घरातील पालींना पळवून लावण्यासाठी करा हा सोपा उपाय, एकाच दिवसात पाली होणार गायब..!!


मित्रांनो, आपल्या घरातील पाली पळवून लावण्यासाठी करा हा उपाय. एका दिवसात सर्व पाली निघून जातील. पुन्हा लवकर होणार नाहीत.

आपल्या घरामध्ये पाली असणे हे कधी झाली तरी हानिकारकच आहे हे आपणाला माहित आहे. असे जरी असले तरी आपल्या घरात भिंतींवर, कपाटावर, टेबलच्या आतील बाजूस, जिन्याखाली या पाली आपणाला आढळून येतात.

तसेच छतावर, तिजोरीच्या पाठीमागील बाजूस, घरातील भांड्यांच्या कपाटावर, अशा अनेक ठिकाणी आपणाला या पाली असल्याचे दिसून येते. आणि पाल ही किती विषारी आहे हे आपणाला माहित आहेच.

मित्रांनो अशा या विषारी पालीपासून आपल्या घरातील मंडळींचे म्हणजेच आपली मुलेबाळे घरातील वृद्ध व्यक्ती सर्व ज्येष्ठ मंडळी याच बरोबर आपले संरक्षण करण्यासाठी घरातील या मुलींसाठी काहीतरी उपाय करावाच लागतो.

हा अनावश्यक खर्च तर असणारच आहे. या खर्चामुळे आपल्या खिशावर ताण पडणार हेही तितकेच खरे आहे. तर अशा कोणत्याही अनाठाई खर्च न करता घरच्या घरी एक उपाय आहे तो करून आपणाला विना खर्चिक या पाली पासून संरक्षण मिळेल.

या पाली घरातून निघून जातील अथवा मृत पावतील असा हा घरगुती उपाय आहे. जाणून घेऊया आजच्या या लेखांमध्ये असा कोणता उपाय आहे की त्यामुळे या पाली पासून संरक्षण मिळेल.

मित्रांनो हा उपाय करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्या लक्षात असू द्या जसे की हा उपाय करताना घरातील सर्व सदस्यांनी खासकरून लहान मुले ज्येष्ठ मंडळी अर्धा ते पाऊण तास घरा बाहेरच थांबावे. घराची सर्व दारे खिडक्या पूर्णपणे बंद करावीत यानंतरच हा उपाय करावा.

कसा करावा उपाय?
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी सुरुवातीला एक बुट्टी अथवा घमेले अथवा घरातील अशीच काहीतरी खराब वस्तू काही नसेल तर एखादा खराब झालेला पत्र्याचा तुकडा घ्यावा.

या बुट्टी मध्ये अथवा यापैकी आपण जे काही घेतले आहे त्यावर काही काट्या-कुट्या तसेच एक-दोन शेणी याच बरोबर थोडासा कागद हे घेऊन ते पेटवून द्यावे ते पूर्ण जळाल्यानंतर त्याच्यावरती लिंबाचा पाला अगदी डहाळे सह जाळावा.

आणि यानंतर जो धूर उठेल तो तसाच घरामध्ये कोंडू द्यावा. या धुरामुळे घरातील जिथे कुठे लपलेल्या बसलेल्या पाली असतील त्या अगदी बेशुद्ध होऊन एक तर खाली पडतील अथवा त्यांना घरातून बाहेर पडण्यास कुठे वाट असेल तर त्यातून त्या बाहेर पळून जातील.

साधारणपणे हा धूर घरात अर्धा ते पाऊण तास कोंडून ठेवावा तरच हा उपाय लवकर लागू होतो आणि पाली निघून जातात नष्ट होतात.

मित्रांनो हा उपाय करत असताना घ्यावयाची मुख्य काळजी म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे घरातील ज्येष्ठ मंडळींना तसेच लहान मुलांना या उपायांच्या काळात तासभर बाहेरच थांबण्यास सांगणे.

त्याच बरोबर हा जो जाळ करणार आहात तो कुठल्याही एका खोलीच्या मध्यभागी बुट्टी अथवा जे साहित्य घेतला आहात ते ठेवून त्यावर जाळ करावा. यामुळे घरातील इतर कुठल्याही जाळ वस्तूला लागणार नाही.

याची काळजी घेतली जाईल तसेच धुरामुळे आपले घर काळे होणार नाही.
तर आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला हा घरगुती उपाय अत्यंत सोपा व विना खर्चिक आहे.

त्यामुळे तो करून पाहून आपणाला आपल्या घरातील पाली गेल्या की नाही हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

मित्रांनो वरील माहिती वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. हा उपाय करताना काळजीपूर्वक करा लहान मुले, वृद्धांना सांभाळा.

अशाच प्रकारच्या अनेक उपायांसाठी आमचे पेज लाईक करा तसेच शेअर करायलाही विसरू नका.