नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. हिंदू धर्मात प्रत्येक देवाची आराधना ही वेगवेगळ्या उद्देशपूर्ती साठी केली जाते. जसे लक्ष्मीदेवी आणि कुबेर देवाची पुजा धनप्राप्तीसाठी केली जाते. कुबेर देवाला धन देवता मानले जाते. त्यांना देवदेवतांचे कोषाध्यक्ष म्हटले जाते.
त्यांच्या कृपेने धनप्राप्ती होते. धनसंपत्ती मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती माता लक्ष्मीची आराधना करत असते. देवी लक्ष्मीची संपत्तीची देवी म्हणून पूजा केली जाते आणि संपत्तीचे देवता म्हणून कुबेर यांची पूजा केली जाते.
देवांमध्ये कुबेर देव हे संपत्तीचे राजा मानले जातात आणि ते धन आणि संपत्तीचे रक्षण करतात. हेच कारण आहे की भक्त आनंद, संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी कुबेरांची पूजा करतात. कुबेर देव हे पृथ्वीच्या सर्व संपत्तीचे एकमेव स्वामी आहेत.
ते भगवान शिव यांच्या प्रिय सेवकांपैकी एक आहे आणि भगवान शिव यांच्या व र दा ना तूनच त्यांना संपत्तीची देवता होण्याचे भाग्य लाभले. भगवान शिवाने कुबेर देव यांना व र दा न देखील दिले होते की जो कोणी कुबेर देवाची पूजा करेल त्याला संपत्ती आणि वैभव प्राप्त होईल.
तर आपण जाणून घेऊया की कुबेर देव खरोखर कोण होते आणि कोणाच्या कृपेने त्यांना संपत्तीचे देव म्हटले जाते.
मागील जन्मात एक गरीब ब्राह्मण होते कुबेर –
आज आम्ही तुम्हाला कुबेर देव यांच्या मागील जन्माशी संबंधित एक कथा सांगणार आहोत, एक गरीब ब्राह्मण कसे देवतांचे खजिनदार आणि संपत्तीचे देव बनतात. शिव पुराणातील एका आख्यायिकेनुसार, कुबेर देव त्याच्या मागील जन्मात गुणानिधी नावाचे ब्राह्मण होते. त्यांनी आपल्या वडिलांकडून धार्मिक शास्त्रांचे शिक्षण घेतले होते.
वडिलांनी घराबाहेर काढले –
गुणानिधी एक गरिब ब्राम्हण होते. लहानपणी त्यांना वडिलांकडून धार्मिक शास्त्रांचे शिक्षण मिळाले, पण हळूहळू चुकीच्या मित्रांच्या सहवासामुळे त्याचे लक्ष धार्मिक विधींपासून जु गा र आणि चो री कडे गेले.
गुणानिधींनी धर्मापासून दूर जाऊन आता आळशीपणाला आपला सोबती बनवले होते. अशाप्रकारे वेळ हळूहळू निघून गेला, एके दिवशी गुणानिधीचे वडील आपल्या मुलावर ना खू ष असल्याने त्यांना घराबाहेर काढले.
आता ते एक नि रा धा र आणि अ स हा य्य ब्राह्मण होते ज्यांना घराबाहेर काढले गेले. ते लोकांच्या घरी जाऊन जेवण मागायचे. घरातून हाकलल्यानंतर गुणानिधीची अवस्था द य नी य झाली आणि त्यांनी लोकांच्या घरी जाऊन अन्न मागण्यास सुरुवात केली.
अन्नाच्या शोधात जंगलात पोहोचले –
राजाने गुणानिधीला त्याच्या देशातून हद्दपार केले. एके दिवशी गुणनिधी अन्नाच्या शोधात गावोगावी भटकत होते, पण त्या दिवशी कोणीही त्यांना अन्न दिले नाही. त्यानंतर भू क आणि तहानाने त्र स्त झालेले गुणानिधी जंगलाच्या दिशेने भटकले.
त्याचवेळी त्यांना काही ब्राह्मण आपल्या सोबत प्रसादाचे साहित्य घेऊन जाताना दिसले. प्रासदाची सामग्री पाहून गुणानिधींची भू क वाढली आणि अन्नाच्या लोभात ते ब्राह्मणांच्या मागे गेले.
चालता चालता शिवालयात पोहचले –
भुकेने आणि तहानाने व्याकुळ झालेले गुणानीधि ब्राह्मणांचा पाठलाग करत राहिले, त्यांची नजर एका मंदिरावर पडली. गुणानिधी एका शिवालयात आले जेथे त्यांनी पाहिले की ब्राह्मण मंदिरात भगवान शिवाची पूजा करत आहेत. त्यानंतर त्यांनी भगवान शिवाला नैवेद्य अर्पण केला. नैवेद्य अर्पण केल्यानंतर सर्व ब्राह्मण भजन-कीर्तनात मग्न झाले.
मंदिरात नैवेद्य चो र ता ना पकडले गेले –
गुणानिधींनी भूक शमवण्यासाठी मंदिरातून प्रसाद चो र ण्याचा विचार केला. गुणानिधी शिवालयात बसून प्रसाद चोरण्याची वाट पाहत होते. भजन कीर्तन संपवून सर्व ब्राह्मण झोपी गेले तेव्हा त्यांना रात्री प्रसाद चो र ण्याची संधी मिळाली.
गुणनिधी हलक्या पावलांनी भगवान शिवाच्या मूर्तीजवळ पोहचले आणि नैवेद्य म्हणून ठेवलेला प्रसाद चो रू न पळून जाऊ लागले. पण पळत असताना एका ब्राह्मणाने त्यांना पाहिले आणि चोर-चोर ओरडू लागले. गुणानिधी आपला जीव वाचवून तेथून पळून गेले, पण शहराच्या रक्षकांच्या हाती लागले आणि तिथेच त्यांचा मृ त्यू झाला.
महाशिवरात्रीचे व्रत अनावधानाने यशस्वी झाले –
अन्न चोरून पळून जाताना गुणानिधींचा मृत्यू झाला, पण अनावधानाने त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत पाळले आणि ते त्या उपवासामुळे मिळालेल्या शुभ परिणामांचे हक्कदार झाले.
पुढच्या जन्मात कलिंगचे राजा झाले –
महाशिवरात्रीचे व्रत अनावधानाने पाळल्यामुळे गुणानिधी पुढच्या जन्मात कलिंगचे राजा झाले. या जन्मात गुणानिधी हे भगवान शिवाचे मोठे भक्त झाले.
शिवाच्या कृपेने झाले संपत्तीचे देवता –
कुबेेेर देेेव नेहमी भगवान शिवाच्या भक्तीत हरवलेले असत. त्यांची कठोर तपश्चर्या आणि भक्ती पाहून भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले. भगवान शिवाने त्यांना वरदान देऊन, यक्षाचे स्वामी आणि देवांचे कोषाध्यक्ष बनवले.
असे म्हणतात की ज्यावर भगवान शिव प्रसन्न होतात, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
हा भगवान शिवांचा आशिर्वाद होता ज्यामुळे एक गरीब ब्राह्मणांना कुबेर, संपत्तीची देवता म्हणून ओळखले जाऊ लागले आणि जगात त्यांना पूज्यनीय मानले गेले. कुबेर हे उत्तर दिशेचे स्वामी आणि गुह्यक यक्ष-किन्नरांचे अधिपती आहेत.
घराची उत्तर दिशा कुबेर देव यांची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेची स्थिती योग्य ठेवल्याने घरात सुख, शांती आणि संपत्ती राहते. वेदांमध्ये कुबेराचं वर्णन पाताळ लोकातल्या आत्म्यांचा स्वामी आणि अंधःकाराचा राजा असं केलं आहे.
अथर्ववेद आणि शतपथ ब्राह्मण या ग्रंथात त्यांना ‘वैश्रवण’ या नावाने उल्लेखलं आहे. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पुलस्त्य; त्याचा पुत्त विश्रवा व विश्रव्याचा पुत्र कुबेर होय. म्हणून त्यांना ‘वैश्रवण’ हे नाव मिळालं असा खुलासा रामायणात केला आहे.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!