त्याच्यासाठी रशियन गर्ल बोलवू.. सतीश कौशिकला ब्लू पिल्स देऊन.. सतिश कौशिक प्रकरणात खळबळजनक खुलासा…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणात घातपाताचा संशय बळावला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत एका महिलेने तिचा उद्योगपती पती आणि कुबेर ग्रुपचे प्रमुख विकास मालू याच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिने विकास मालूने सतीश कौशिक यांच्याकडून गुंतवणुकीसाठी 15 कोटी रुपये घेतल्याचा दावा केला आहे. कोरोना काळात पैसे बुडाल्यानंतर सतीश कौशिक यांना मार्गातून हटविण्यासाठी कट रचला, असा आरोप करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण.. व्यापारी विकास मालूच्या दुसऱ्या पत्नीने दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पाठवलेल्या तक्रारीत म्हंटलं की, “माझा 13 मार्च 2019 ला विकास मालू यांच्याशी कायदेशीर विवाह झाला होता. विकासनेच माझी ओळख अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्याशी करून दिली. भारतात आणि दुबईत ते आमच्या कुटुंबाचे अत्यंत जवळचे पाहुणे होते. त्यांचं आमच्या घरी नियमित येणं-जाणं होतं.

23 ऑगस्ट 2022 रोजी सतीश कौशिक आमच्या दुबईमधील घरी आले होते. यावेळी त्यांनी विकासकडे त्यांचे 15 कोटी रुपये परत मागितले. त्यावेळी मी ड्रॉईंग रूममध्ये होते. सतीश कौशिक आणि विकास यांच्यात पैशांवरुन वाद झाला. आपल्याला या पैशांची गरज असल्याचं सतीश कौशिक सांगत होते. सतीशजींनी 3 वर्षांपूर्वी विकासला गुंतवणुकीसाठी 15 कोटी रुपये दिले होते. परंतु विकासने ना त्या पैशाची गुंतवणूक केली ना तो पैसे परत केले. तो सतीश यांच्या सोबत एकप्रकारे फसवणूक करत होता.

विकास मालूने यावेळी सतीश कौशिक यांना 15 कोटी रुपये लवकरच भारतात येऊन परत करण्याचं आश्वासन दिलं. त्याच रात्री विकास बेडरूममध्ये आला तेव्हा मी त्याला विचारलं होतं, सतीश कौशिकजी कोणते पैसे मागत होते? तेव्हा विकास म्हणाला, ‘त्यांनी 15 कोटी रुपये दिले होते, पण ते कोरोनामध्ये बुडाले’. मी त्याला विचारले आता काय करणार? तर विकास म्हणाला, “एखाद्या दिवशी रशियन मुलीला फोन करून ब्लू पिल्सचा ओव्हरडोज देईन, मग तो तसाच मरून जाईल. हे पैसे कोण परत करत आहे?”

दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 ऑगस्ट 2022 रोजी सतीश कौशिक यांनी पुन्हा विकासकडे 15 कोटी मागितले. तेव्हा विकास संतापला आणि अरे-तुरे करत म्हणाला, “मी तुला एकदा सांगितलं ना की नुकसान झालं आहे, पण तुला भारतात परत येऊन पैसे परत करतो. जास्त दंगा केला तर तु 15 कोटी रोख दिले आहेत, त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही, जरा धीर धर”,अशी धमकी दिली.

विकासची ही धमकी ऐकून सतीश कौशिक कमालीचे हादरले. पण मला 15 कोटींची प्रॉमिसरी नोट दिली आहेस, असं त्यांनी विकासला सांगितलं. नेमकं त्याच रात्री विकासने मला सांगितलं की, “सतीश कौशिकचा लवकर बंदोबस्त करावा लागेल, अन्यथा तो गप्प बसणार नाही.”

पुढे बोलताना संबंधित महिलेनं आणखी गंभीर आरोप लावले. ती म्हणाली, विकासजवळ अनेक प्रकराचे ड्रग्ज यात मग हेरॉइन, ब्लू पिल्स, पिंक पिल्स, एमडीएमए, जीएसबी अशा गोष्टींचं मोठं कलेक्शन आहे. याचा वापर तो दिल्लीत फार्म हाऊसवरील अनेक पार्ट्यांमध्ये करायचा. जेव्हा मी या सगळ्या ड्रग्जबाबत विचारलं तेव्हा तो मला म्हणायचं, “तुला नाही समजणार”

पत्नीने तक्रारीत पुढे म्हंटलं की, विकास मालूचे अनेक उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांशी आणि सर्वपक्षातील राजकारण्यांशी चांगले संबंध आहेत. स्वतःला वाचविण्यासाठी तो त्यांचा वापर करु शकतो. पण विकास गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला तुरुंगवासही भोगावा लागला आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन सतीश कौशिक यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी निष्पक्ष तपास व्हायला हवा, अशी मागणीही केली आहे.

दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप :
महिलेने तिच्या आरोपांमध्ये दावा केला की, विकास मालूचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत आणि तो देशविरोधी कारवायांमध्ये सामील आहे. याची खातरजमा करण्यासाठी विकासच्या पत्नीने तक्रार अर्जासोबत एक फोटोही सादर केला आहे. हा फोटो विकास मालूने दुबईत आयोजित केलेल्या पार्टीचा असल्याचा दावा केला आहे.

या फोटोत अभिनेता सतीश कौशिक आणि दाऊद इब्राहिमचा मुलगा अनस ही उपस्थित होता. सतीश कौशिक दुबईत झालेल्या पार्टीत सहभागी होण्यासाठी गेले होते. विशेष म्हणजे संबंधित महिलेनेही पती विकास मालूवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

जाणून घ्या कोण आहे विकास मालू?
विकास मालू कुबेर ग्रुपचा मालक आहे. त्याचे वडील मूलचंद मालू यांनी 1985 मध्ये कुबेर खैनी यांच्यासोबत हा ग्रुप सुरू केला. 1993 मध्ये विकास मालू ग्रुपचे संचालक झाले. कुबेर ग्रुपचा व्यवसाय 50 देशांमध्ये पसरलेला आहे. कुबेर ग्रुप सर्व प्रकारचे पान मसाले, माउथ फ्रेशनर, सुगंध (धूप आणि अगरबत्ती), खाण्यायोग्य आणि अखाद्य तेले इत्यादींच्या उत्पादनाच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. विकास मालू व्यवसायाव्यतिरिक्त बॉलिवूड स्टार्समध्ये खूप लोकप्रिय आहे.

सतीश विकासच्या पार्टीला आला होता – होळीच्या दिवशी अभिनेता सतीश कौशिकने विकास मालूच्या दिल्लीतील फार्म हाऊसवरील पार्टीत मुंबईहून हजेरी लावली होती. रिपोर्ट नुसार, सतीश कौशिक गुरुग्राममध्ये विकास मालूच्याच घरी थांबला होता. पार्टीच्या रात्री, कौशीक यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे.

आरोपांनी बदलली तपासाची दिशा – दरम्यान, सतीश कौशिकच्या मृत्यूनंतर विकास मालूच्या पत्नीने पोलिसांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाला नवीन वळण दिलं आहे. सतीश कौशिक यांना चुकीचे औषध पाजल्यासारखे गंभीर आरोप महिलेने पती विकासवर केले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विकास मालूच्या पत्नीलाही चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे.

या आरोपांवर विकास मालू यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, “सतीशजी 30 वर्षांपासून माझ्या कुटुंबाचा एक भाग होते आणि माझे नाव जगासमोर चुकीचे सांगण्यास एक मिनिटही लागला नाही. मला सांगायचे आहे की संकट कधीच सांगून येत नाही आणि त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. अजूनही या धक्क्यातून सावरलेलो नाही.”

Leave a Comment