दोन्ही हात मिळून अर्धचंद्राकृती आकार बनत असेल तर तुम्ही हे वाचायलाच हवे..!!!


मित्रांनो, असे म्हणतात की तुमच्या हाताच्या रेषा तुमच्या नशिबाचा आरसा असतात. या रेषांचे द्वारे बनलेले वेगवेगळे आकार तुमच्या स्वभावाबद्दल आणि तुमच्या नशिबाबद्दल बरेच काही सांगू शकतात. त्याचप्रमाणे, असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीचे दोन्ही हात समांतर ठेवले तर अर्ध-चंद्राचा आकार जर तयार झाला तर तसे होणे खूपच शुभ मानले जाते. हस्तरेखाशास्त्रानुसार, हे सुखी वैवाहिक जीवनाचे सूचक आणि निरोगी हृदयाचे लक्षणही मानले जाते.

असे मानले जाते की, आपल्या हातावरील रेषांवर आपले भाग्य अवलंबून असते. जर तुमच्या तळ हातावर अर्धचंद्र बनत असेल, तर याचे काय रहस्य आहे? हे आज आपण पाहणार आहोत.

असे म्हणतात आपल्या तळ हातांच्या रेषांवरून भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमानकाळ समजू शकतो. हातावरील रेषा कायम आपल्याला उत्साही करत असतात. प्रत्येक जणांना जाणून घेण्याची इच्छा असते की, त्याच्या हातावरील रेषा भूत, भविष्यात आणि वर्तमानाबाबत काय सांगतात.

ज्योतिष विद्यानुसार तळ हातावरील रेषा आपले भाग्य आणि नियती जीवन काल दाखवत असतात. ही अशी विद्या आहे ज्यात ज्योतिष आपल्या हातांच्या रेषा पाहतात. काही जण कपाळावरील आणि पायाच्याही रेषा पाहतात.

हस्तरेषा तुमचे आरोग्य आणि इतर गोष्टीबाबत माहिती देतात. इतकेच नाही तर तुमच्या जीवनात होणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांबद्दल ह्या हस्तरेषा सांगतात. तुम्ही कायम तळ हातावर बनणाऱ्या अर्धचंद्र बाबत उत्सुक असाल.

चला तर अर्धचंद्राचा काय अर्थ होतो ते आपण जाणून घेऊया.

तुम्हाला माहीत नाही तुमच्या तळ हातावर अर्धचंद्र होतो कसा? तर त्यासाठी तुमच्या दोन्ही तळ हातांना जवळ आणा. त्यानंतर सर्वांत वर असणारी उजवा आणि डाव्या हाताची रेषा एकमेकांना जुळवा. त्यातून जो आकार बनला तो अर्धचंद्र असतो. रेषा नाही मिळाल्या आणि अर्धचंद्र नाही झाला तर त्याचाही वेगळा अर्थ आहे.

ज्यांच्या तळ हातावर अर्धचंद्र झाला त्यांना कलकलाट नाही त्यांना शांतता आवडते. ज्यांच्या हातावर अर्धचंद्र बनतो, त्या व्यक्ती खूप सुंदर आणि ऍक्टिव्ह स्वभावाचे असतात. अशाप्रकारचे लोक आपली मैत्री कायम ठेवतात. आपल्या मित्रांशी खूप इनामदार असतात.

अशा व्यक्तींची बुद्धी खूप चाणाक्ष असते. ते बुद्धिमान असतात तर प्रत्येक गोष्ट आठवण्याची क्षमता अधिक असते. अनेक वर्षापूर्वीच्या गोष्टीही त्यांना खूप स्पष्टपणे आठवतात. असे व्यक्ती आपले प्रेम मिळवण्यात धडपड करतात. आपल्या मनातील गोष्टी मनातच ठेवतात. स्वतःहून कोणाशी बोलत नाहीत.

या व्यक्ती खूप हुशार असतात व प्रत्येक काम चांगल्याप्रकारे ते पूर्ण करतात. त्याशिवाय कोणतेही संकट आले तरी घाबरून न जाता त्या संकटांचा सामना करतात. अशा व्यक्ती आपल्या जीवनसाथीच्या प्रतीक खूप भावूक असतात. परंतु आपल्या भावना या इतरांकडून लपवण्याचा प्रयत्न करत असतात.

या व्यक्ती खूप बुद्धिमान असतात. त्यामुळे कोणतेही संकट यांच्यासाठी मोठे नसते. जर दोन्ही हातांच्या रेषा जोडल्यास अर्धचंद्र न होता सरळ रेष बनत असेल तर ती व्यक्ती खूप शांत व दयाळू स्वभावाची असते. याना प्रत्येक काम शांततेने व आरामात करायला आवडते.

असे मानले जाते की, सरळ रेषा असणाऱ्या व्यक्ती खूपच कमी असतात. जर दोन्ही हात जुळवल्यास या दोन्ही रेषा जुळत नसतील, एक रेष खाली व एक रेष वर राहत असेल व वाकडी तुकडी, तिरकी दिसत असेल तर अशा व्यक्तींना आपल्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तींबरोबर राहायला आवडते.

या व्यक्ती इतरांचा व समाजांचा काहीही विचार करीत नाहीत. त्यांना लोक काय म्हणतील किंवा आपल्याबद्दल कोणता विचार करतील याबद्दल कधीही काहीही वाटत नाही. किंवा तशी पर्वा ते कधीच करत नाही.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!