आपण घर बांधताना घराबाहेरील वास्तू दोषाचा कधीही विचार करत नसतो. हे वास्तू दोषही आपल्यासाठी तितकंच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी पोहोचवणारे असतात, जितका घरातील वास्तू दोष परिणाम कारक असतो तितकाच घराच्या बाहेर चा वास्तूदोष परिणाम कारक ठरतो. वास्तू दोष घरात असेल तर उपाय तरी केले जातात, मात्र बाहेरचे वास्तू दोष कोण-कोणते असतात याची साधी माहितीय आपल्याला नसते. घराबाहेर असलेल्या वास्तू दोषाबद्दलची माहिती असणं फार आवश्यक आहे. म्हणून जर आपण नविन घर घेत असाल किंवा स्वत:चं नवं घर बांधून घेत असाल तर काही बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर आपल्या घरातील शांतता भंग पावू शकते.
घरात वास्तू दोष असल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचे निवारण देखिल करता येते. मात्र घराबाहेर किंवा घरासमोर काही वस्तूंचा दोष असल्यास, त्याचा सामना घरातील व्यक्तींना करावा लागतो… आणि त्यामध्ये बदल करणं सहज शक्य देखिल नसतं. तर मग जाणून घेऊया कोणत्या वस्तू किंवा रचना घरासमोर असू नयेत.
मुख्यत्वे .. घरातील प्रमुख दरवाज्यासमोर या १० गोष्टी कधीही असू नये.
- घराच्या प्रमुख दरवाज्यासमोरून किंवा घरासमोरून कोणताही सरळ रस्ता जात नसेल, तर तसं घर मालकासाठी अशुभ ठरतं.
- घराच्या प्रमुख प्रवेशदारासमोर एखादा खड्डा, तलाव किंवा कोणतीही खोल जमीन असू नये, असं असल्यास घरासाठी ते अशुभ संकेत देतात.
- घराच्या प्रमुख प्रवेशदाराजवळ कोणताही नाला किंवा नाली असू नये. असं असेल तर त्यामुळं धनसंपत्तीची हानी होऊ शकते असा संकेत समजावा.
- घराच्या अगदी समोर विहीर असणं म्हणजे घरात आजारांना निमंत्रण देणं होय.
- घरासमोर किंवा घराच्या प्रमुख प्रवेशद्वारासमोर कोणताही खंबा असू नये. असं झालं तर तो घरातील महिलेला सतत आजारी पाडतो.
- प्रमुख प्रवेशद्वार किंवा घरासमोर मंदिर पाहून आपल्याला खूप आनंद होत असेल. मात्र हे कोणत्याही वास्तूच्या दृष्टीनेही चांगलं नसतं.
- घरासमोर मंदिर असेल तर आपल्या घरावर संकट येतात आणि समस्या निर्माण करतं.
- घराच्या प्रमुख दरवाज्यासमोर पायऱ्या असू नये. हे वास्तू दोषाचं एक मोठं कारण मानलं जातं. म्हणून घरासमोर पायऱ्या बांधू नये किंवा विकत घेतांना तसं घर विकत ही घेऊ नये.
- घराच्या प्रमुख प्रवेशद्वाराच्या अगदी वर दुसरे प्रवेशद्वार देखिल असू नये, यामुळं आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
- घरावर म्हणजे घराच्या छतावर कधीही कोणत्याही झाडाची सावली पडणं वास्तूच्या हिशोबानं चांगलं नाही. घराचा मुख्य दरवाजा किंवा घरासमोर कोणतंही झाड असू नये, कारण असं असल्यास आपल्या प्रगतीवर देखिल त्याचा परिणाम होतो.
तसंच घरासमोर झाड असल्यानं बाल दोष पण उत्पन्न होतात.
या टिप्सचा आपण आपलं नविन घर घेतांना किंवा नवीन घर बांधतांना नक्की विचार करावा. किंवा एखाद्या वास्तूशास्त्रज्ञाकडून याबद्दल चर्चा करून खातरजमा नक्की करून घ्यावी.