घरात एक तरी पुण्यवान व्यक्ती असावीच.. बघा इतिहास सुद्धा ग्वाही देतो…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते. ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जो पर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते तो पर्यंत रावणाने पाप केले तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता..

परंतु जेव्हा बिभीषणा सारख्या भक्ताला लाथ मारली गेली व लंके मधून निघून जाण्यास सांगितले गेले, तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरूवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही.!

अशाचप्रकारे हस्तिनापूर मध्ये जो पर्यंत विदूरासारखे भक्त राहात होते तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदूरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की ‘काका! आपण तीर्थयात्रेला जावे’. जसे विदुरने हस्तिनापूर सोडले, कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली.

शेवटी राज्य पण गेले आणि कौरवांच्यामागे कोणीही वारस राहिले नाही !! याचप्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात जो पर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तो पर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद असतो. विचार करा.!!

एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ति जेंव्हा आपला त्याग करते तेंव्हा पासून आपली ओहटी सुरु होते. म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका.

हे सुद्धा पहा : मनाची चंचलता कशी दूर होईल.? मन ताब्यात कसे राहील.?? जाणून घ्या याचे उत्तर..!!!

लक्षात ठेवा, आपण जे कमाऊन खातो ते कुणाच्या तरी पुण्याईने मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परीवारात कोणी भक्त, भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा.

माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा. व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत रहा !! सोबत काही घेऊन आलो नाही व जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केलेले आहेत.

कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहिती साठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!