घरामध्ये धूप दाखविणे का गरजेचे आहे..??जाणून घ्या धूप आरतीचे पूजेतील महत्वं..!!!

धुप किंवा लोबान वापरणे (जाळणे) तसेच धूनी देणे ही एक अत्यंत लाभदायक प्रक्रिया आहे. प्राचीन काळापासून मनाच्या आनंदासाठी आणि शांतीसाठी, तसेच घरातून नकारात्मक उर्जा घालवण्यासाठी धुप वापरली जात आहे. धुप मुळे मानसिक तणाव दूर होत असतो, तसेच बर्‍याच रोगांमध्ये धुप फायदेशीर देखील आहे. आज आपण धूप जाळण्याच्या फायद्यांविषयी विश्लेषण करणार आहोत.

परंतु तुम्हाला हे देखील माहिती असायला हवे की धूप देण्याचे बरेचसे नियम आहेत. धूप जाळल्याने वातावरण शुद्ध होते, परंतु केव्हा धूप पेटवावे हे माहित असणे फार महत्वाचे आहे. काही अपूर्ण माहितींमुळे आपल्यावर आणि घरातही नकारात्मक प्रभाव पडतो.

चला तर मग जाणून घेऊया लोबान किंवा धुपबद्दल सर्व काही. धूप किती प्रकारचे आहेत आणि घरात आपण धूप कसे बनवू शकतत हे देखील आपल्याला आज कळेल.

साधारण आपण देवपूजा करताना धूप व दीप लावत असतो. पूर्वीचज धूप कशासाठी लावत असावेत. याबाबत अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत पण दिवा हा तर आपण आणि भगवंतामधील एक दुवा आहे. आपण भगवंतांची पूजा अर्चा करतो उपासना करतो तेव्हा दिवा आपली साधना, आराधना देवतांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य हा दिवा करत असतो.

म्हणूनच देवपूजा करण्याच्या अगोदर दिवा हा लावलाच पाहिजे. पण धूप लावल्याने काय होते..?? धूप जाळला तर आपले मन तथा शरीरही प्रसन्न होत असते त्यामुळे आपल्या मनाला शांत प्रसन्न वाटते घरातील वातावरण पवित्र होते.

आपण दिवा आणि फुलं अर्पण करतो ते भगवंताला प्रसन्न करण्यासाठीच. पण त्याच्यामागे खरे शास्त्रीय कारण म्हणजे आपण भगवंतांचे पूजन करताना एकाग्रता साधली जावी, तसेच आपल्या मनाला प्रसन्न वाटावे व पूजनात एक प्रकारचा उत्साह यावा यासाठी पूजनात आपण या सर्व पूजा सामग्रीचा वापर हा करत असतो.

घरात रोज न चुकता आपण धूप जाळला तर घरातील सूक्ष्मजंतूंचा नाश होतो त्यामुळे घरातील सर्व रोगराई व आजारपण नष्ट होते, त्याचबरोबर आपल्या दुःखांचा ही नाश होतो. काही घरांमध्ये सारखे भांडण तंटे व वादविवाद होतात. अशा घरांमध्ये दररोज धूप लावल्यास घरामधील वातावरण शुद्ध होते. त्यामुळे कलह मिटतात.

घरामध्ये धूप लावल्यामुळे अकस्मात होणाऱ्या घटना टळतात किंवा अचानक होणारे अपघात होत नाहीत काही लोकांच्या कुंडलीतील वाईट ग्रह व नक्षत्रांमुळे त्यांच्या आयुष्यात नेहमीच अनेक दुःखद प्रसंग, अडचणी, संकटे, समस्या असतात. हे सगळे घडते ते ग्रहांच्या वाईट प्रभावामुळे, या सर्वच अडचणी केवळ घरात धूप लावल्याने नष्ट होत असतात.

आपल्या घरात सर्व गोष्टी चांगल्याच व्हाव्यात योग्य प्रकारे व्हाव्यात असे आपल्याला वाटत असेल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे अतिशय आवश्यक असते. ज्या घरात सकारात्मक ऊर्जा असते त्या घरातील सर्व कार्य सकारात्मक होतात, सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने व सुस्थितीत पार पडतात.

म्हणूनच घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होणे आवश्यक असते आणि हीच नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे काम ही धुप करते. घरामध्ये धूप लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा आपोआपच बाहेर पडते.

घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. जर एखाद्या घरात काही वास्तुदोष असेल तर तो देखील दूर होतो. धूप लावल्यास परिणामी त्यांचा प्रभावही कमी होतो. आपण देवघरात रोज दिवा लावला धूप जाळला तर देवघरात एखादी छोटीशी रांगोळी काढली तरी घरातील वातावरण आनंदी तसे खूप प्रसन्न होते.

रोजच्या सकाळी केलेल्या साधनेमुळे आपला संपूर्ण दिवस सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत भरून जातो आणि आनंदात सुद्धा जातो मन आणि शरीर दिवसभर अगदी प्रसन्न राहते. म्हणून देवा पुढे रोज दिवा लावून सुगंधित फुले वाहून धूप दाखवून त्यांचे पूजन रोज न चुकता करावे.

टिप – वरील माहिती वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही नम्र विनंती.

Leave a Comment