नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल कारभार या आपल्या मराठमोळ्या पेजवर..!!
मित्रांनो, आजकालच्या काळात पैशांच्या अभाव व्यक्तीला खूप चिंताग्रस्त करत असतो, तसेच प्रत्येक माणसाला असेच वाटते की आपल्याकडे सर्व सुख सोयी, नानाविविध सुविधा असल्या पाहिजेल. पण कितीही प्रयत्न करूनही जर पैसा मिळत नसेल तर शक्यता असू शकते की तुमच्या घरात काही वास्तुदोष देखील असू शकेल.
मित्रांनो अशावेळेस एकंदर आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात ज्यांचा आपल्या घरात नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव पडतो ज्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
जर आपल्या घरात वास्तुदोष असेल तर आपल्याला कार्यक्षेत्रात, कौटूंबिक ठिकाणी अनेक अडथळे येऊ लागतात, म्हणून अशा वेळी हे सर्व वास्तूदोष दूर करणं फार गरजेचे बनते.
यापैकी या ३ गोष्टी जर तुमच्या घरात असतील तर पैसा चुंबकासारखा खेचून येईल. मित्रांनो, आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वास्तु शास्त्रानुसार अशा तीन गोष्टींबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे वास्तूदोष घरातून दूर केले जाऊ शकतात आणि जर का आपण या गोष्टी लक्षात घेतल्या तर धनाची आणि आनंदाची प्राप्ती होईल. माता लक्ष्मींचे आशीर्वाद प्राप्त होतील.
श्री कृष्णाची बासरी –
मित्रांनो, जर आपण आपल्या घरातील वास्तूदोष दूर करु इच्छितात तर, श्री कृष्णाची बासरी अतिशय शुभ मानली गेली आहे. अशाप्रकारे आपल्या घरातल्या आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही घरात चांदीची बासरी देखील ठेवू शकतात.
तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही सोन्याची बासरी देखील बनवून घरात ठेऊ शकतात, पण जर आपण सोन्या-चांदीची बासरी तयार करु शकत नसल्यास बांबूपासून बनविलेल्या बासरी देखील आपल्या घरात ठेवू शकतात. असे केल्याने घरातील वास्तु दोष तर दूर होतातच तसेच पैशांच्या संदर्भातील अनेक अडचणीं क्षणात दूर होतील. पैसा मिळविण्याच्या सर्व मार्गांवरील अनेक अडथळे सुद्धा दूर होतात.
गणपती बाप्पांची नृत्य करणारी प्रतिमा –
खरं पाहिले तर भगवान गणेश प्रत्येक प्रकारे शुभ मानले जातात, परंतु आपल्याला जर पैशांशी सं-बंधित त्रासातून मुक्त व्हायचे असेल तर घरात गणपती बाप्पांची नाचणारी मुर्ती ठेवावी.
जर तुम्ही अशी मूर्ती घरात ठेवली तर ते खूप शुभ मानले गेले आहे. असेही मानले जाते की गणपतीच्या मूर्तीच्या ऐवजी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मूर्ती सारखं एखादं छायाचित्र लावू शकतात, यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील.
लक्ष्मी आणि कुबेर यांची प्रतिमा –
वास्तुनियमानूसार देवी लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती प्रत्येक घरात असतात. पण मित्रांनो, घरात धनलाभ व्हावा असे वाटत असेल तर घरात महालक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची प्रतिमा असणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण घरात माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर या दोघांची नियमितपणे पूजा केली तर ते देखील अतिशय शुभ असते.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!