घरात लावलेलं तुळशीचं रोप देत असतं घरावर येणाऱ्या या संकटांचे संकेत ..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, प्रत्येक घरात तुळशीचे रोप असते. तुळशीला इतर वनस्पतींपेक्षा जास्त व अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते कारण ती सर्वात पवित्र अशी व देव देवतांना प्रिय अशी वनस्पती मानली जाते. बऱ्याचशा घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. ज्या घरात तुळशी असते ती एका वैद्यासारखी असते. तुळशी ही वास्तू दोष देखील दूर करते.

तुळस आरोग्यासाठी खूप गुणकारी असून ही घरातील दोष दूर करून जीवन निरोगी आणि सुखी करण्यात सक्षम आहे. म्हणूनच, जेव्हा कुटुंबात कोणतीही समस्या येणार असेल, तेव्हा त्याचा थेट परिणाम तुळशीच्या रोपावर होतो. या प्रकरणात तुळशीची पाने काळी पडतात आणि पाने गळण्यास सुरूवात होते.

तुळस संकटांचे संकेत देते – घराच्या अंगणात आणि बाल्कनीत लावली जाणारी तुळस हिंदू धर्मात पुज्यनीय आणि पवित्र मानली जाते. तुळस हे फक्त एक हिरवं रोप नसून तिच्यातील अनेक औषधी गुणधर्मांमुळे गंभीर रोगांशीदेखील सामना करणं सोपं होतं म्हणूनच तिला ‘क्वीन ऑफ हर्ब्स’ देखील म्हटलं जातं.

विविध आजांरावर गुणकारी असणारी ही तुळस सौंदर्याच्या दृष्टीने त्वचा आणि केस यासाठीही लाभदायक ठरते. याचबरोबर तुळस घरात येणाऱ्या संकटांबद्दल विविध संकेत देत असते. ज्या घरांमध्ये जास्त संकट आणि अशांतता असते तेथे तुळशीचे रोप कधीही हिरवे राहत नाही. या वनस्पतीच्या सुकण्यामुळे घरातील आनंद निघून जातो आणि पैशाची कमतरता भासते.

आपल्या कुटुंबावर किंवा आपल्यावर एखादं संकट येणार असेल तर त्याचा सर्वात आधी प्रभाव आपल्या घरातील तुळशीच्या झाडावर होतो. अशात आपण तुळस कितीही जपली तरी हळू-हळू ती वाळायला लागते. तुळशीचे झाड आपल्यावर येणार्‍या संकटाची कल्पना देतं.

हिवाळ्याच्या हंगामात, बऱ्याच लोकांच्या घरात तुळशीचे रोप सुकते. जेव्हा या कोरड्या रोपावर पुन्हा हिरवी पाने येऊ लागतात, तेव्हा याचा अर्थ घरात आनंद येणार आहे. शास्त्रांप्रमाणे ज्या घरात संकट येणार असतं त्या घरातून लक्ष्मी अर्थातच तुळस निघून जाते, कारण जिथेही दारिद्र्य, अशांती किंवा क्लेश असेल तिथे लक्ष्मी वास करत नसते.

ज्या प्रकारे तुळशीची वनस्पती घरात येणाऱ्या संकटांबद्दल संकेत देते. त्याच प्रकारे, तुळशीचे पाने खाल्ल्याने अनेक आजार टाळता येतात. तुळशीच्या पानांमध्ये अँटीस्ट्रेससारखे घटक उपलब्ध असतात. त्यामुळे ते माणसाला मानसिक तणावातून मुक्त करतात. तसेच तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तणावातून येणा-या नकारात्मक विचांरावर मात करणे देखील सोपे होते. तुळशीची पाने डोकेदुखीवरील रामबाण उपाय म्हणून ओळखली जातात.

तुळशीच्या वाळलेल्या पानांची गरम पाण्यात वाफ घेणे हा सर्वात चांगला उपाय आहे. त्यासाठी एक चमचा वाळलेली तुळशीची पाने दोन कप पाण्यात टाकून एका मोठ्या भांड्यात गरम करावे. एका मोठ्या कपड्याने चेहरा झाकून त्याची 5 ते 10 मिनिटे वाफ घ्यावी. तसेच तुळशीची पाने वाटून चंदनाच्या लेपाबरोबर डोक्यावर लावणेही उत्तम.

खोकला आणि सर्दीच्या बाबतीत, तुळशीच्या पानांनी बनवलेला चहा पिणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय रोज काही पाने चघळल्यानेही तोंडाची दुर्गंधी दूर होते. तसं तर सर्दी-पडसं हा खूपच साधा आजार आहे पण यामुळे लोकं अगदी हैराण होतात. पण तुळशीच्या मदतीने तुम्ही सर्दी-पडश्याला बरं करण्यासोबतच त्यापासून कायमची सुटका देखील मिळवू शकता. तुळशीतील घटक सर्दी-पडश्यापासून मुक्तता मिळवून देतात.

तसंच तुळस तापासाठी देखील उपयुक्त मानली जाते. तापाची तीव्रता अधिक असल्यास अर्धा लीटर पाण्यात वेलची पावडर, साखर आणि दूध याबरोबर तुळशीची पाने उकळून घ्यावी. तीन तासांच्या अंतराने हा काढा रुग्णाला दिल्यास ताप कमी होतो. यासोबतच तुळशी, काळेमिरे आणि खडीसाखर मिसळून प्यायल्यानेही सर्दी-पडसे ठिक होते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment