गणपती बाप्पा मोरया केव्हापासून म्हणायला लागले.? या प्रथेला कशी झाली सुरुवात.?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! 10 सप्टेंबरपासून जवळपास प्रत्येक घरात 10 दिवसांसाठी श्रीगणेश विराजित झालेत. 64 कलांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा समस्त भक्तजनानांचा लाडका आहे. महाराष्ट्रात गणपती हे आराध्य दैवत आहे. कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते.

सगळीकडे गणपती बाप्पांच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच घरोघरी व गल्लीबोळातून “गणपती बाप्पा मोरयाचा” नाद आपल्या सतत कानावर येतोय. परंतु गणपती बाप्पा मोरया का म्हणतात या शब्दाचा नेमका अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

मात्र गणपती बाप्पासोबत मोरया का म्हटले जाते, या विषयी फार कमी लोकांना आणि कदाचितच माहिती असावे. गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे तब्बल 600 वर्ष जुनी एक कथा आहे. 1400 शतकात पुण्यातील चिंचवडमध्ये मोरया गोसावी नावाचे एक महान गणेशभक्त राहत होते. ते गणपती बाप्पाची खूप श्रद्धेने पुजा करीत असत.

त्यांनी चिंचवडमध्ये खूप गणेश साधना केली. दरवर्षी गणेश चतुर्थी आली की, मोरया गोसावी पाई पाई अनेक किलोमीटर दूर , मयुरेश्वर मंदिरात बाप्पांच्या दर्शनाला जात असत.त्या काळी माणसांचे आयुष्यही भरपूर असायचे, त्यांचा हा नियम 117 वर्षे अखंड चालू होता. मात्र कालांतराने त्यांचे वय झाले असल्यामुळे, म्हणून त्यांना मंदिरात इतक्या लांब जाणे कठीण जाऊ लागले.

या गोष्टीचे त्यांना खूप वाईट वाटले, मात्र त्यांनी नियम सोडला नाही.असेच एके दिवशी, साक्षात गणपती बाप्पा स्वतः त्यांच्या स्वप्नात आले व मोरया गोसावींना म्हणाले की, “तुला नदीमध्ये एक मूर्ती सापडेल”,मग त्यांवर ते लगेच जागे झाले आणि पहाटे नदीवर स्नानाला गेले असता त्यांना अंघोळ करतेवेळी एक गणपती बाप्पांची मूर्ती सापडली.

मग त्यांनी ती मूर्ती घरी आणली.ज्या वेळी गावातल्या लोकांना या गोष्टीची माहिती झाली, तर ते सर्वजण मोरया गोसावीचे व त्याला मिळालेल्या मूर्तीचे दर्शन करण्यासाठी गर्दी करू लागले. हळूहळू ही वार्ता आसपासच्या गावातही पोहोचले आणि आसपासच्या गावातील लोकही येथे दर्शनाला येऊ लागले. याशिवाय असे सांगितले जाते की, मोरया गोसावीनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली होती.

तेव्हापासून हे मंदिर संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले आहे. मग गणेश भक्तांनी गणपती बाप्पांच्या नावासोबत मोरया यांच्या नावाचाही जय जयकार करण्यास प्रारंभ केला. कारण आपल्या भारतामध्ये देवाच्या महान आणि अत्यंत श्रद्धाळू भक्तांचीही पूजन केले जाते. कारण येथे तर्कशास्त्र व विज्ञानाची काहीही करू शकत नाही. त्यामुळे या कथेनुसार, गणपती बाप्पा मोरया मधील मोरया म्हणजे मोरया गोसावी यांचे नाव आहे.

दुसऱ्या एका कथेनुसार मोरया शब्दाच्या पाठीमागे, मोरगावचे गणपती बाप्पा असल्याचे सांगितले जाते. हे अष्टविनायकातील सर्वात पहिले गणपती आहेत. याशिवाय गणेश पुराणानुसार, सिंधु दैत्याच्या जाचातून मुक्त होण्यासाठी, सर्व देवतांनी भगवान श्री गणेश यांना आवाहन केले होते.

तेव्हा सिंधु दैत्याच्या संहार करण्यासाठी बाप्पांनी मयुराचे म्हणजेच मोराचे वाहन घेतले होते. तसेच सहा भुजाचा अवतार धारण केला आणि सिंधु दैत्याचा सर्वनाश केला होता. गणपती बाप्पांचा मयुरेश्वर अवतार आहे व त्यांच्या नावावरूनच मोरेश्वराचे मोरगाव असे नाव पडले आहे.

असे म्हटले जाते की, वामन भट व त्यांची पत्नी पार्वती यांना मोरेश्र्वराच्या आराधना व कृपा आशीर्वादामुळे पुत्राची प्राप्ती झाली होती. परंपरेनुसार, त्यांनी त्यांच्या आराध्या देवीच्या नावावरूनच आपल्या मुलाचे नाव “मोरया” असे ठेवले होते.मात्र पुणे शहरापासून सुमारे 80 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या मोरेश्वराची स्थापनाची नोंद इतिहासात नाही.

मात्र मोरया गोसावींच्या या अद्भुत भक्तीने याच तीर्थस्थानाला सर्व गणेश भक्तांसाठी महत्त्वपूर्ण बनवून दिले आहे. त्यामुळे अष्टविनायकांचे दर्शन करतेवेळी, सर्वप्रथम मोरेश्वराचे दर्शन घेतले जाते, तसेच या यात्रेचा शेवटही मोरेश्वराच्या दर्शन घेत होतो.

तर मित्रांनो असा अर्थ आहे, गणपती बाप्पा मोरया म्हणण्यामागे…
।। गणपती बाप्पा मोरया ।।

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment