ शकते याबाबतचा उपाय जाणून घ्यायचा आहे. अचानक धनप्राप्ती म्हणजे कुठल्याही अपेक्षेची इच्छा न करता नकळत झालेला धनाचा लाभ.

विचार करा अगदी अचानक तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला तर, उदाहरण द्यायचेच झाले तर ती लॉटरी असेल, नोकरीत, व्यवसायात मिळणारे प्रमोशन किंवा प्रगती असेल, बिझनेस मध्ये एखादी मोठा व्यव्हार होणार असेल, अशा कोणत्याही मार्गाने पैसा येतो.

आपला हा जो उपाय आहे तो उपाय लहान असो, मोठा असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, तरुण किंवा म्हातारे असोत अगदी कुणीही हा उपाय करू शकतात.

जर तुम्हाला जॉब नसेल, कोणतंही काम नसेल, तुमच्या आयुष्यात पैशांचा अभाव असेल. हा उपाय एकदम खात्रीशीर आहे हा केल्याने तुम्हाला अचानकपणे पैसा मिळू लागेल. हा उपाय केल्याने पैसा मिळवण्याच्या वेगवेगळ्या संधी तुमच्या नशिबात निर्माण होतील.

बस अट फक्त एकच आहे, ती म्हणजे हा उपाय अगदी गुप्त पणे कुणालाही नकळत करायचा आहे. कोणत्याही प्रकारची वाच्यता किंवा बाहेर कोणालाही या उपाया बद्दल सांगायचं नाही. कारण हा सिद्ध आणि तितकाच प्रभाव शाली असा धनप्राप्ती साठीचा तोटका आहे.

हिं’दू ध’र्म शा’स्त्रात अनेक वर्षांपासून बरेच उपाय सांगितले आहेत. आणि आजचा आपला हा उपाय नाथ संप्रदायात सुद्धा सांगितलेला आहे.

अनेक लोकांनी हा उपाय करून आपल्या धना मध्ये आश्चर्य जनक वाढ केलेली आहे. आपण सुद्धा मनात दृढ श्रद्धा ठेवून हा उपाय करायचा आहे. कुठलीही शंका मनात ठेऊन जर हा उपाय तुम्ही करायला जाल तर याचा फायदा तुम्हाला कधीच होणार नाही.

केवळ या उपायासाठी आपल्याला शुक्रवारचा दिवस निवडावा लागणार आहे. तर एखाद्या शुक्रवारी आपल्या घराजवळ कुठेही रुईचे झाड असेल, तर शोधून ठेवावे, याच झाडाच्या मदतीने आपण आज अचानक धन प्राप्ती कशी करावी हे बघणार आहोत.

मुख्यत रुई ही 2 प्रकारची असते. लाल फुलं येणारी आणि सफेद फुलं येणारी, आणि आपल्याला सफेद फुलांची रुई या तोटक्यासाठी वापरायची आहे.

रुईचे हे रोपटे तंत्र मंत्र शास्त्रात अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. या सफेद रुईच्या उपयोगाने अनेकांनी धन प्राप्ती झालेली आहे.

या रुईच्या झाडामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो अशी मान्यता शास्त्रात दिलेली आहे. असं सुद्धा मानलं गेलं आहे की विशिष्ट वर्षानंतर किंवा‌ कालावधी नंतर या सफेद रुईच्या झाडाच्या मुळांमध्ये श्री गणेशाची प्रतिमा अवतरते.

तर शुक्रवारी सुर्योदयानंतर सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर या रुईच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे. जाताना आपल्या घरातील देवघरात आपण तांब्याचा तांब्या वापरतो त्यातून एक तांब्या भरुन पाणी आपण घेऊन जायचं आहे. सोबत जातांना अगरबत्ती आणि हळदी कुंकू सुद्धा एका ताटात घेऊन जायचं आहे.

रुईच्या झाडाची आपण एखाद्या देवते सारखी प्रसन्न चित्ताने पूजा करावी. व हात जोडून प्रार्थना करायची आहे. मनात कुबेर देवाचं आवाहन करत म्हणायचं आहे, हे वृक्षदेवता उद्या सकाळी शनिवारी आम्ही तुम्हाला आमच्या घरी घेऊन जाण्यासाठी येणार आहोत. तरी कृपा करून हे वृक्षदेवता, तुम्ही आमच्या बरोबर या आणि आमचं घर धन तथा ऐश्वर्य, संपत्ती ने भरून टाका.

ही प्रार्थना करून आपण कुठेही न जाता घरी यायचं आहे. फक्त प्रार्थना करताना आपलं मुख हे उत्तर दिशेला असेल याची काळजी घ्यावयाची आहे. कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा आहे. तसेच घरी परत येताना मागे वळून पाहू नका.

पुढच्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्वच्छ स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या घरात असलेल्या देवघरात येऊन रोजचा पूजाविधी उरकून घ्यायचा आहे. इथे सुद्धा आपण जे कार्य करणार आहात ते बोलून दाखवायचं आहे व प्रार्थना करायची आहे.

प्रार्थना करून आपण पुन्हा एकदा रुईच्या रोपट्याकडे जायचं आहे आणि हात जोडून आपण पहिल्या दिवशी जी प्रार्थना केली होती तीच प्रार्थना पुन्हा एकदा करावयाची आहे.

तदनंतर हे रुईचे रोपटं मुळापासून उपटावे लागते. नंतर या झाडाचे मूळ वेगळं काढून घ्यायचे आहे. हे मूळ काढून सोबत घेऊन आपल्या घरी यायचं आहे. एक मात्र करा घरी येताना चुकूनही मागे वळून पाहू नका.

घरी परतल्यानंतर हे रुईचं मूळ शुद्ध पाणी घेऊन व्यवस्थित साफ करायचं आहे. नंतर त्यावर गंगाजलाचा शिंपडावा करुन घ्या. गंगाजल जर नाही मिळालं तर पुन्हा तेच साधे पाणी सुद्धा चालेल. त्यानंतर एखाद्या लाल रंगाच्या कपड्यातून हे मूळ गुंडाळून घ्यायचं आहे.

नंतर लाल कपड्यात बांधलेले ते रुईचं मूळ आपण आपल्या घरात पैसे,धन, सोनं, नाणं इत्यादी ज्या ठिकाणी ठेवतात तिथे हे कपड्यात गुंडाळलेलं रुईचं मूळ आपल्याला ठेवायचं आहे. शुद्ध केलेलं रुईचं हे मूळ मां-साहार, व्यस नी वस्तू, कातडी पासून बनलेल्या वस्तू यांपासून दूर ठेवायचं असतं हे लक्षात असू द्या.

पुढे प्रत्येक शुक्रवारी या रुईच्या मूळची मनोभावे पूजा अर्चा करायची आहे. या उपायाने काही दिवसातच तुम्हाला तुमच्या जीवनात विलक्षण बदल झालेला दिसून येईल, तथा धन प्राप्तीचेही योग येतील.

फ्रेंड्स फक्त एक लक्षात ठेवा, पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे तुम्हाला हा उपाय करावयाचा आहे, तरचं तुम्हाला याचा योग्य तो फायदा मिळणार आहे.

टीप – कुठलीही अंधश्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा हेतू मुळीच नाही. आम्ही फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवत आहोत आणि हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कृपया कुणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करायला विसरु नका, तुमचा एक शेयर एखाद्या मित्राचं कल्याण करू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स