एक तर बायको किंवा जुळी मुलं.? स्वामी असता पाठीशी.. राहुल दादांचा अंगावर शहारा आणणारा अनुभव..

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.!! नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या लेखमालेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. जर तुम्हाला स्वामींच्या अनुभवचे हे लेख आवडत असतील तर लेखाला नक्की शेअर करा. आज आपल्या लेखांना फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात वाचले जात आहे. भारताबाहेर देखील युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अरब देशांमधील मराठी लोक देखील लेखांना वाचत आहे. धन्यवाद !! श्री स्वामी समर्थ !!

आता आपण या पुढील लेख पाहुयात.. एका सेवेकर्‍याच्या शब्दामध्ये.. माझे नाव राहुल आज मी 31 वर्षांचा आहे. साधारण चार वर्षापूर्वी माझं लग्न झाले, वयाच्या 27 व्या वर्षी.. जशी सगळी मुले असतात तसाच मीही होतो. देवधर्म वेगेरे नवते कळत मला. लग्ना आधी देवधर्माच मी फारसं काही कधीही करायचो नाही. घरामधे देखील मला कुणी जास्त फोर्स केला नाही.

पण लग्न झाले आणि गोष्टी बदलायला सुरवात झाली. माझी पत्नी ही स्वामी भक्त, ती नेहमी मुंबई मधल्या चिंचपोकळी येथील श्रॉफ बिल्डिंग मध्ये असलेल्या मठात जायची. जेव्हा आमचे लग्न ठरलेले होते आणि त्या आधीच्या त्या दिवसामध्ये ती मला सुद्धा चिंचपोकळी मधल्या मठात घेऊन गेली.

लग्नाच्या वेळी मी नोकरीला नवतो. श्रद्धाने त्यावेळी तिने स्वामींना माझ्या नोकरीचे साकडे घातले. माझा विश्वास तेव्हाही नवता पण सरळ बोलणार कसे ना ?? त्यावेळी आम्ही एकमेकांना समजावून घेत होतो. पण माझा विश्वास तेव्हा बसायला सुरुवात झाला जेव्हा तिची प्रार्थना फळास आली आणि मला अगदी जशी हवी तशी आणि जिथे हवी तिथे अशी उत्तम नोकरी मिळाली.

हा माझा आलेला पहिलं अनुभव मग मात्र माला मला क्षणोक्षणी स्वामींचा अनुभव येत गेला. असे अनेक लहान मोठे प्रसंग आहेत जिथे मी स्वामींना साकडे घातले त्या वेळी स्वामी माझ्यासाठी धावून आले. प्रत्येक वेळीच असे होते असेही नाही कितीतरी वेळा गोष्टी माझ्या मनासारख्या घडल्या नाहीत

(प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या घडायला इतके लायकही आपण आहोत का.? आपण कधीच काही चुकलो नाही का ? मग जे प्रराब्ध आपल्यासाठी लिहलेले आहे ते होणारच !! पण स्वामी ते स्वीकारणे सोपे बनवतात, गोष्टी तितक्या त्रास देत नाहीत )

घटना घडून गेली आणि ती वेळ निघून गेल्या नंतर लक्षात यायचं जे झालं किंवा जे नाही झाल ते माझ्या चांगल्या साठी च होत. माझ्या साठी जे योग्य आहे तेच स्वामींनी नेहमी घडवून आणल. मी माझ्या कमी बुद्धीप्रमाणे प्रमाणे स्वामींची नित्य सेवा सुरू केली.

नोकरी मध्ये माझी बढती झाली, बायको ला दिवस गेले व जुळी मुलं आहेत असा कळलं. सर्व अगदी छान सुरू होते. नुकतंच एक विशेष दिवशी बायको ला कळा सुरू झाल्या. तिचा प्रसूतिकाळ अजुन बराच दूर होता तरीही.!!

दोन्ही मुलांना त्यांच्या नैसर्गिक जन्माच्या आधीच बाहेर काढाव लागलं. मुलं जगतील याची डॉक्टरांना खात्री नव्हती, डॉक्टरांनी तसे आधीच संगितले होते पण स्वामीकृपेने दोन्ही मुलं रडत बाहेर आली. मुलं आता लहान बाळांच्या ICU मध्ये आहेत.

तिथल्याही डॉक्टरांना मुलं कितपत तग धरतील याबद्दल शंका आहे. परंतु ही मुलं स्वामींची च देण आहेत. जे योग्य आहे तेच स्वामी करणार याची मला खात्री आहे. जे काही होईल ती स्वामींची आज्ञा असणार.

मित्रांनो राहुल दादांसाठी आपण कमेंटमध्ये स्वामींच्या मंत्राचा जयघोष करुयात !! आपली एक सामूहिक पुजा देखील होईल आणि राहुल दादांना झालाच तर त्याचा फायदा देखील होईल. म्हणूनच तितक्या जास्त प्रमाणात लोकांना कमेंट करायला सांगा.. श्री स्वामी समर्थ !!

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment