एखाद्या घरात गरिबी असण्याची.., किंवा अचानक गरिबी येण्यामागची ही मुख्य कारणे आहेत..

घरात गरीबी असते, ही गरीबी असण्याची वा येण्याची काही कारणे शास्त्रामध्ये सांगितली आहेत, आजच्या लेखात आपण या गरीबी येण्याची काही कारणे पाहणार आहोत.

विज्ञानात असे म्हटले जाते की, एखादी गतिमान वास्तु थांबण्यास अथवा थांबलेली वास्तु गतिमान होण्यास काहीतरी कारण असावे लागते, विज्ञानात तिला बाह्य शक्ति असे म्हटले जाते.

तेव्हा संपन्न घर गरीब होण्यास नक्कीच काहीतरी कारण असावे लागेल !! प्रत्येकालाच आपण संपन्न असावे अशी इच्छा असते आणि त्यासाठी तो प्रयत्न देखील करतो. पण तरीदेखील अनेकांना खूप सहजपने गोष्टी मिळतात तर अनेकांना त्या कधीच मिळत नाहीत.

एखाद्या नोकरीवाल्याचा तुटपुंजा पगार त्याला पुरून उरतो याउलट एखाद्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी काळा बाजार करावा लागतो, आणि तरीही तो सुखी नसतो.

येणारा गडगंज पैसदेखील टिकत नाही असेही अनेक जन आहेत. याला अनेक करणे आहेत पण, घरामध्ये वास्तुदोष अथवा ग्रहदोष असणे हेही याचे एक महत्वाचे कारण असू शकते.

आता हे ग्रहदोष दूर करण्यासाठी काही उपाय आहेत. यासाठी अगोदर आपल्याला ओळखावे लागेल की आपल्या घरात दोष आहे की नाही. आता हे कसे ओळखावे ?

एक साधारणपने जर तुम्हाला आपल्या घरात नेहमी अशांत, अस्वस्थ किंवा बेचैन वाटत असेल. डोक्याला काहीही टेंशन नसले तरीही हजारो नकारात्मक विचार तुम्हाला भेडसावत असतील तर याचे कारण वास्तुदोष असू शकते.

वास्तुदोष निवरणासतीह तुम्ही पुजा करू शकता. घरामधे केली जाणारी ‘सत्यनारायन’ पुजा ही यासाठी सर्वोत्तम. याशिवाय दर पोर्णिमेला घरात सत्यनारायण करणे हे खूप लाभकरक. पोर्णिमेला असेल केल्याने वास्तुदोषाबरोबरच पितृदोष देखील निवरला जातो.

संध्याकाळी झोपणे अथवा झाडून घेणे हे देखील गरीबीचे एक लक्षण मानले जाते. असे म्हटले जाते की ‘तिसरा प्रहर’ हा देवपूजेचा असतो आणि यावेळी लक्ष्मी घरात येते अशा वेळी तिचा अपमान होईल अशा कोणत्याही गोष्टी करू नयेत.

या शिवाय ज्या घरात आई वडिलांचा अपमान होत असेल किंवा वाद होत असतील, पती पत्नीमध्ये सौख्य नसेल तर या घरात लक्ष्मी कधीही टिकत नाही. ज्या घरात शांती आणि समाधान आणि आनंदी वातावरण असेल तिथे नेहमी लक्ष्मी वास करते.

घरात स्त्री आंघोळ न करता देवघरात पुजा करत असेल अथवा स्वयंपाक करत असेल किंवा या दोन ठिकाणी चपला घालून वावरत असेल तर अशा घरात देखील समाधान राहत नाही.

Leave a Comment