Thursday, December 7, 2023
Homeअध्यात्मगणपतीची प्रतिमा घराच्या दरवाजावर लावण्यामागचे काय आहेत संकेत.??

गणपतीची प्रतिमा घराच्या दरवाजावर लावण्यामागचे काय आहेत संकेत.??

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. सर्व देवी देवता मध्ये गणपती बाप्पांची पूजा सर्वात आधी केली जाते. संसारातील सर्व साधनांचे स्वामी गणपती आहेत.

हिंदू धर्मात कोणतेही कार्य करण्याच्या आधी गणपती बाप्पाचे पूजन केले जाते. त्याशिवाय ते कार्य पूर्ण होत नाही. म्हणून गणपतींना आधि पूज्य ही म्हणले जाते. गणपतींची पूजा विधी व शास्त्रानुसार यथास्न केली गेली.

तर घरातील सर्व कष्ट, दुःख, धनाची कमी या सर्व गोष्टीतून मुक्तता मिळू शकते. परंतु अपुरी माहिती व अज्ञानामुळे आपण गणपतीची स्थापना करताना काही चुका करून बसतो. त्यामुळे घरातील सुख शांती वर त्याचा विपरीत परिणाम होतो.

व आपण मानसिक आजारांना बळी पडतो. पुराना गणपती बाप्पांना सुखकर्ता व विघ्नहर्ता म्हटले जाते. व म्हणून आपले प्रत्येक विघ्नापासून रक्षण करण्यासाठी व सुख मिळवण्यासाठी गणपतीची स्थापना योग्य प्रकारे करा.

प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो अशाप्रकारे लावू नये की त्यांची नजर समोर बाहेरच्या बाजूला असेल. गणपतीची नजर आपल्या घराकडे असावी. त्याबरोबरच ज्या ठिकाणी आपण गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावला असेल अगदी त्याच्यामागे दुसरी मूर्ती किंवा फोटो लावावा.

कारण गणपती बाप्पाची पाठ घराकडे असता कामा नये. असे म्हटले जाते कि गणपती बाप्पांच्या पाठीमागे दारिद्र्य व दुःख यांचे निवासस्थान असते. व आपण त्यांच्या पाठीमागे दुसरी मूर्ती किंवा फोटो लावल्यास तो दुष्प्रभाव आपल्या घरात येत नाही.

त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या दोन मुर्त्या किंवा फोटो एकाच ठिकाणी ठेऊ नये. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार असे केल्याने दोन्ही मुर्त्यातील ऊर्जेची टक्कर होते. व त्यातून अशुभ ऊर्जा निर्माण होते. व त्याचे अशुभ फळ आपल्याला मिळते.

जर घरात गणपतीच्या दोन मूर्ती असतील तर त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी स्थापना करावी. एकाच जागी दोन मूर्ती ठेवू नये. जर घरातील गणपतीची मूर्ती खंडित झाली असेल, मूर्तीचा रंग फिकट झाला असेल तर त्या मूर्तीला लगेचच वाहत्या पाण्यात किंवा तलावात विसर्जित करावी.

आणि त्या ठिकाणी दुसरी मूर्ती आणून बसवावी. खंडित झालेली व बेरंग झालेली मूर्ती असेल तर त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळत नाही. आणि आपल्याला याचा पूर्णपणे लाभ मिळत नाही. घरात गणपतींच्या डाव्या सोंडेची मूर्ती असने जास्त मंगलकारी असते.

कारण याची पूजा केल्यास ते लवकर प्रसन्न होतात व शुभ फळ मिळते. उजव्या सोंडेचा गणपती उशिरा प्रसन्न होतात. व त्यांची पूजा ही खूप अवघड असते. जे आपल्या हातून रोज करणे शक्य नसते.

गणपतीचे पूजन करण्यासाठी पूर्व दिशा किंवा ईशान्य दिशा या दिशांना त्यांची स्थापना करावी. घरात स्थापन करताना त्यांना ईशान्य दिशेला स्थापन करावे. व त्यांचे मुख पश्चिम दिशेला असावे. जर तुमचे इष्टदेव गणपती असतील तर मधोमध गणपतीची स्थापना करावी.

मंदिरात फक्त एकाच देवीदेवतांची मूर्ती ठेवू नये. जर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हावे असे वाटत असेल तर मंदिरात सर्व देवी देवतांची पूजा करणे आवश्यक आहे. घरात गणपतींची बसलेल्या स्थितीत व ऑफिसमध्ये उभारलेली मूर्ती असने खूप शुभ असते.

घरात किंवा ऑफिसमध्ये मूर्तीची स्थापना करताना हे लक्ष द्यावे की त्यांचे दोन्ही पाय जमिनीला टेकलेले असावे. यामुळे प्रत्येक कामात स्थिरता व सफलता मिळते. जर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर शेंदरी रंगाच्या गणपतीचे पूजन करावे.

असे केल्याने सर्व प्रकारच्या इच्छा व मनोकामना पूर्ण होतात. गणपती बाप्पांचे चित्र किंवा मूर्ती लावायचे असेल तर त्यात मोदक व उंदीर जरूर असावा. कधीही व कोणत्याही दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती व फोटो स्थापित करू नये.

यामुळे तुमच्या मानसिकतेवर वाईट प्रभाव पडू शकतो. कारण कोणतीही पूजा करताना जर योग्य प्रकारे व योग्य वेळी केले गेले नाही. तर त्याचे शुभ फळ मिळणे एवजी अशुभ फळ मिळते. जर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायचे असेल तर त्या दिवशी मंगळवार नसावा.

तर त्यादिवशी नवनी, चतुर्थी, चतुर्दशी या तिथी ही नसाव्या. शक्यतो चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, व मार्ग महिन्यातील शुक्ल पक्षात गणपतीची स्थापना करावी. बेडरूम मध्ये कोणत्याही देवी-देवतांचे फोटो किंवा मूर्ती असू नये.

यामुळे नकारात्मक ऊर्जा येते व अशुभ मानले जाते. जर तुम्ही तुमच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक ओम व त्रिशूल या सारख्या शुभ चिन्हांचा वापर केल्यास नकारात्मक ऊर्जा निघून जाते व घरात प्रवेश करू शकणार नाही.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स