धनप्राप्ती व आर्थिक भरभराटीसाठी रोज करा तुळशीच्या मातीने तिलक..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, तुळशी ही वनस्पती आपल्या हिंदु धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. असेही म्हटले जाते की भगवान श्री विष्णू स्वतः या तुळशीच्या मुळांमध्ये शालिग्रामच्या रूपात वास्तव्य करत असतात.

शिवाय असेही मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप आहे त्या घराची अनेक नकारात्मक शक्तींपासून मुक्तता होते रक्षण होत असते. तसेच तुळशीच्या कृपेने त्या घरामध्ये धन,‌संपत्ती, भरभराटी प्राप्त होत असते.

याचबरोबर तुळशी ही वनस्पती तुमच्या शरीरातील अनेक रोगांशी लढण्याची शक्तीही देत असते आणि तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. अशी मान्यता आहे की तुळशीच्या पानांच्या नियमित वापरामुळे गंभीर स्वरुपातील आजारांचा प्रभाव कमी होत असतो.

मित्रांनो, याच तुळशीचे बरेचसे छोटे छोटे उपाय घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मदतशीर ठरतात. मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण या बाबतची सविस्तर माहिती बघणार आहोत.

मित्रांनो, जर तुम्हाला नवग्रह किंवा कुंडलीतील कोणत्याही प्रकारचा दोष सतावत असेल किंवा शनि दोष किंवा रवि दोष असेल तर श्री तुळशीचे मुळ ताईतामध्ये ठेवून तो ताईत गळ्यात घालून घ्यावा.

असे केल्याने मानले जाते की यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची संपत्तीची कमतरता भासत नाही.

एक नित्य नियम आपला दररोज चा असावा. दररोज स्नान केल्यानंतर तुळशीच्या मुळांमध्ये पाणी घातल्याने नवग्रहांचे दोषही दूर केले जातात. तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने घरातील गरिबी दूर होऊ लागते. जर तुम्हाला दुकानातून किंवा घरातून नकारात्मक शक्ती दूर करायच्या असतील तर तुळशीच्या मुळांची माला बनवून गळ्यामध्ये वापरणे अगदी फायदेशीर ठरेल.

त्याचबरोबर अचानक धनप्राप्तीसाठी तुळशीचे मूळ चांदीच्या ताईतमध्ये घातल्याने, संपत्तीच्या आगमनाचे सर्व मार्ग खुले होत असतात आणि व्यक्ती लवकरच धनवान तथा श्रीमंत होत असते.

तसेच दररोज सकाळी आन्हिंक आवरल्यानंतर स्नान आदी केल्यानंतर तुळशीच्या झाडाच्या मुळांशी असलेली किंवा मुळापासून अगदी जवळ असलेली माती घ्यावी आणि त्या मातीने कपाळावर रोज तिलक लावावा. असे केल्यामुळे त्या व्यक्तीची संमोहन शक्ती वाढते. व समोरच्या व्यक्तीवर तुमचा लवकरच प्रभाव देखील पडत असतो.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment