नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, कोणत्याही मंगळवारी जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल, लाभ मिळेल. मंगळवारी रात्री एक छोटासा तोटका अवश्य करून पहा. मंगळवारचा दिवस हा तांत्रिक उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानला जातो.
मित्रांनो आपल्या जीवनात खूप गरीबी असेल, दारिद्र्य असेल, घरात पैसा येत नसेल, पैसा आला तरी तो टिकत नसेल, वारंवार आजारपण येत असेल, वैद्यकीय मदत घेऊन सुद्धा आजारपण हटत नसेल.
तर आपल्या जीवनात सुख समृद्धी परत आणण्यासाठी आपण मंगळवारी रात्री अगदी कोणत्याही मंगळवारी रात्री हा छोटासा उपाय नक्की करून पहा. या उपायासाठी आपल्याला फक्त एक लवंग लागणार आहे.
घेतलेली लवंग पूर्ण असावी, अखंड असावी, तुटलेली फुटलेली नसावी आणि या लवंग ला फुल सुद्धा असावे. मित्रांनो तंत्रशास्त्रात लवंग चे खूप मोठे महत्त्व आहे. लवंग किंवा इलायची हे दोन्ही तंत्र शास्त्रामध्ये खूप मोठे महत्व बाळगतात.
घरामध्ये एका पाटावर हनुमानाचा फोटो ठेवावा. त्यानंतर हनुमानाच्या फोटो समोर दिवा प्रज्वलित करावा. दिव्या मधील तेल मोहरीचे असेल तर अति उत्तम तुम्हाला त्याचा अति फायदा होईल. पण जर मोहरीचे तेल नसेल तर काही हरकत नाही.
पण तांत्रिक उपाय आहे त्यामुळे हा सल्ला असेल की आपण मोहरीचे तेल वापरावे. पण या दिव्यातील वाट सफेद न घेता लाल रंगाची असावी. तांत्रिक उपायांमध्ये त्याचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात.
छोट्या मोठ्या चुका सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊ देत नाहीत. ही लाल रंगाची वात बाजारात मिळून जाईल. पण जर मिळाली नाही तर कुंकू घेऊन त्यात पाणी मिक्स करून त्यामध्ये पांढरी वात भिजत ठेवा थोड्यावेळाने सुकून लाल झालेली वात तुम्ही वापरू शकता.
त्यानंतर घेतलेली लवंग हनुमानांच्या समोर त्यांच्या चरणी ठेवायची आहे. सोबत हनुमानांच्या पूजेत आपण गूळ-फुटाणे सुद्धा वापरू शकतो. लाल रंगाचे फुले हनुमानांना अतिशय आवडतात. आपण त्यांना लाल रंगाची फुले सुद्धा वाहू शकता.
हनुमंतांना जेवढे प्रसन्न करता येईल तेवढे प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. या पूजेनंतर एका मंत्राचा आपण जप करायचा आहे. हनुमंतांच्या चरणी ठेवलेल्या लवंगला स्पर्श न करता आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे.
तो मंत्र पुढील प्रमाणे –
ॐ नमो हनुमंतेय भय, भंजनाय सुखम कुरुकुरू फट स्वाहा॥
मित्रांनो मंत्राचा उच्चार स्पष्ट करा या मंत्राचा जॉब आपल्याला 108 वेळा करायचा आहे. मित्रांनो असे म्हटले जाते की हनुमान हे अमर आहेत. आजही त्यांच्या या पृथ्वीतलावर अस्तित्व आहे.
अगदी कमी प्रयत्नात प्रसन्न होणारी देवता म्हणजे हनुमान आहेत. त्यामुळे या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. या जपामुळे हनुमानांच्या चरनी ठेवलेल्या लवंग मध्ये आतोनात ताकद निर्माण होते, विलक्षण शक्ती येते आणि अशा प्रकारची शक्ती निर्माण झाल्यामुळे त्या लवंग मध्ये एक दैवी शक्ती अवतरते.
वर दिलेल्या मंत्राचा जप करून आपल्याला हनुमान चालीसाचा जितक्या वेळा आपल्याला पाठ करता येईल तितक्या वेळा करायचा आहे. अकरावा पाठ करावा पण जर शक्य नसेल तर एक वेळा केलात तरी काही हरकत नाही.
त्यानंतर जय श्रीराम या नावाचा जप करावा. जय श्रीराम भाजपा पण 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा करू शकता. त्यानंतर त्यांच्या समोर ठेवलेला वात हातात घेऊन आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या हनुमानांसमोर बोलून दाखवायचे आहेत.
बोललेल्या समस्या आपल्या घरात दोन लवंग सोबत बाहेर जाणार आहेत, त्यामुळे त्या लवंग समोर आपली इच्छा व्यक्त करू नका. त्या लवंग समोर फक्त तुमच्या समस्या व्यक्त करायच्या आहेत. समस्या बोलताना लवंग आपल्या उजव्या हातात घट्ट पकडून ठेवायचे आहे.
समस्या बोलून झाल्यानंतर घराच्या छतावर जाऊन किंवा घराच्या अंगणात जाऊन दक्षिणेकडे तोंड करून ही लवंग दक्षिणेकडे फेकून द्यायची आहे. जितके दूर फेकता येईल तितक्या दूर फेकून द्या. फेकल्यानंतर खाली पडलेल्या लवंग कडे न बघता सरळ घरी या. आणि हातपाय धुऊन घ्या.
त्यानंतर पुन्हा एकदा मारुतीरायां समोर नतमस्तक व्हा आपल्या जीवनातील अडचणी दूर कराव्यात अशी प्रार्थना करावी. उपाय करताना सुद्धा स्नान करून उपायाला सुरुवात केलेत तर मन प्रसन्न राहतं.
जोपर्यंत आपल्या अडचणी दूर होत नाहीत तोपर्यंत जर मंगळवारी हा उपाय करायचा आहे दर मंगळवारी जर हा उपाय करणे शक्य नसेल तर हनुमंतांसमोर एक मोहरीचा दिवा प्रज्वलित करत चला. ज्यांना शक्य असेल त्यांनी वर सांगितलेल्या मंत्राचा जप करा. हा उपाय नक्की करून पहा आणि जर लाभदायक वाटला तर पुन्हा करा.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!