तब्बल एक वर्षानंतर सूर्यदेव वृषभ राशीत गोचर.. 3 दिवसानंतर या राशींना मिळणार फळ..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रह हा सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे. सूर्य ग्रहाला आत्मा, पिता आणि राजकारणाचा कारक ग्रह मानलं जातं. जातकाच्या कुंडलीत सूर्य ग्रह मजबूत स्थितीत असेल तर जातकाला उच्च पद आणि मानसन्मान मिळतो. सूर्यदेवांची मेष ही उच्च रास, तर तूळ ही नीच रास आहे. सूर्यदेव एका राशीत महिनाभर राहून गोचर करतात. सूर्याच्या गोचराला संक्रांती असं म्हंटलं जातं. येत्या 15 मे रोजी वृषभ संक्रांती आहे. या दिवशी सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत गोचर करणार आहे. वर्षभरानंतर सूर्यदेव वृषभ राशीत येणार आहेत.

सूर्यदेव वृषभ राशीत 15 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजून 32 मिनिटांनी गोचर करेल. या राशीत महिनाभर राहिल्यानंतर 15 जून 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी बुधाचं स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत गोचर करेल. सूर्य मिथुन राशीत 30 दिवस राहील यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल.

सूर्याच्या राशी गोचरानंतर या राशींसाठी अच्छे दिन..
वृषभ रास – सूर्यदेव या राशीच्या चतुर्थ स्थानाचे स्वामी आहेत. या राशीत गोचर करत सूर्यदेव प्रथम स्थानात असतील. त्यामुळे कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. तुम्हाला कुटुंबाची चांगी साथ मिळेल. आईकडून तुम्हाला काही मौल्यवान वस्तू मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा काळ चांगला असेल. मेहनतीच्या जोरावर या काळात यश संपादन कराल.

कर्क रास – या राशीच्या दुसऱ्या स्थानाचा स्वामी सूर्य आहे. गोचर कालावधीत सूर्यदेव एकादश भावात गोचर करणार आहे. त्यामुळे या काळात मनातील काही इच्छा पूर्ण होतील. मित्रांशी भेट होईल, तसेच काही नवीन ओळखी तयार होतील. वैवाहित जीवनात सूर्याचा चांगला प्रभाव असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. पदोन्नती किंवा वेतनवाढ या काळात होऊ शकते.

सिंह रास – ही सूर्याची स्वामित्त्व असलेली रास आहे. सूर्य गोचर या राशीच्या दहाव्या स्थानात होत आहे. त्यामुळे करिअरमध्ये चांगले परिणाम या काळात दिसून येतील. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना नोकरी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी चांगल्या पदावर वर्णी लागेल. गुप्तशत्रू तुमच्या चांगल्या काळामुळे आसपासही येणार नाही. समाजात मानसन्मान वाढेल.

मकर रास – या राशीच्या अष्टम स्थानाचा स्वामी सूर्य आहे. गोचर पाचव्या स्थानात होत आहे. त्यामुळे या काळात अध्यात्माकडे रुची वाढेल. जोडीदाराकडून चांगलं सहकार्य मिळेल. या काळात नोकरीमध्ये बदल होऊ शकतो. या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.

मीन रास – या राशीच्या तिसऱ्या आणि सहाव्या स्थानाचा स्वामी सूर्य आहे. सूर्यदेव सहाव्या स्थानात गोचर करत आहे. त्यामुळे या काळात आत्मविश्वास दुणावलेला राहील. करिअरमध्ये काही उत्तुंग शिखरं गाठाल. अभ्यासात विद्यार्थ्यांना सूर्याची साथ मिळेल. तसेच एकाग्रता वाढलेली दिसेल. या काळात तीर्थ यात्रा करण्याचा योग जुळून येईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment