एका निश्चित वेळेतच फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खायला हवे, जास्त वेळ ठेवलेल्या वस्तु बनतात वि-ष..!!

मित्रांनो आजकाल शहराच्या व्यस्त जीवनशैलीत, कधी कधी आपल्याला भूक लागते तेव्हा दिवसभराच्या स्ट्रेस मुळे ताजे जेवण तयार करणे आपल्याला शक्य नसते. हे बर्‍याचदा ऑफिस वर्क करणाऱ्या लोकांसोबत घडत असते, जे की वेळ वाचविण्यासाठी बऱ्याचदा जास्तीचे अन्न शिजवून ठेवतात आणि ते फ्रीजमध्ये ठेवून देतात.

उरलेले जेवण किंवा आहार फ्रिजमध्ये साठवण्याचा उद्देश एकतर जेवणाची नासाडी रोखण्यासाठी किंवा वेळ वाचविण्यासाठी हा असतो. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खराब होण्यापासून वाचते, किंवा आपण ते जास्त काळ टिकवून ठेऊ शकतो.

परंतु हेच अन्न आपले आरोग्य खराब होण्यापासून वाचवू शकते काय? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी, अन्न, फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवणे कींवा किती दिवस ठेवणे हे आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे ते आज आपण बघणार आहोत.

शिजवलेला तांदूळ –
रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आलेला व शिजवलेला तांदूळ 2 दिवसांच्या आत खायला हवा. फ्रिजमध्ये ठेवलेला भात खाण्यापूर्वी त्याला रुम टेम्परेचर वर कही वेळ तसेच ठेवावे मग, त्यानंतर भात व्यवस्थित गरम केल्यावरच खावा.

पोटदुखीचं कारण बनू शकते शिळी पोळी –
जर तुम्ही गव्हाची पोळी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवत असाल तर पोळी बनल्यानंतर 12 ते 14 तासांच्या आत ती खाणं आपल्या प्रकृतीसाठी चांगले आहे. पण आपण हे न केल्यास, त्यापोळी मधील पौष्टिक मूल्यांचा ऱ्हास होतो, यामुळे आपल्याला पोटदुखीचा देखील सामना करावा लागू शकतो.

फ्रिजमध्ये ठेवलेली दाळ किती दिवसांत खायला हवी –
जर जेवणामध्ये दाळ शिल्लक राहिली असेल आणि ती खराब होण्यापासून टाळण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवली असेल तर 2 दिवसांच्या आतच त्या दाळीचे सेवन करावे. 2 दिवसानंतर फ्रीजमध्ये ठेवलेल्या दाळ खाल्ल्यानंतर पोटामध्ये गॅस तयार व्हायला सुरवात होते.

कापलेली फळे कशी साठवावी –
कधीकधी कापलेली फळे उरुन पडतात. अशातच आपण त्यांना फ्रीजमध्ये ठेवून देतो. परंतु प्रत्येक फळ खाण्यासाठी एक निश्चित वेळ ठरलेली आहे. त्यानंतर ही फळं दूषित किंवा खराब होण्यास सुरुवात होते.

पपई हे फळ सहा तासांपेक्षा जास्त काळ टिकत नाही.
जर तुम्ही चिरलेला पपई फ्रिजमध्ये ठेवली असेल तर तुम्ही ती सहा तासांच्या आत खाऊन टाकायला हवी.

कापल्यानंतर 6 तासाने पपई दूषित होण्यास सुरवात होते. जर आपण ती 12 तासांनंतर खाल्ली तर ती तितकीच हानिकारक होते जितकी की ती कापण्याच्या वेळी पौष्टिक होती. नंतर आपल्या शरीरासाठी एखाद्या वि-षासारखं कार्य करू लागते.

सफरचंद आणि इतर फळे
सफरचंद कापल्यानंतर ते बराच वेळ ठेवल्यास त्यामध्ये ऑक्सिडायजेशन होण्यास सुरवात होते. त्यामुळे त्याचा वरचा थर काळा होऊ लागतो.

यामुळे कोणतेही खास नुकसान नाही होत. परंतु सफरचंद कापल्यानंतर ते 4 तासांत खाणे चांगले शरिरासाठी चांगले असते. तसे, तर आपण कोणतेही फळ कापले असेल तर ते 6 ते 8 तासांनंतर खाऊच नये.

दिर्घ काळासाठी फ्रीजमध्ये अन्न ताजे कसे ठेवावे –
बर्‍याचदा लोक कच्च्या भाज्यांबरोबरच फ्रीजच्या त्याच शेल्फवर शिजविलेले जेवण देखील ठेवतात. असे केल्याने फ्रिजमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात आणि जेवण लवकर खराब होऊ शकते.

कच्चे आणि शिजवलेले पदार्थ स्वतंत्र शेल्फवर ठेवल्यास, कच्च्या अन्नाचे जीवाणू शिजविलेले अन्न दूषित करीत नाहीत. आपण शिजवलेले अन्न स्टीलच्या टिफिनमध्ये किंवा एखाद्या भांड्यात झाकून ठेवले तर उत्तम राहील.

फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठीही एक निश्चित वेळ आहे. या वेळेतच किंवा त्यापूर्वी त्यांचे सेवन केले गेले पाहिजे. तरच शरीरास त्यातील योग्य ती पोषक तत्त्वे मिळू शकतील.

एका अहवालानुसार फ्रिजमध्ये ठेवलेली फळे आणि भाज्या पुढीलपैकी दिल्यानुसार इतक्या इतक्या.. दिवसातच खाल्ल्या पाहिजेत..!!

सफरचंद – 4 ते 6 आठवडे..
चेरी – 7 दिवस..
ब्लूबेरी, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी -3-6 आठवडे..
लिंबूवर्गीय फळे – 1 ते 3 आठवडे..
द्राक्षे – 7 दिवस..
टरबूज- खरबूज – अनकट – 2 आठवडे, चिरलेला – 2 ते 4 दिवस..
अननस – 5 ते 7 दिवस..
बीन – 3 ते 5 दिवस..
कोर्न – 1 ते 2 दिवस..
काकडी – 4 ते 6 दिवस..
वांगी – 4 ते 7 दिवस..
मशरूम – 3 ते 7 दिवस..

Leave a Comment