धनतेरस ते दिवाळी.. सकाळी उठताच महिलांनी नक्की करावं एक काम.. महालक्ष्मींची होईल कृपा..!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आता दिवाळी येत आहे आणि या दिवाळी मध्ये असा कोणता उपाय केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला व आपल्या घराला मिळेल. तिचा वास आपल्या घरामध्ये होईल. हा उपाय फक्त दिवाळी दिवशीच नाहीतर धनत्रयोदशीपासून, नरक चतुर्थी व लक्ष्मीपूजन या दिवशी हा उपाय करायचा आहे.

हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करेल आणि आपल्या घरात सुख, समृद्धी व शांतता आणि आपले घर सदैव धनधान्याने भरलेले राहील. या उपायाची माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. या दिवसामध्ये घरातील सदस्यांनी उठल्याउठल्या कधीही आरशात पाहू नये. कारण रात्रभरआरसा तून नकारात्मक शक्तीप्रसारित होत असते आणि जर आपण पाहिले तर ती नकारात्मक शक्ती आपल्याकडे आकर्षित होते.

त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आरसात न पाहता आपल्या लकी व्यक्तीचा चेहरा किंवा भगवंताचा चेहरा पहावा. त्याचबरोबर नंतर आपले तळहात आपल्या चेहऱ्यावरून फिरवावे. आपला जा नाकाच्या नाकपुडीतून श्‍वास चालू आहे. त्याच बाजूच्या पाय आधी जमिनीवर ठेवावा आणि मग उठावे. नंतर आपल्या घराच्या मुख्य दार द्वारावर व उंबरठ्यावर थोडे पाणी शिंपडावे.

हा उपाय तुम्हाला सलग आठ दिवस करायचा आहे. म्हणून तर घरामध्ये येऊन घरातील झाड लोड करावे आणि मीठ टाकलेल्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. आंब्याची किंवा अशोकाची पाने आणून त्याचे तोरण बनवून ते आपल्या घराच्या मुख्य द्वाराला लावावे. यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्याचबरोबर कुमकुम मध्ये थोडे साजूक तूप घालून या पेस्टने घराच्या मुख्य द्वाराच्या स्वस्तिक काढावे.

त्याचबरोबर थोडेसे तांदूळ भिजत घालून या तांदळाची पेस्ट करून त्यामध्ये हळद घालून याने आपल्या घराचा मुख्य द्वारावर ओम काढावे. यामुळे नकारात्मक शक्ती आपला कडे आकर्षित होत नाही. धनत्रयोदशी दिवशी देवी लक्ष्मीची,गणपतीची व कुबेर महाराजांची पूजन करावे. त्याचबरोबर आपण दिवाळीसाठी ज्या काही वस्तू आणल्या आहेत त्यामध्ये दिवे, काही सामग्री असतील तर यांचे देखील पूजन करावे. या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद करू नये.

घरात भांडण तंटे होऊ नये असे वर्तन करावे. घरातील वातावरण शांत व प्रसन्न ठेवावे. तुम्हाला या दिवाळीच्या दिवसांमध्ये मुख्यद्वार धुवून उंबरठ्यावर थोडे पाणी टाकणे हे रोज करायचे आहे. लक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी तांदूळ आणि हळदीच्या मिश्रणाने लक्ष्मीची पावले काढावेत आणि या चरणावर फुले टाकावीत.

अशाप्रकारे हे उपाय लक्ष्मीपूजन व धनत्रयोदशी दिवशी, नरक चतुर्थी दिवशी करावे. यामुळे लक्ष्मी चा वास आपल्या घरांमध्ये होईल. तिचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. आपल्या घरात सदैव धनधान्याची बरकत होईल. घरात शांतता राहील सुख-समृद्धी राहील. आर्थिक परिस्थितीही सुधारेल.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं रॉयल कारभार हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!