घरामध्ये या दिशेला ठेवा पाण्याने भरलेली सुरई, आर्थिक बाजू होणार मजबूत घेऊन येणार खुप सारा गुडलक..!!

चिकणमाती पासून बनविलेले एक भांडे ज्याला सामान्य बोली भाषेत माठ देखील म्हटले जाते. तर मित्रांनो, हा माठ जो आहे तो आपल्या जीवनात खुपसारा गुडलक घेऊन येऊ शकतो.

मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोक जास्त करुन घरामध्ये मातीची भांडी वापरत असत. घागर किंवा माठ पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जात असे. विशेषतः उन्हाळ्यात कारण, माठ पाण्याला केवळ नैसर्गिकरित्या थंडच ठेवत नाही तर तो आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही अत्यंत फायदेशीर आहे.

परंतु आपल्याला हे कदाचित माहिती नसेल की मातीची ही घागर किंवा माठ केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी देखील किती महत्वाचा आहे..??

होय मित्रांनो, चिकणमातीपासून बनलेले एक भांडे ज्याला आपण बोली भाषेत माठ सुद्धा म्हणत असतो, तो माठ आपल्या जीवनात अगणित आनंद आणि गुडलक घेऊन येऊ शकतो. आपण यासंदर्भात काही उपाययोजना केल्याने आपल्याला केवळ आर्थिक अडचणींवरच विजय मिळवता येत नाही तर वास्तुशास्त्रातही याचे बरेचसे फायदे सांगितलेले आहेत.

या लेखातून, आम्ही आपल्याला या चिकण मातीच्या भांड्यासंबंधित अशा उपायांबद्दल माहिती देणार ​​आहोत, ज्यामुळे आपण आपले जीवन अधिक सुखी, आनंदी आणि तणावमुक्त करू शकाल.

चिकणमातीच्या भांड्याशी संबंधित काही विशेष आणि महत्वाच्या गोष्टी –

1) नेहमी घागर भरलेली असावी –

चिकणमातीचा हा माठ घरात कधीही रिकामा ठेवू नये, हे नेहमी लक्षात ठेवायला हवे, तो नेहमीच भरलेला ठेवा. चिकणमातीचा हा माठ नेहमी पाण्याने भरावा.

असे म्हटले जाते की जर आपल्याला काही कारणास्तव एखादा माठ मिळाला नाही तर मातीची सुरई ठेवणे देखील अतिशय फायद्याचे आहे, परंतु ती नेहमीच पाण्याने भरलेली असावी हे नेहमी लक्षात ठेवा.

2) ही सुरई नेहमी उत्तर दिशेला ठेवा –

मित्रांनो, आपल्या वास्तुशास्त्रातही मातीच्या अशा भांड्यांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात मातीची भांडी किंवा सुरई उत्तर दिशेने ठेवल्यास त्याचे चांगले आणि सकारात्मक परिणाम पहायला मिळतात.

असे म्हणतात की उत्तर दिशा ही पाण्याची देवता म्हणजेच वरुण देव यांच्याशी सं-बंधित आहे, म्हणूनच या दिशेने पाण्याने भरलेली सुरई ठेवल्यास त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतात.

3) यामुळे मानसिक ताणही दूर होतो –

असे म्हणतात की चिकणमातीच्या एखाद्या भांड्यातून कोणत्याही झाडाला पाणी दिल्यामुळे त्या व्यक्तीला मानसिक ताणावातून मुक्तता मिळते. म्हणजेच हा उपाय मानसिक तणाव कमी करण्यातही ही महत्वाची भूमिका बजावतो.

4) यामुळे आर्थिक समस्या देखील दूर होतात –

चिकणमातीची ही भांडी आर्थिक समस्या तर दूर करतातच. पण असेही म्हणतात की पाण्याने भरलेल्या या चिकणमातीच्या भांड्यासमोर दिवा लावल्याने त्या घरात पैशांची कमतरता कधीच येत नाही.

ज्या घरात बरकत नाही आणि पैशांची स्थिरता नाही, त्यांनी पाण्याने भरलेल्या या चिकणमातीच्या भांड्यासमोर दिवा लावावा. असे केल्याने घरात बरकत येईल.

5) नात्यातील प्रेमही टिकवून ठेवते –

मित्रांनो, घरात लहान चिकणमातीची भांडी सजावट म्हणून ठेवली तर कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम आणि स्नेह कायम राहतो.

टिप – वरील लेख केवळ धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

Leave a Comment