घरातील घड्याळं कोणत्या दिशेने असावे..?? कोणत्या आकारांचे असावे..??

मित्रांनो, वेळ ही खूपच गुंतागुतीची गोष्ट आहे. मोठमोठ्यांचा हातातून ती निसटून गेलेली असते आणि अनेकांच्या हातात ती इतकी असते की, त्या वेळेचे काय करायचे हेच त्यांना कळत नाही.

तसेच आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी शास्त्र असते आणि त्या शास्त्राला काही ना काही कारणही नक्कीच असते मग ते वैज्ञानिक सामजिक धार्मिक किंवा दंतकथा असू शकतात. पण या गोष्टी घडतात त्या मागे एक दिव्य शक्ती आणि एक लॉजिक असते.

जसे प्रत्येक गोष्टीमागे एक शास्त्र असते आणि त्याचा योग्य अभ्यास केला तर आपल्याला त्याचा नक्की लाभ होतो. आपल्या भारतीय वास्तुशास्त्रनूसार घड्याळ कोणत्या दिशेला असावे.

त्यामुळे होणारे फायदे आणि तोटे काय आहेत ते आज आपण बघणार आहोत. घड्याळाच्या मागील वास्तु नियमानुसार त्याचा आपल्या आयुष्यावर होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांचा अभ्यास करणार आहेत.

दिवाणखान्यातील घड्याळ हे एकप्रकारची एनर्जी निर्माण करत असते आणि ती एनर्जी सकारात्मक आहे की नाकारात्मक आहे त्यानुसार त्या एनर्जीचा परिणाम घरावर होत असतो.

वास्तुशास्त्रा नुसार घड्याळ कधीही दक्षिण दिशेला नसावे कारण दक्षिण दिशा ही यमाची आहे आणि यम हा जिवनाचा काल असतो त्यामूळे घरात किंवा दिवाणखान्यात नाकारात्मक एनर्जी निर्माण होते.

घरातील घड्याळ कधीही बंद स्थितीत नाही पहिजे. बंद घड्याळ म्हणजे अधोगतीचा मार्ग असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामूळे घरात पैसा टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गने आपण बचत केलेला पैसा निघून जातो.

घड्याळ नेहमी वेळेवर म्हणजेच राइट टाईम किंवा वेळेच्या पुढे असावे. जर कधी घड्याळ योग्य वेळेच्या मागे असेल तर मग सर्व मागे सुटत जाते. तसेच घरातील सर्व सं’पत्ती ही लयास जायला सुरुवात होते. काहीच नविन हातात येत नाही.

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची आहे तसेच घरातील मुख्य माणसांची सुद्धा आहे म्हणून दक्षिण दिशेला मरण पावलेल्या व्यक्तींची म्हणजेच आपल्या आजी आजोबा यांची प्रतिमा असावी.

वास्तु नियमानुसार घड्याळ घरामध्ये उत्तर, पुर्व, पश्चिम या पैकी कोणत्या ही दिशेला लावलेले चालते. दक्षिण दिशेला चुकुनही लावू नये. आणि घड्याळाचा आकार नेहमी गोल, चौरस आणि साधा असायला हवा.

टिप – आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज सुद्धा नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेत मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा. धन्यवाद..!! ?

Leave a Comment