नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, अनेक देवी-देवतांच्या नावांचा जप करण्यासाठी आपण आपल्या घरात जपमाळ ठेवतो. ही जपमाळ अनेकदा तुळशीचे असते. कधी रुद्राक्षाची असते. तर अनेक लोक स्फटिकाची जपमाळ सुद्धा वापरतात. मित्रानो जपमाळ कोणतीही असू द्या.
त्या जपमाळा चे अनेक नियम आपण कटाक्षाने पाळा. अन्यथा फायदे ऐवजी आपल्याला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावे लागेल. विशिष्ट देवी-देवतांचा क्रोध उत्पन्न होऊ शकतो. मित्रांनो जपमाळा विषयी हिंदू धर्म शास्त्र असे मानतो की धर्माशिवाय धर्मनिष्ठ, उदक स्पर्शाशिवाय दान, व जपमाळेचा न मोजता केलेला जप ही सर्व फळ निष्फळ आहेत.
म्हणजेच कोणत्याही मंत्राचा जप करण्यासाठी जर आपण जपमाळेचा वापर केला तर त्याचे फळ कित्येक पटीने प्राप्त होतं. शक्यतो मंत्राचा जप हा जपमाळेवरच करावा. जप करताना एकाच माळेवर विविध देवतांचे जप करू नये.
हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे करण्यास मनाई केलेली आहे. तुम्ही एकच माळेवर विविध देवतांचा जप करू शकता आपण पण सौम्य आणि उग्र एकत्रित जप आपण एकाच माळेवर करू नये. लक्षात घ्या एखादी देवता समजली आहे व एखादी देवता उग्र आहे.
उदाहरणात काली माता ही देवता उग्र आहे. तुम्ही जर एका माळेवर काली माता चा जप व एका माळेवर श्री हरी चा जप करून चालणार नाही. दुसरी गोष्ट शक्यतो आपली जी माळ आहे. ती दुसऱ्या कोणाच्या हाती जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. ती कधीच खुंटीला अडकून ठेवू नका.
त्यासाठी आपण एखादी व्यक्ती किंवा एखादी वाटी करू शकता. आपल्या जप माळेचा कधीच अपमान करू नका. दररोज नित्य नियमाने त्या जपमाळेवर एक फुल अवश्य अर्पण करा. एका व्यक्तीने वापरलेली जपमाळ ही दुसऱ्या व्यक्तीने कदापि वापरू नये.
आणि आपल्या जपमाळेला चुकून कोणाचा स्पर्श झाला तर अशावेळी आपल्या जपमाळेस पंचामृताने स्नान घालावे. म्हणजे ती शुद्ध होते. मित्रांनो जपमाळेचे महत्व खूप मोठे आहे. मित्रांनो खरं तर या जपमाळे मुळे आपण किती जप केलो किती मंत्र म्हंटलो हे आपल्याला अगदी अचूक कळतं.
आणि ही माळ रुद्राक्ष पासून तुळशी पासून बनलेली असल्याने या पवित्र वस्तूंचं सानिध्य आपल्याला सहजासहजी प्राप्त होतं. आपण ज्यावेळी जप करतो त्यावेळी अंगठ्या मध्ये आणि बोटांमध्ये जे एक घर्शन निर्माण होत. त्यातून तयार होणारी विद्युत शक्ती हे विलक्षण असते.
ती आपल्या नसांद्वारे आपलं हृदय प्रभावित करते. आपल्या मनाची एकाग्रता वाढते. मित्रांनो आपण एखाद्या विशिष्ट देवतेची तिथि असेल त्या काळात केलेला त्या देवतेचा जप भावी ठरतो. पण त्या दिवशी त्या विशिष्ट देवतेचे तत्व हे मोठ्या प्रमाणात कार्यरत असतं.
मग देवतांचा जन्मदिवस असेल किंवा उत्सव असेल त्या काळामध्ये आपण अधिकाधिक नामजप करा. मित्रांनो तुम्ही भक्ती सर्व देवतांची करा मात्र जप हा एकाच माळेवर एकाच देवाचा करा. अशा व्यक्तींना मूक ती सहजासहजी मिळते. वासनेच्या गुंत्यातून ती व्यक्ती बाहेर पडते.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!