Thursday, December 7, 2023
Homeअध्यात्मGanesh Utsav Ananat Chaturthi Special गणेशोत्सव विशेष अनंत चतुर्थीला चुकून चंद्रदर्शन झाले...

Ganesh Utsav Ananat Chaturthi Special गणेशोत्सव विशेष अनंत चतुर्थीला चुकून चंद्रदर्शन झाले तर? का निषिद्ध मानले जाते? शास्त्र जाणून घ्या..

Ganesh Utsav Ananat Chaturthi Special गणेशोत्सव विशेष अनंत चतुर्थीला चुकून चंद्रदर्शन झाले तर? का निषिद्ध मानले जाते? शास्त्र जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… (Ganesh Utsav Ananat Chaturthi Special) अनंत चतुर्थी.. या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते. चुकून वा अनावधानाने चंद्र पाहिल्यास नेमके काय करावे? भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली असून, शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणपती बसवायची प्राचीन परंपरा आहे. मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी ची सांगता झाली होती. विशेष म्हणजे यंदा दुर्मिळ, अद्भूत मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला होता. पाहिल्या दिवशीपासून पुढील 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो.

या शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे महात्म्य अधिक असते. याच तिथीला वरद चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. भाद्रपद चतुर्थी साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथा मिळतात. (Ganesh Utsav Ananat Chaturthi Special) महादेव शिवशंकरांनी प्रथम जन्मोत्सव साजरा केला, असे सांगितले जाते. तर श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला. मात्र, या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीला कलंक चतुर्थी असेही म्हटले जाते. या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन घडल्यास चोरीचा आळ येतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. विष्णु पुराणातील एका उल्लेखानुसार, श्रीकृष्णांना एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घडले होते. (Ganesh Utsav Ananat Chaturthi Special) त्यानंतर स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप झाला श्रीकृष्णांवर झाला होता. या दिवशी चंद्रदर्शन का निषिद्ध मानले जाते? चुकून वा अनावधानाने चंद्रदर्शन झाल्यास काय करावे? यावर उपाय काय? जाणून घेऊया…

चंद्राचे उपहासाने हसणे गणपतीला रुचले नाही. एका पौराणिक कथेनुसार, गणपती मूषकासह कैलासावर फेरफटका मारत होते. नुकतेच जेवण झाल्यामुळे गणपतीचे उदर चांगलेच लंबोदर दिसत होते. (Ganesh Utsav Ananat Chaturthi Special) बालगणेशाच्या त्या रुपाला पाहून चंद्राला आपले हसू आवरले नाही आणि तो जोरजोराने हसू लागला. मूषकासोबत जात असताना चंद्राने असे उपहासाने हसणे गणपतीला अजिबात रुचले नाही.

त्यांनी याबद्दल चंद्राला जाब विचारला. मात्र, चंद्राचे हसणे थांबले नाही. शेवटी गणपतीला राग अनावर झाला. चंद्रदेव, तुम्हाला तुमच्या रुपावर फार गर्व आणि अहंकार आहे ना. यापुढे तुमचे तोंड कोणीही पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल, असा शाप दिला. (Ganesh Utsav Ananat Chaturthi Special) पाहता पाहता एकेक दिवस चंद्राचा क्षय होऊ लागला. चंद्र भयभीत झाले. शेवटी ते महादेवांना शरण गेले.

हे सुद्धा पहा : Ganesh Puja Importance आज गणपती बाप्पांच्या साधनेत करू नका ही चूक..

शेवटी गणपतीने चंद्राला शापमुक्त केले. चंद्राने महादेव शिवशंकरांची कठोर तपश्चर्या केली. चंद्रदेवाला महादेवांनी अभय दिले आणि आपल्या मुकुटावर धारण केले. चंद्राच्या प्रार्थनेवरून महादेव ज्योतिर्लिंग स्वरुपात प्रकट झाले आणि सोमनाथ नावांनी प्रसिद्ध झाले. महादेवासह सर्व देवतांनी गणपतीला खूप समजावेल. शेवटी गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. (Ganesh Utsav Ananat Chaturthi Special) परंतु, भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील, त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल, असे स्पष्टपणे सांगितले.

चुकून वा अनावधानाने चंद्रदर्शन झाल्यास काय करावे? भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून वा अनावधानाने चंद्रदर्शन झाल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. चुकून चंद्रदर्शन झालेल्यांनी संकष्ट चतुर्थी व्रत करावे. यथासांग, यथाशक्ती हे व्रत केल्यास खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घडल्यामुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. श्रीकृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे तो आळ गेला, अशी एक कथा सांगितली जाते.

दरम्यान, गणेश चतुर्थीच्या दिवशी जर चंद्र पाहिला तर चोरीचा आळ येतो ही चुकीची समजूत आहे. चंद्रदर्शनाचा आणि चोरीचा आळ येण्याचा काहीही संबंध नाही, असे तज्ज्ञ सांगतात. (Ganesh Utsav Ananat Chaturthi Special) मात्र, गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून वा अनावधानाने चंद्रदर्शन झाल्यास,

“सिंहःप्रसेनमवधीत्, सिंहो जाम्बवता हतः। सुकुमारक मा रोदीस्तव, ह्येष स्यमन्तकः।।”,

सदर मंत्राचा २८, ५४ किंवा १०८ वेळा जप करावा. तसेच श्रीमद्भागवताच्या दहाव्या स्कंदातील ५७ वा अध्याय पाठ केल्यानेही चंद्रदोष नाहीसा होतो, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे संकष्ट चतुर्थीचे व्रत आचरावे. गणपती विघ्नहर्ता, तापहीन मानला जातो. (Ganesh Utsav Ananat Chaturthi Special) त्यामुळे मनापासून आणि प्रामाणिकपणे केलेली गणेश उपासना लाभदायक ठरते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स