अशा पद्धतीने करावी अन्नपूर्णा मूर्तीची स्थापना तुम्ही तर करत नाही ना अन्नपूर्णेचा अवमान..??

घरातील देवघरात अन्नपूर्णेची मूर्ती असेल, तर तुम्ही ही चूक अजिबात करू नका, अनेक भक्तांकडून स्वामी सेवेकऱ्यांकडून एक प्रश्न सारखा विचारला जातो, तो म्हणजे आमच्या घरात अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे.

व आम्ही ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरात ठेवून दिली आहे, आणि इतर देवांप्रमाणे आम्ही तिची पूजा अर्चा करतो आहे, तर मित्रांनो हीच सगळ्यात मोठी चूक असते, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधीही इतर देवतांच्या सारखी देवघरात ठेवली जात नाही.

अन्नपूर्णेची मूर्ती ठेवण्याची एक विशेष पद्धत असते, आणि त्याच पद्धतीनुसार तुम्ही त्या मूर्तीला घरात स्थापन करायला हवे, जेव्हा तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती विकत घेता तेव्हा त्या मूर्तीबरोबर एक वाटी सुद्धा विकत घ्यायची असते, एक छोटीशी वाटी असते ज्यामध्ये ती अन्नपूर्णा माता ठेवायची पद्धत असते.

तुम्ही तशी वाटी घेतली नसेल, तर तुम्ही तुमच्या घरातूनच एखादी छोटीशी वाटी किंवा ताटली, घेऊन त्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करू शकता, आता ती कशी स्थापन करावी.., तर ही खूप सोपी पद्धत आहे, ती म्हणजे तुम्ही त्या वाटीमध्ये किंवा त्या ताटलीमध्ये तांदूळ फुल भरून घ्या. म्हणजे त्या ताटली मध्ये तांदूळ भरून घ्या.

एकसारखं करून घ्या. त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा, आणि ते देवघरात स्थापन करा, त्या अन्नपूर्ण मातेची मूर्ती हे धनाची नाही, धान्याची देवी आहे, म्हणून धान्याच्या देवीला धान्यामध्येच ठेवायला हवं. म्हणून तांदुळामध्ये त्या देवीला ठेवण्याची पद्धत असते, आणि त्यानुसारच आपण त्या देवीची पूजा अर्चाही करावी.

त्या ताटली मधील तांदूळ आपल्याला एक दिवसाआड बदलावे लागणार आहेत. तर कहीजण ते तांदूळ एक दिवस आड बदलतात म्हणजे आज ठेवले तर उद्या नाही बदलत परवा बदलतील, काहीजण रोज बदलतात आज ठेवलेली उद्या बदलतील, पुन्हा पुन्हा नवीन ठेवतील असं काही जण करतात.

आणि काही लोक हे तांदुळ दर आठवड्याला बदलतात, म्हणजेच जर तुम्ही सोमवारी वाटीत तांदूळ ठेवलेले आहे, तर पुढच्या सोमवारी त्या ताटलीत दुसरे तांदूळ ठेवतात, बदललेले वाटितले तांदूळ आपण पक्षांना खाऊ घालायचे आहेत, किंवा प्राण्यांना टाकू शकतो, तर मित्रांनो तुमच्या घरात सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल.

तुम्ही या पद्धतीने तिची स्थापना आपल्या घरात करू शकता, मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर सांगितलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य बिलकूल नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Comment