Wednesday, December 6, 2023
Homeजरा हटकेदुसरी पास असलेला हा पाववडेवाला चाचा देतो मार्केटिंग वर लेक्चर..!!

दुसरी पास असलेला हा पाववडेवाला चाचा देतो मार्केटिंग वर लेक्चर..!!

खाणार की नेणार…???

अक्का आठ नेता का..?,

पै’से की फि’क्र नको.. खाते में लिख देता,

असे म्हणणारे एक वडापाववाले चाचा सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. पण हे चाचा नक्की आहे, तरी कोण चला तर मग जाणून घेऊया…

काकांची विक्री आणि विक्रीची गु’णवत्ता किंवा गोड बोलण्याचे कौशल्य अगदी अजोड आहे.. जो कुणी एकदा त्यांच्याकडे येतो, तो त्यांच्या या बोलण्याच्या शैलीचा फॅन बनतो. एखाद्याला फक्त एक वडा खायचा असेल तर तो दोन खाल्ल्यानंतरच जातो.

आपल्या हटके बोलण्याच्या शैलीने ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या चाचांचे नाव मोहम्मद अन्सार आहे. ते आता सगळीकडेच वडापाव चाचा नावाने प्रसिद्ध झाले आहे. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील समनापुरमध्ये राहणाऱ्या या चाचांनी ‘नसीब वडापाव सेंटर’ ला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे.

चाचांच्या या दुकानावर वडापावचे शौकीन नेहमीच गर्दी करुन असतात. हे चाचा त्यांच्या सेल्समनशिप करताना त्यांच्या हटके बोलण्यावरुन ओळखले जातात. ते ग्राहकांना इतके आकर्षित करतात कि एकदा त्यांच्याकडे आलेला ग्राहक पुन्हा वळून त्यांच्याकडेच येतात.

जर एखादा ग्राहक खुप वेळ लाईनमध्ये उभा असेल, तर अरे सरांना पटकन मोहब्बत वडापाव देरे असे म्हणत चुटकीशीर ग्राहकाच्या चेहऱ्यावरचा थकवा देखील काढतात.

अन्सार चाचा दिवसाला दिड ते दोन हजार वडापाव विकतात. साधारणत: प्रत्येक ठिकाणी आपण वडापावची किं’मत १५ ते २० असते, पण असे असतानाही अन्सार चाचा यांनी आपल्या दुकानात वडापावची किं’मत फक्त १० रुपये ठेवली आहे.

आपल्या हटके अंदाजाने ग्राहकांना आकर्षित करणारे अन्सार चाचा यांचा उद्देश पै’सा कमवणे नाहीये, तर ज्या वक्तीशी पण भेटा त्याच्याशी प्रे’माने बोलायला पाहिजे असे चाचांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दुसरी पर्यंतच शिक्षण झालेल्या चाचांना त्यांच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये लेक्चर देण्यासाठी बोलवले जाते.

६७ वर्षांचे असणारे अन्सार चाचांना प’रिस्थितीमुळे लहानपणीच शाळा सोडावी लागली होती. ते ७ वर्षाचे असताना त्यांच्या आ’ईचे नि’धन झाले होते, त्यांचे वडिल बी’डी वळण्याचे काम करायचे. लहान असतानाच त्यांनी संगमनेरच्या एका हॉटेलमध्ये वेटरचे काम सुरु केले होते.

सकाळी सकाळी रोज ते चार किलोमीटर पायी चालून संगमनेरला पोहचायचे. तेव्हा हॉटेल मालकाला त्यांचे काम प्रचंड आवडले आणि त्यांनी अन्सारी यांना ग्राहकांशी कसे बोलायचे त्यांचा राग कसा शांत करायचा हे सर्व शिकवले.

१९७७ पर्यंत त्यांनी हॉटेलच्या वेटरमध्ये नोकरी केली, त्यानंतर त्यांनी आईस कँडी आणि भं’गारचा व्यवसाय पण केला होता. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की वडापाव विकून नियमित क’माई केली जाऊ शकते.

१९७८ मध्ये त्यांनी वडापावचे दुकान सुरु केले. तिथूनच त्यांचे न’शीब पालटले होते. कदाचित त्यामुळेच त्यांनी त्यांच्या दुकानाचे नाव नसीब वडापाव ठेवला असावा. आज त्यांच्याकडे बंगला-गाडी सर्व काही आहे. या वडापावचा व्यवसाय करुन ते महिन्याला ला’खो रु’पयांची क’माई करत आहे. तसेच अन्सार चाचा यांनी आता हॉटेलही उघडले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स