गणेश विसर्जन करतांना काय काय करावे.? गणेश विसर्जन पुजा कशी करावी..? जाणून घ्या शुभ मुहूर्त.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! महाराष्ट्रात भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी गणरायाचं आगमन होतं. त्यानंतर किमान दीड ते 10 दिवस बाप्पा घरी विराजमान होतात. अनेक ठिकाणी गणेश विसर्जन हे 5..7 दिवसांनी देखील करण्याची प्रथा आहे. तसेच हिंदू धर्म ग्रंथानुसार, या दिवशी शयन अवस्थेत असलेले भगवान श्री विष्णूंची अनंत स्वरुपात पूजा केली जाते.

याच दिवशी गणेशोत्सवाची सांगता करत गणपती मूर्तींचे विसर्जन केले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होऊन पार्थिक गणपती पूजन केले जाते.

पुढील १० दिवस कुळाचाराप्रमाणे विधिपूर्वक गणेशाचे यथासांग मनोभावे पूजन केले जाते. यानंतर अनंत चतुर्दशीला गणपती मूर्तींचे योग्य मुहुर्तावर विसर्जन केले जाते. यामध्ये कोणी गणपती बाप्पाना 10 दिवस तर कोणी दीड दिवसात तर कोणी 3 दिवसात, कोणी पाच किंवा सात दिवसात बाप्पांचे विसर्जन करतात.

बहुतेक व्यक्ती श्री गणपती बाप्पाना 10 दिवस घरात ठेवत असतात. या काळात वेगवेगळे गोड पदार्थ केले जातात, बाप्पांची पूजा आरती आणि नैवेद्य व अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या उत्साहात बाप्पांचे विसर्जन केले जाते. मात्र गणेश पुराणानुसार, घरात गणपती बाप्पाची स्थापना केल्यास कशाप्रकारे त्यांचे विसर्जन करावे, याची माहिती सांगितली आहे.

गणेशोत्सव हा 10 किंवा 11 दिवसांचा असतो, या दिवसात आपण बाप्पांचे दोन वेळा म्हणजे सकाळी व संध्याकाळी आरती करतो, तसेच त्यांना दोन्ही वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतो. असे म्हणतात की, बाप्पांना जन्म हा दुपारी झाल्यामुळे, बाप्पाची पूजा दुपारीच केली जाते. तसेच गणपती बाप्पाना लाडू आणि मोदक अतिप्रिय आहेत, म्हणून त्यांना लाडू मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा.

बाप्पांना दूर्वा ती खूप प्रिय आहेत, म्हणून जोपर्यंत आपल्या घरात बाप्पा आहेत, तोपर्यंत बाप्पांना दररोज एक दुर्वांची जुडी अर्पण केली पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला बाप्पांचे विसर्जन करायचे असेल, भगवंतांना महानैवेद्य अर्पण करावा. पंचपक्वान्नाचे ताट बनवावे. पाच फळे, लाडू, मोदक आणि मिठाई असे सर्व पदार्थ गणपती बाप्पाना पुढे ठेवावे.

बाप्पांना या सर्व पदार्थांची चव घेण्यासाठी प्रार्थना करावी,मग त्यानंतर बाप्पांची आरती करावी. त्यासाठी एक पाठ घ्यावा, त्यावर एक स्वच्छ लाल आसन टाकावे. त्यावर पाटाच्या चारही कोपऱ्यांना ते 1 सुपारी ठेवावी आणि बाप्पाचा जयघोष करीत, गणपती बाप्पांची मूर्ती उचलून त्या पाटावर ठेवावी. तसेच बाप्पांना पाठवणी करण्यासाठी, एक शिदोरी द्यावी.

शिदोरीमध्ये एका लाल वस्त्रात पाच फळे आणि पाच मोदक, एखादे फूल व थोडीशी दक्षिणा ठेवावी व हीच शिदोरी बाप्पांना बरोबर घ्यावे. गणपती बाप्पांचे विसर्जन नदी किंवा तलाव किंवा समुद्रात केले जाते. जर तुमची मूर्ती शाडू मातीची इको-फ्रेंडली असेल तर तुम्ही घरातच एखाद्या टपात मूर्ती विसर्जन करू शकता व त्यानंतर ते पाणी माती झाडांमध्ये टाकून द्यावे. बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी आपण जय पाटावर बाप्पांना बसवलेले आहे.

मग गणपती बाप्पाना आपल्या हृदय स्थानावर तो पाठ करावा व संपूर्ण घर बाप्पाना दाखवावे आणि प्रार्थना करावी. तसेच त्यांना आपण ज्या परिस्थितीत आहोत, पुढील वेळीस यापेक्षा चांगली परिस्थिती असू द्या, असे म्हणून बाहेर आणावे आणि आपल्या सोयीनुसार विसर्जन स्थळी जावे.

तेथे बाप्पांची कापुराने आरती करावी. मग यानंतर आपण 10 दिवस बाप्पांना जो काही नैवेद्य, हार आणि फुले अर्पण केली आहेत, एका कापडात बांधून आणावे व निर्माल्य कलशात टाकावेत. बाप्पांची आरती झाल्यानंतर बाप्पाचे मनोभावे दर्शन घ्यावे व त्यांच्याकडे सुख समाधान व शांततेसाठी करून त्यांचे विसर्जन करावे.

तसेच विसर्जन करताना ” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा बाप्पांना जल्लोष करावा. आपण सोबत आणलेली शिदोरी बरोबर द्यावी आणि पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणून त्यांच्याकडे प्रार्थना करावी. आपली जी काही इच्छा मनोकामना असेल, ते बाप्पांना सांगावे.

तसेच या कळत-नकळतपणे आपल्या हातून काही चूक झाली असेल, तर बाप्पाकडे क्षमा मागावी आणि बाप्पाचा जयघोष करीत आपण ज्या ठिकाणी बाप्पा विसर्जन केले आहे, तेथील थोडीशी वाळू बरोबर घेऊन घरी यावे. मग त्यानंतर ज्या ठिकाणी आपण बाप्पांची स्थापना केली होती, त्या ठिकाणी ती वाळु ठेवून त्याची आरती करावे.

तसेच समईमध्ये जोपर्यंत तेल आहे, तोपर्यंत ती लावून ठेवावे. मग दुसऱ्या दिवशी संपूर्ण भागात ही वाळू टाकून द्यावी किंवा कुंडीत टाकावे, यामुळे बाप्पाचा आशीर्वाद आपल्या घरात कायम राहिल.

अनंत चतुर्दशी तिथीला सुरुवात –
19 सप्टेंबर 2021, रविवार सकाळी 6:07 पासून सोमवार सकाळी 5:30 पर्यंत आहे.
।। गणपती बाप्पा मोरया।।
।।पुढच्या वर्षी लवकर या।।

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment