मित्रांनो, बळकट आणि सुदृढ शरिरासाठी नियमितपणे व्यायाम करणे हे खुप गरजेचं आहे. आपल्या श-रीराच्या बळकटीसाठी पुशअप्स मारणे खूप फायदेशीर असते. याचमुळे मग ते जिम खेळणारे किंवा कुस्तीपटू असोत, प्रत्येकाला पुशअप्स करणे आवडते.
मित्रांनो, हा व्यायाम प्रकार आपण घरी किंवा कोठेही करु शकतात. पुशअप्स हा व्यायाम जितका प्रभावी आहे तितकाच तो करण्यासाठी अधिक सुलभ देखील आहे. परंतु आपल्याला हे माहिती आहे का आपण एका दिवसात किती पुशअप्स करायला हवेत आणि पुशअपचे काय फा’यदे आहेत?
एका दिवसाला किती पुशअप्स करावेत –
जर आपल्याला हे जाणून घ्यायचे असेल की एका दिवसात तुम्ही किती पुशअप्स केले पाहिजेत तर याचं उत्तर असं की असा कोणताही नियम नाही.
तरीही, व्यायाम करणारे किंवा प्रोफेशनल ट्रेनर यांना विचारले असता ते म्हणाले की निरोगी व्यक्ती एका वेळी किंवा एका दमात सरासरी 20-25 पुशअप्स करू शकते. तथापि, नियमित सराव करून, ही गणना 40-50 किंवा त्याहून अधिक वाढवता येऊ शकते.
पुशअप्स चे फा-यदे –
पुश अप करण्याचे फा-यदे खालीलप्रमाणे आहेत. जसे-
पुशअप्सने आपल्या श-रीराच्या अप्पर बॉडीचे भागास बळकटी मिळण्यास मदत होते. याचबरोबर, छाती, खांदे, हात मजबूत होतात आणि मसल्स देखील डेव्हलप होतात.
जर पुश-अप्स योग्य प्रकारे केले गेले असेल तर, ते पोटाच्या स्नायूंसाठी देखील फायदेशीर ठरते. यामुळे श-रीर बनण्यासाठी योग्य मदत होते. शा-रिरीक स्थिरता देखील वाढते.
आपण कार्डिओ वर्कआउटमध्ये पुश-अप्स देखील समाविष्ट करू शकतात. असे केल्याने तुमचे हृदय वेगाने धडधडण्यास सुरूवात होते आणि हृदयाची र-क्त पंप करण्याची क्षमता वाढते.
हा श-रीराचेच वजन उचलण्याचा व्यायाम आहे, त्यामुळे या व्यायाम प्रकाराने हाडे मजबूत होण्यास देखील मदत होते..
पुश-अप्स केल्यामुळे झुकलेले खांदे किंवा मणक्यांना सरळ करण्यासाठी मदत होते. ज्यामुळे आपल्या शरीराची मुद्रा सुद्धा सुधारते.
येथे दिलेली माहिती कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही आहे. ही माहिती केवळ प्रशिक्षणाच्या उद्देशाने दिली जात आहे. अजूनही माहीतीसाठी जाणकारांचा सल्ला जरुर घ्यावा..!!