घरामध्ये या जागी स्वस्तिक चिन्हं फक्त उलटं काढा, अडचणी होतील दूर, शाश्वत सौभाग्य लक्ष्मी लाभेल..!!

स्वस्तिक हे चिन्ह केलळ उलटे काढल्याने आपल्या घरातील आर्थिक आणि पारिवारिक प्रत्येक समस्या दूर होतील, तसेच शाश्वत सौभाग्य लक्ष्मी लाभेल आणि माता लक्ष्मींचा आशिर्वाद प्राप्त होईल.

मित्रांनो आपल्या सनातन धर्मात असे अनेक उपाय किंवा विधी आहेत ज्यांच्याद्वारे आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. त्यातूनच एक हा एक सोपा उपाय आहे, खरं तर स्वस्तिक हा शब्द ‘सु’ आणि ‘अस्ति’ या दोन संस्कृत शब्दातून आलेला आहे, ज्याचा अर्थ ‘सौभाग्य’, ‘कल्याण’ असा होतो.

मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मात स्वस्तिक या चिन्हाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. कोणत्याही पूजेमध्ये किंवा कुठलंही शुभ कार्य करत असतांना स्वस्तिक हे चिन्ह अंकीत केले जाते.

या चिन्हाचे अध्यात्मिक महत्त्वं शास्त्रांमध्ये सुद्धा सांगितलेले आहे. कारण पुराणात स्वस्तिक या चिन्हाला साक्षात परब्रह्म हे नाव देण्यात आलेलं आहे.

या चिन्हामध्ये माता लक्ष्मी तसेच श्रीमंतीची देवता आणि बुद्धीदाता श्रीगणेश यांचे प्रतिकही आहे. त्याच बरोबर ज्योतिषानुसार स्वस्तिकचे अणखी काही वेगवेगळे उपयोगही सांगण्यात आले आहेत, जे केल्याने पारिवारिक तथा आर्थिक सर्व समस्या दूर होतात आणि संपत्ती, धान्य, भरभराटी बरोबरच अखंड लक्ष्मीचे आशिर्वाद प्राप्त होतात.

परंतु स्वस्तिक या चिन्हांचा वापर किंवा उपाय थेट स्वस्तिक काढून नाही तर उलटं स्वस्तिक बनवून केला जातो. उलटं स्वस्तिक अंकीत करुन, मनातील इच्छा देखील लवकरच पूर्ण केल्या जातात.

मित्रांनो चला तर मग आपण आता जाणून घेऊयात की उलटं स्वस्तिक काढण्याचा उपाय कसा करावा तसेच या उपायाचे कोणते फायदे आहेत..!!

व्यवसायात वाढ करण्यासाठी –
मित्रांनो हा उपाय करताना आपण गुरुवारचा दिवस निवडायचा आहे. व्यवसायात वाढ करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी घरातील ईशान्य कोपऱ्यातील जागा गंगा जलाने स्वच्छ धूवून घ्यावी. आणि तेथे हळदीने एक स्वस्तिकचे चिन्हं बनवायचे आहे.

नंतर आपण या स्वस्तिक चिन्हांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे ती केल्यावर तेथे गूळ अर्पण करायचा आहे. मित्रांनो हा उपाय सलग 7 गुरुवारी आपण करायचा आहे. असे केल्याने आपल्या व्यवसायातील नफ्यामध्ये लवकरच वाढ होईल.

घरामध्ये समृद्धी आणि भरभराटी आणण्यासाठी –
मित्रांनो, घरात समृद्धी आणि भरभराटी येण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर कुमकुम, सिंदूर किंवा रांगोळी घालून स्वस्तिकचं चिन्हं आपल्याला बनवायचं आहे. हा उपाय केल्याने समस्त देवी-देवता प्रसन्न होऊन घरात प्रवेश करतात आणि घरात राहणाऱ्या सर्व सदस्यांना आशीर्वाद देखील देतात.

आपल्याला हवा असलेला इच्छित आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी –
या उपायासाठी घराच्या पूजेच्या ठिकाणी किंवा मंदिरात उलटं स्वस्तिक बनवून त्यावर प्रतिष्ठित देवताची मूर्ती ठेवून पूजा करावयाची आहे. यामुळे देवता आपल्यावर लगेच प्रसन्न होतील आणि इच्छित असलेला आशीर्वादही देतील.

घरातील क्लेश कलह संपवण्यासाठी –
या उपायासाठी आपल्या घराच्या ईशान्य दिशेला भिंतीवर हळदीचे उलटे स्वस्तिक बनवल्याने घरात आनंद, समृद्धी, शांतता आणि भरभराटी मिळते. तसेच या उपायाने आपल्या घरातील कलह, आणि क्लेश संपून जातात.

इच्छित मनोकामना लवकर साकार करण्यासाठी –
मित्रांनो हा उपाय आपल्या पूजाअर्चा करण्याच्या ठिकाणी किंवा देवघरात उलटं स्वस्तिकचं चिन्ह बनवून घ्यायचे आहे.

नंतर त्यावर पाच प्रकारचे धान्य ठेवून त्यावर शुद्ध गाईच्या तुपाचे दिप प्रज्वलन करावयाचे आहे, आपल्या कुलदैवताचे स्मरण करुन नमस्कार करावयाचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छित, मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात.

टिप – वरील लेख केवळ धा-र्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अं-धश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

Leave a Comment