नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, कुणाच्याही यशाची आणि प्रगतीची गुरुकिल्ली म्हणजे घरामधील शांतता तसेच प्रसन्न वातावरण. याला कारण असे की शांतताप्रिय वातावरणामध्ये ज्या पण कामांची सुरुवात होत असते ते काम नेहमी पूर्णच होतं असतं आणि आपल्याला त्या कामात यशही प्राप्त होत असते.
तुम्हाला माहिती आहे ज्या घरामध्ये सदैव शांतता नांदत असते ते घरामधील आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली असते कारण त्या घरामधील लोक एकमेकांशी प्रेमाने वागत असतात आणि अशा घरातच महालक्ष्मीचे वास्तव्य देखील असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये शांतता असणे खूप महत्त्वाचे आहे.
आपल्या घरामध्ये शांतता नांदत असेल तर चांगली गोष्ट आहे पण आपल्या घरी जर नेहमीच भांडणं होत असतील शाब्दिक चकमक उडत असेल किंवा आपल्या घरातील व्यक्तींचे एकमेकांशी पटत नसेल, काही सदस्य एकमेकांशी बोलत नसतील एकाच्या विचारांशी दुसरा सहमत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावे हे आज या लेखामध्ये आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ते सोपे उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये शांतता नांदण्यासाठी शांतता टिकवण्यासाठी खूप मोठी मदत करतील.
तर चला या मागे कोणकोणती कारणं आहेत ते पाहूया. मित्रांनो प्रत्येक घरामध्ये एक वास्तुपुरुष म्हणून एक पुरुष असतो तो स्वता जर शांत असेल तरच घरामध्ये शांतता नांदत असते आणि म्हणून त्याला सदैव शांत व प्रसन्न ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते. आता वास्तुपुरुष म्हणजे आपल्या घराची वास्तु आहे ते वास्तूंना वास्तुपुरुष असं संबोधलं जातं.
तर मित्रांनो यासाठी पहिला उपाय आपण हा करायचा आहे की रोज रात्री झोपताना आणि झोपून सकाळी उठल्यानंतर श्री वास्तुपुरुष आय नमः हा असा हात जोडून एकदा म्हणायच आहे आणि त्या वास्तुपुरुषाला बंधन करायचा आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये कुठलेही किंवा अघटित कार्य होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण ते वस्तूपुरुषाला ते आवडत नाहीत घरामध्ये भांडण तंटा करु नये.
आदळआपट करू नये दारू पिऊन बरलू नये आणि मुख्य म्हणजे घरात आलेल्या अतिथीचा कधीही अपमान करू नये आपल्या घरातील वास्तुपुरुष नेहमी शांत राहील.
त्याचप्रमाणे मित्र हो त्याच प्रमाणे स्वतःहुन वास्तुपुरुषाला रोज नैवेद्य दाखवणे हाही एक उपाय आहे जेणेकरून तो शांत राहील आहे त्याचप्रमाणे घरामध्ये दर वेळी अमावस्येच्या दर गुरुवारी धूप जाळावा जेणेकरून घरातील वातावरण भक्तीमय होईल घरातील वातावरण दूषित होणार नाही.
आणि देवांचे फोटो सुवासिक फुलांचा हार घालावा देवघरामध्ये सुद्धा सुवासिक फुले ठेवावीत की जेणेकरून घरामध्ये एक सुगंधित वातावरण तयार होईल आणि त्याचा परिणाम थेट आपल्या मनावर होईल.
त्याचबरोबर मुख्य म्हणजे घरामध्ये तिन्हीसांजेच्या वेळेला श्री रामरक्षा मोठ्या आवाजामध्ये म्हणायची आहे असे केल्याने घरांमधील वाईट प्रवृत्ती आहेत ज्या कलह निर्माण करणाऱ्या अघटित घटना घडवून आणणाऱ्या शक्ती आहेत त्या नाहीशा होतात ते निघून जातात आणि परिणामी तुमच्या घरा घरामध्ये शांतता नांदते मिळते.
या सर्वांचा परिणाम म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती सुधारते तुमची प्रत्येक काम पूर्ण होतात घरातील व्यक्ती इतरांची प्रेमाने वागू लागतात आणि इतरांशी प्रेमाने वागलात म्हणजे तुमचा संसार सुखी होतो.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!