आपलं जग कितीही पुढे गेलं तरी काही काही गोष्टी या ‘जुनं ते सोनं’ असं म्हणून आपण नेहमीच वापरत असतो त्यातीलच एक गोष्ट म्हणजे मातीपासून बनवलेला पाण्याचा ‘माठ’. माठातलं पाणी प्यायल्यावर जी तहान शांत होते ती फ्रीजमधल्या पाण्याने देखील होत नाही.
आपल्या पूर्वजांनी मातीच्या भांड्याचं महत्त्वं जाणलं होतं म्हणूनच त्यांनी माठाची निर्मिती केली असावी. अजूनही बऱ्याच कुटुंबात माठाचा वापर हा केला जातो.
खरंतर लोकं आधुनिकतेकडे वळतात पण त्याचबरोबर जुन्या गोष्टीही वापरतात. हल्ली प्लास्टिक बॉटलऐवजी मातीच्या बाटल्या, मातीचे तांब्या-भांडं अशा गोष्टीही प्रचलित आहेत. त्यातील पाणी आरोग्यास चांगलं असतं कारण ते नैसर्गिक आहे हे आपल्या मनावर बिंबवले गेले आहे.
जेव्हा आपण फ्रीजमधील पाणी पितो तेव्हा तहान भागते, पण ती तात्पुरती असते, पण तेच जर आपण माठातील पाणी प्यायलो तर मातीचा हलकासा वास आणि थंड पाणी याने आपली तहान नक्कीच भागते.
फ्रीजमधील पाण्याने दंतदुखीचा त्रासही वर येऊ शकतो. दातातून कळा येणे किंवा फ्रीजमधील पाण्याने घसा बसणे हे अगदी नेहमी होणारे त्रास आहेत आणि सर्वश्रुत आहेत.
तर मित्रांनो चला आपण जाणून घेऊयात मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे दहा फायदे :-
- मातीच्या भांड्यात हवामानानुसार पाणी असते ही एक गुणवत्ता इतर कोणत्याही भांड्यात नसते.
- माती नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असल्याने शरीरात पीएच शिल्लक ठेवण्यास मदत करते आणि अम्लता आणि गॅस्ट्रोनॉमिक वेदना कमी होतात.
- मातीच्या भांड्यातील खनिजांमुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते.
- खोकला किंवा सर्दी असलेल्या लोकांनीही मातीच्या भांड्यातील पाणी पिल्यास त्यांना अपाय होत नाही.
- मातीच्या भांड्यात शरीरातील ग्लुकोज राखण्यासाठी आवश्यक असलेले पोषक जीवनसत्तवे असतात हे शरीर सिद्ध करते त्यामुळे उष्ण स्ट्रोकपासून प्रतिबंधित करते.
- माठातील पाणी हे तुम्ही एकदा माठ विकत घेतला की, एक पैसाही खर्च न करता गार करू शकता. लाईट बिलापेक्षा माठाची किंमत नगण्य असते.
- गर्भवती महिला किंवा लहान मुले यांनी माठातील पाणी प्यायले तर त्यांना काही त्रास होत नाही.
- सतत पाणी प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवल्याने प्लास्टिकमधील एक थर जमा होतो जो आपल्या तब्येतीला हानीकारक असतो. माठ हा नैसर्गिक असल्याने त्यातील पाणी हानिकारक होत नाही.
- मुळातच मातीमध्ये औषधी गुण असतातच त्यामुळे त्यातील पाण्याला एक निराळा स्वाद, गोडसर चव येते आणि हे शुद्ध पाणी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
- माठाला छोटी छोटी छिद्र असतात ती आपल्याला डोळ्यांनी दिसतही नाहीत. पाणी थंड होणे हे बाष्पीकरण क्रियेवर अवलंबून असते. जितके बाष्पीकरण जास्त होते तेवढे पाणी जास्त थंड होते. म्हणूनच माठाच्या खाली पाणी झिरपते.
बाष्पीकरण होण्यासाठी माठ सगळी उष्णता आपल्याकडे खेचून घेते व पाणी थंड करतो म्हणजेच अगदी नैसर्गिकरित्या हे पाणी थंड होते.
माठ हा खूप पूर्वीच बनविला गेला असावा कारण कावळा आणि माठ याची गोष्ट फारच प्रसिद्ध आहे. खूप तहानलेला एक कावळा असतो त्याला एक माठ दिसतो, पण पाणी अगदी माठाच्या तळाशी गेलेले असते.
मग कावळा खूप विचार करतो आणि सभोवतालचे खडे माठात टाकतो त्यामुळे पाणी वर वर येते. तो पाणी माठाच्या तोंडाशी आणतो आणि ते पाणी पिऊन आपली तहान भागवतो म्हणूनच कावळ्याला चतूर म्हणतात.
तर असे हे माठातील गुण आहेत. परदेशातील लोकांनाही आपल्या या कलेचं फार आकर्षण वाटतं. आता माठामध्ये खूपच निरनिराळे प्रकार आहेत पण सगळ्यात फेमस म्हणजे काळा माठ आणि लाल माठ. कधीकधी आपण या माठ घेण्यात फसू पण शकतो.
आपण माठ विकत आणतो आणि त्यात काही केल्या पाणी गार होत नाही. मग तू किती ‘माठ’ (म्हणजे ढ) आहेस ? असंही ऐकून घ्यावं लागतं.
तेव्हा चांगला नीट पारखून माठ घ्यावा आणि थंडगार पाणी पिण्यास सुरुवात करावी. माठातील पाणी पिताच तहान क्षमेल, हे मात्र नक्कीच..